मुंबई, 24 मे : स्किझोफ्रेनिया (Schizophrenia) हा एक गंभीर मानसिक आजार (mental disease) आहे. हा आजार मुख्यत्वे बालपणात (childhood) किंवा किशोरावस्थेत (teenage) होतो. स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांना जास्त प्रमाणात भास होतात आणि भीतीदायक (fear) सावल्या दिसतात. या आजारामुळे रुग्णाच्या विचारांमध्ये, भावनांमध्ये आणि व्यवहारात लक्षणीय बदल जाणवतात. त्यामुळे ते स्वतःची जबाबदारी आणि काळजी घेण्यात कमी पडू लागतात. या आजाराबाबत जनजागृती व्हावी यासाठी 24 मे हा दिवस’वर्ल्ड स्किझोफ्रेनिया डे’ (World Schizophrenia Day 2021) मानला जातो. यावर्षी ‘वर्ल्ड स्किझोफ्रेनिया डे’ची थीम- चांगल्या मानसिक आरोग्याचा शोध घेणं (Discover Better Mental Health) ही आहे. मायोक्लिनिकने दिलेल्या वृत्तानुसार, स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांना आयुष्यभर संघर्ष करावा लागतो. जगभरातील केवळ 1 टक्के लोकांना हा आजार आहे. भारतात स्किझोफ्रेनियाचे जवळपास 40 लाख रुग्ण आहेत. स्किझोफ्रेनियाच्या रुग्णाला लवकर नैराश्य येतं. तसंच त्याला आत्महत्या करण्याचे विचार येतात. हा आजार कुटुंबात अनुवांशिक असू शकतो. जास्त तणाव, सामाजिक दबाव आणि त्रासामुळे रुग्णांना बरे होण्यास अनेक अडचणी येतात. स्किझोफ्रेनियाची प्रमुख लक्षणं - हा आजार झालेली व्यक्ती एकटी राहू लागते. - व्यक्ती स्वतःच्या जबाबदाऱ्या आणि नीट काळजी घेऊ शकत नाही. - व्यक्ती एकट्यातच हसते किंवा स्वतःशीच पुटपुटत असते. -हा आजार झालेल्या रुग्णाला वेगवेगळे अनुभव येतात. त्याला कुणालाच ऐकू न येणारे आवाज ऐकू येतात. त्याशिवाय अशा वस्तू किंवा आकृत्या दिसतात ज्या इतरांना दिसत नाहीत. तसंच शरीरावर प्रत्यक्षात काही नसलं तरी असल्याचा भास होतो. हे वाचा - Black, White नंतर Yellow Fungus, आणखी एक भयंकर फंगल इन्फेक्शन; अशी आहेत लक्षणं -रुग्णाला लोक त्याच्याबद्दलच बोलत आहेत, असा विश्वास बसू लागतो किंवा त्याच्याविरोधात सर्व एकत्र येऊन कट रचत असल्याचं वाटतं. -लोक त्याला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. किंवा त्याचा देवाशी काहीतरी संबंध आहे, असं रुग्णाला वाटू लागतं. -रुग्णाला वाटतं की कोणती अज्ञात शक्ती त्याच्या विचारांना नियंत्रित करत आहे. -रुग्ण स्वतःशीच बोलून हसतो, रडतो किंवा काहीही बोलू लागतो. -स्किझोफ्रेनियाचे रुग्ण आयुष्यात लवकर निराश (depression) होतात. त्यांना आत्महत्या (suicide) करण्याची तीव्र इच्छा होते. स्किझोफ्रेनिया होण्याची कारणं अनुवांशिक आजार - जर घरात कुणालाच हा आजार नसेल तर तो होण्याची शक्यता केवळ 1 टक्का आहे. मात्र, एखाद्या व्यक्तीच्या आई-वडिलांना हा आजार असल्यास तो मुलांना होण्याचा धोका 10 टक्क्यांनी वाढतो. मेंदूत केमिकल असंतुलन झाल्यास - डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या मेंदूत न्यूरोट्रांसमीटर असतो, त्याला डोपामाइन (Dopamine) म्हणतात. या डोपामाइनमध्ये असंतुलन झाल्यास स्किझोफ्रेनिया होऊ शकतो. कौटुंबिक कारणांमुळे - काही रुग्णांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबात तणावपूर्ण वातावरण असल्याने त्यांना त्रास होतो. नैसर्गिक कारण - तज्ज्ञांचं मतं आहे, की बाळाच्या जन्मापूर्वी जर आई तणावात असेल किंवा तिला व्हायरल इन्फेक्शन झालं असेल तर बाळाला स्किझोफ्रेनिया होण्याची शक्यता बळावते. मात्र यावर तज्ज्ञांमध्ये मतभेद असून रिसर्च सुरू आहे. हे वाचा - परीक्षा रद्द, अभ्यास थांबला; पालकांनो विद्यार्थ्यांचा मानसिक आरोग्य जपा तणावपूर्ण अनुभव - बऱ्याचदा तणावपूर्ण अनुभवामुळे स्किझोफ्रेनियाची लक्षणं दिसू लागतात. शिवाय अनेकदा स्किझोफ्रेनियाची लक्षणं दिसण्यापूर्वी रुग्णांमध्ये वाईट वागणं, अस्वस्थता किंवा लक्ष केंद्रीत न करता येणं अशी लक्षणं दिसून येतात. यामुळे व्यक्तीच्या जीवनात इतर समस्याही डोकावतात जसं नात्यांमधील तणाव, घटस्फोट घेण्याची वेळ येणं किंवा नोकरी जाणं इत्यादी. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे - कित्येक वेळा अंमली पदार्थांच्या सेवनामुळेही स्किझोफ्रेनिया होऊ शकतो. ड्रग्जच्या आहारी गेलेल्यांना त्यांना स्किझोफ्रेनियाचा धोका सर्वाधिक असतो. यासोबतच एखाद्या मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्ती, किंवा गांजाचे सेवन करणाऱ्या व्यक्ती यांनाही याचा धोका असतो. विशेष म्हणजे, स्किझोफ्रेनियाचा उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांनाही पुन्हा हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.