• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • काय म्हणावं याला! स्वतःच्या लग्नातही डायपर घालून उभा राहिला; महिनाभर टॉयलेटला गेलाच नाही

काय म्हणावं याला! स्वतःच्या लग्नातही डायपर घालून उभा राहिला; महिनाभर टॉयलेटला गेलाच नाही

एकदा का त्याने डायपर घातलं की किती तरी दिवस तो काढत नाही.

 • Share this:
  वॉशिंग्टन, 20 सप्टेंबर : डायपर (Diaper) सामान्यपणे लहान मुलांना घातलं जातं. वयस्कर व्यक्ती, रुग्ण ज्यांना शारीरिक हालचाल करता येत नाही, त्यांच्यासाठीही अडल्ड डायपरचा वापर होतो. पण कोणत्याही निरोगी माणसाला डायपर घालायला आवडणार नाही (Diaper Lover). पण तुम्हाला आश्चर्य वाटेल अमेरिकेतील (American Man) एका व्यक्तीला मात्र (Man wears diaper everyday)  डायपर घालायची हौस आहे (American Man Diaper). अमेरिकेच्या (USA) नेबारास्कामध्ये राहणारा मेझ (Maz) मध्ये मध्ये कधीतरी डायपर वापरतो. गेल्या महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून तर तो दररोज डायपर घालतो. एकदा डायपर घातल्यानंतर किती तरी आठवडे तो डायपर काढत नाही. गेले महिनाभर तो टॉयलेटही गेला नाही. मेझला लहानपणापासूनच डायपर घालायला आवडायचं. जसजसा तो मोठा होत गेला, तसतसं त्याची ही आवड वाढतच गेली. त्याला डायपर घालायला इतकं आवडतं की एकदा ते घातल्यावर किती तरी दिवस काढत नाही आणि टॉयलेटला जात नाही, त्यातच लघवी, शौच करतो. आता तर तो जवळपास पाच आठवडे टॉयलेटला गेला नाही आहे. हे वाचा - हे काय? दिराने पाठवली अशी लग्नपत्रिका; मजकूर वाचून वहिनीच्या रागाचा चढला पारा मेझने एका पॉडकास्टला आपल्या या डायपर वापराच्या सवयीबाबत सांगताना सांगितलं, जेव्हा तो खूप छोटा होता, तेव्हापासूनच त्याला डायपर घालायला आवडायचं. किती तरी वेळा तर तो स्कूल युनिफॉर्ममध्येही गुपचूप डायपर घालून जायचा. कधी कधी त्याला डायपर घालावंसं वाटतं. तेव्हा किती तरी दिवस डायपर घालूनच राहतो. डायपर घातलेल्यांना खूप मजेशीर अनुभव मिळतो. भिजलेलं डायपर खूप बरं वाटतं. हे वाचा - गोड बिचारं! सहा महिन्यांचं हे बाळ कधीच रडत नाही, पाहा PHOTOs त्याच्यासारखे कितीतरी लोक आहे, ज्यांना अडल्ट डायपर घालायला आवडतं. त्यांना ‘एडल्ट बेबी डायपर लव्हर्स’ (Adult Baby Diaper Lovers) म्हटलं जातं. जेव्हा असे आणखी लोक आहेत, ज्यांना डायपर घालायला आवडतं हे त्याला समजलं तेव्हा तो अशा लोकांना भेटू लागला. अशाच एका ग्रुपमधील मांजी नावाच्या मुलीसोबत त्याने लग्नही केलं. लग्नाच्या दिवशीही दोघांनी डायपर घातलं होतं, पण सर्वांना हे माहिती नव्हतं, असं मेझ म्हणाला.
  Published by:Priya Lad
  First published: