Home /News /viral /

हे काय आहे? दिराने पाठवली अशी लग्नपत्रिका; मजकूर वाचून वहिनीच्या रागाचा चढला पारा

हे काय आहे? दिराने पाठवली अशी लग्नपत्रिका; मजकूर वाचून वहिनीच्या रागाचा चढला पारा

पत्रिका पाहतच वहिनीची सटकली

पत्रिका पाहतच वहिनीची सटकली

दिराचा प्रताप पाहून भडकली वहिनी.

    ब्रिटन, 20 सप्टेंबर : वहिनी (Sister in Law) आणि दिरामध्ये (Brother in Law) नेहमी मजामस्ती पाहायला मिळाली. दोघंही एकमेकांची चेष्टा करताना, एकमेकांसोबत (Devar Bhabhi) डान्स करताना बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. हे एक नातं असं आहे, ज्यात फक्त आनंद आनंदच दिसतो. पण यूकेतील  (UK) एका महिलेचा आपल्या दिराबाबतचा अनुभव खूप वेगळा आहे. या महिलेसोबत तिच्या दिराने असं काहीतरी केलं की त्यामुळे ती खूप संतप्त झाली आहे आहे. दिराचं लग्न म्हटलं की सर्वात जास्त आनंदात असते ती वहिनी. दिराच्या लग्नातही ती ठुमके लगावताना दिसते. पण यूकेतील महिला लग्नात ठुमके लगावणं दूर दिराच्या लग्नाची पत्रिका पाहून तिच्या रागाचा पारा चढला. दिराने आपल्या वहिनीला लग्नाची अशी पत्रिका (Wedding Invitation) पाठवली, ज्यातील मजकूर वाचून वहिनी भडकली. यूकेतील महिलेने आपल्या दिराबाबतचा वाईट अनुभव सोशल मीडियावर मांडला आहे. दिराने आपल्या भाऊ-वहिनीच्या मुलाला म्हणजे पुतण्याला लग्नाला बोलावलं नाही. हे वाचा - 'डॉल्फिनने माझ्यासोबत सेक्स केलं, ब्रेकअप होताच सुसाईड', महिलेचा खळबळजनक दावा दिर त्यांच्यापासून खूप दूर राहत होता आणि लग्नासाठी तीन दिवस जावं लागणार होतं. डिसेंबरमध्ये हे लग्न होणार आहे. त्यावेळी त्यांचा मुलगा फक्त सात महिन्यांचाच असेल आणि मुलाला ते एकटं सोडून जाऊ शकत नाही. पण त्याने पाहुण्यांना आपल्या कुत्र्यांना लग्नाला आवर्जून आणण्याचा उल्लेख केला होता. यानंतर महिलेच्या नवऱ्याने आपल्या भावाला फोन केला आणि सांगितलं की ते आपल्या मुलाला एकटं सोडून लग्नाला नाही येऊ शकत. तेव्हा त्याने आपण लग्नात लहान मुलांना बोलावलं नाही आहे, असं सांगितलं. हे वाचा - हिच्यासोबत संबंध ठेवायला तरुणीही उतावळ्या; हिला पाहताच होता घायाळ मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार महिलेने सांगितलं काही कारणामुळे किती तरी वर्षे सासरच्यांसोबत तिचं बोलणं झालं नाही. पण एप्रिलमध्ये तिच्या मुलाचा जन्म झाल्यानंतर आम्ही भेटलो आता आमच्यातील नातं ठिक झालं आहे. पण आता त्यांची अशी अटक पाहून आम्ही हैराण झालो आहोत. आता आमच्याकडे दोनच पर्याय आहेत. आम्ही लग्नाला जाऊच नये किंवा त्यांच्य़ाशी बोलण्याचा प्रयत्न करू.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral news, Wedding

    पुढील बातम्या