कॅनडाच्या लुसिंडा अँड्यूजची ही समस्या विज्ञानही सोडवू शकलेलं नाही. शास्त्रज्ञांनी या आजाराची मूळं शोधावीत आणि आपल्या बाळाला बरं करावं, असं त्याच्या आईचं म्हणणं आहे. यावर्षी 5 मार्चला या बाळाचा जन्म झाला आहे.
लुसिंडाची प्रेगन्सी अगदी आरोग्यपूर्ण होती. कुठलाही त्रास तिला नव्हता. मात्र बाळाचा जन्म झाल्यानंतर ते रडत नव्हतं. त्याचं डोकंही हलत नव्हतं. ही एक जेनेटिक कंडिशन असावी, असा डॉक्टरांचा कयास आहे. बाळाची प्रोटीन लेव्हल बदलत असल्यामुळे त्याच्यात ही समस्या असावी, असं डॉक्टरांना वाटत आहे.
हा आजार इतका दुर्मिळ आहे की त्याला कुठलं नावदेखील नाही. यावर थोडा रिसर्च व्हावा आणि आपल्या बाळाच्या आय़ुष्यात काही चांगले बदल घडावेत, असं लुसिंडाला वाटत आहे. तिच्या बाळाचं नाव आहे लिओ. लिओ रडू तर शकत नाहीच, मात्र त्याला श्वास घ्यायलाही त्रास होतो. पण ही गोष्टही लहान असल्यामुळे तो सांगू शकत नसल्याचं लुसिंडाला वाईट वाटतं.
जन्माला आल्यानंतर लिओला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला स्पेशल केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. बाळाच्या शरीरातील TBCD gene मुळे त्याचं आयुष्य इतरांपेक्षा वेगळं ठरत आहे.
लिओचा जन्म झाल्यावर ज्यांनी ज्यांनी त्याला पाहिलं, त्या सर्वांना आश्चर्य वाटलं. त्याला श्वास घ्यायला त्रास होत असूनही तो कधीच रडत नाही.
आपल्या बाळाला खेळताना पाहून लुसिंडाला बरं वाटतं. त्याला टॉय स्टोरीज आवडत असल्याचं ती सांगते. बाहेर जाऊन झाडांकडे पाहत बसायलाही त्याला आवडत असल्याचं लुसिंडानं सांगितलं आहे.