व्हिडीओत पाहू शकता, एका गाडीत नवरी बसली आहे. तिची पाठवणी सुरू आहे, सासरी जाण्याच्या तयारीत ती आहे. गाडीच्या दुसऱ्या दरवाजातून नवरा तिच्या शेजारी येऊन बसतो. नवरी थोडा वेळ त्याच्या चेहऱ्याकडे पाहतच राहते आणि त्यानंतर मात्र तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत. हे वाचा - सावधान, पुढे धोका आहे! चक्क हायवेवर शतपावली करतायेत 5 सिंह; धडकी भरवणारा VIDEO ती पटकन आपला चेहरा नवऱ्याच्या बरोबर विरुद्ध दिशेने म्हणजे तिच्या बाजूच्या कारच्या दरवाजाच्या दिशेने वळवते. सुरुवातीला रडवेला चेहरा करते आणि मग काय तिला रडूच कोसळतं. कारच्या बाहेर उभ्या असलेल्या एका महिलेला जी तिची नातेवाईक आहे, तिला मिठी मारून ती ढसाढसा रडू लागते. व्हिडीओ पाहताच असंच वाटतं जणू की नवरी पहिल्यांदाच आपल्या नवऱ्याचं रूप पाहते आहे आणि त्याला पाहताच ती तिला धक्का बसतो आणि मग काय तिला आपलं रडू आवरत नाही. त्यामुळेच हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे आणि मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. official niranjanm87 इन्स्टाग्राम अकाऊंटवरील हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंटही येत आहेत. हे वाचा - पावलापावलांवर नोटांचं बंडल; नववधूचा गृहप्रवेश पाहून म्हणाल, अस्सं सासर मलाही हवं खरंतर तिने आपलं रडू आवरलेलं असतं आणि नवरा गाडीत बसताच आता आपली जाण्याची वेळ अखेर आली हे तिला समजतं आणि तिला रडू येतं.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Funny video, Viral, Viral videos, Wedding video