मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

बापरे! 2 महिने बाटलीत अडकला त्याचा Private part; अवस्था पाहून डॉक्टरांनी कापूनच टाकला

बापरे! 2 महिने बाटलीत अडकला त्याचा Private part; अवस्था पाहून डॉक्टरांनी कापूनच टाकला

2 महिन्यांत बाटलीत अडकलेल्या प्रायव्हेट पार्टची अवस्था भयंकर झाली होती.

2 महिन्यांत बाटलीत अडकलेल्या प्रायव्हेट पार्टची अवस्था भयंकर झाली होती.

2 महिन्यांत बाटलीत अडकलेल्या प्रायव्हेट पार्टची अवस्था भयंकर झाली होती.

    काठमांडू, 01 ऑक्टोबर : लहान मुलं नाकातोंडात काही ना काही घालत असतात. पण काही प्रौढ व्यक्तीची नको ते उद्योग करतात. भलताच प्रयोग करायला जातात आणि ते त्यांना चांगलंच महागात पडतं. सध्या नेपाळमधील (Nepal) अशाच एका व्यक्ती चर्चा आहे. ज्याने चक्क आपला प्रायव्हेट पार्ट (Private part) प्लॅस्टिक बाटलीत टाकला (Private part stuck in plastic bottle). तो असा अडकला आणि त्याची अवस्था झाली की शेवटी डॉक्टरांना तो कापूनच टाकावा लागला (Private part stuck in bottle). 45 वर्षांची ही व्यक्ती मनोरुग्ण असल्याचं सांगितलं जातं आहे. या व्यक्तीला डिप्रेशन आहे. लैंगिक सुखासाठी याआधीसुद्धा या व्यक्तीने आपला प्रायव्हेट पार्ट प्लॅस्टिक बाटलीत टाकला होता. पण यावेळी तो अडकला. जवळपास दोन महिने हा प्रायव्हेट पार्ट बाटलीत तसाच होता. ज्यामुळे या भागाचा रक्तप्रवाह खंडित झाला आणि प्रायव्हेट पार्ट सडला होता. हे वाचा - इथं 21 रात्र नग्नावस्थेत जंगलात राहतं कपल; तुम्ही पाहिलाय हा अजब रिअ‍ॅलिटी शो? डॉक्टरांनी सांगितलं की, लाज वाटत असल्याने या व्यक्तीने दोन महिने याबाबत कुणालाच काही सांगितलं नाही. पण नंतर वेदना वाढत गेल्या आणि शेवटी त्याला डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागली. तोपर्यंत प्रायव्हेट पार्ट सडला होता. त्यातून दुर्गंधीही येत होती. त्यामुळे डॉक्टरांना तो कापूनच टाकावा लागला. सर्जरीनंतर या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. हे वाचा - ...म्हणून जुळी मुलं जन्माला येतात; शास्त्रज्ञांनी सांगितलं कारण याआधी थायलँडमध्येही अशीच एक घटना समोर आली होती. एका 38 वर्षीय व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट टाळ्यात अडकला (Bangkok Man's Penis Gets Stuck in Padlock). ज्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे डॉक्टरांच्या मदतीने त्याची सुटका करण्यात आली. या व्यक्तीने तब्बल दोन आठवडे वेदना सहन केल्यानंतर आपल्या आईला याबाबत सांगितलं. त्याची आई आपल्या मुलाला तातडीने रुग्णालयात घेऊन गेली. येथे डॉक्टरांनी ऑपरेट करीत त्याची सुटका केली. मात्र टाळं हटविण्यात उशिर झाला होता. आता व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट कायमचा निकामी झाला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Nepal, PRIVATE part

    पुढील बातम्या