मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

इथं 21 रात्र नग्नावस्थेत जंगलात राहतं कपल; तुम्ही पाहिलाय का हा Weird reality tv show

इथं 21 रात्र नग्नावस्थेत जंगलात राहतं कपल; तुम्ही पाहिलाय का हा Weird reality tv show

महिला आणि पुरुष वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या गोष्टींना महत्व देतात.

महिला आणि पुरुष वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या गोष्टींना महत्व देतात.

ना डोक्यावर छप्पर, ना खाण्यासाठी पदार्थ, ना अंगावर कपडे; अशा अवस्थेत जंगलात 21 दिवस जंगलात राहण्याचं आव्हान.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 30 सप्टेंबर : सध्या रिअॅलिटी शोची (Reality show) क्रेझ खूप वाढते आहे. हे रिअॅलिटी शो फक्त नाचणं, गाणं यापुरतेच मर्यादित राहिले नाही. तर आता या पलिकडेही गेले आहेत. ज्यामध्ये बिग बॉस (Bigg boss), खतरों के खिलाडी (Khatron ke khiladi) अशा काही शोचा समावेश आहे. बिग बॉस म्हणजे भांडणाचा शो आणि खतरों की खिलाडी म्हणजे डेअरिंगचा शो अशीच या शोची ओळख आहे. पण या पलिकडेही एक विचित्र शो आहे (Weird Reality show) . ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. इथं तुम्हाला राहण्यासाठी छप्पर नसतं, खाण्यासाठी पदार्थ आणि अगदी अंग झाकण्यासाठी कपडेही नसतात. काय आश्चर्य वाटलं ना? (Naked and afraid)

हा एक विचित्र असा रिअॅलिटी शो आहे. जिथं तरुण-तरुणी एकमेकांना नग्न होऊनच पहिल्यांदा भेटतात आणि याच अवस्थेत 21 दिवस एकमेकांसोबत त्यांना राहायचं असतं.  आता सर्वजण नग्नावस्थेत म्हणजे इथं काहीतरी विचित्र होत असेल असं तुम्हाला वाटत असेल, तर तसं बिलकुल नाही. हा शो एक सर्व्हाइल शो आहे. जिथं कपलला कोणत्याही मदतीशिवाय 21 दिवस जंगलात राहावं लागतं.

हे वाचा - Romantic relationships मुळं शारीरिक आणि मानसिक आरोग्य राहतं चांगल - नवं संशोधन

त्यामुळे त्यांच्याकडे राहण्यासाठी घर नसतं, खाण्यासाठी काहीच नसतं आणि अंग झाकण्यासाठीही कपडे नसतात. या सर्वाची व्यवस्था स्पर्धकांना स्वतःच करावी लागते. ऊन, पाऊस, वारा अशा नैसर्गिक परिस्थितीचा सामना करावा लागतो. याशिवाय जंगलात विषारी कीटक आणि वन्यप्राण्यांपासून स्वतःचा बचाव करावा लागतो. 21 दिवस अशा परिस्थितीत राहून दाखवणं हेच सर्वात मोठं आव्हान असतं. आपल्याला हे सर्व वाचून घाम फुटला. विचार करा स्पर्धकांची प्रत्यक्षात काय अवस्था होत असेल. बहुतेक स्पर्धक हा शो मध्येच सोडून जातात.

शो सुरू होताच प्रत्येक स्पर्धकाला आपल्यासोबत फक्त एक आवश्यक उपकरणच सोबत नेण्याची परवानगी असते. ज्यामध्ये माचिस, कुऱ्हाड, लायटर अशा वस्तू असतात. अनेक देशांमध्ये या शोचं शूटिंग करण्यात आलं आहे. यामध्ये कुणीच होस्ट नसतो. स्पर्धकांसोबत फक्त एक कॅमेरामन असतो.

हे वाचा - नपुंसकत्वाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच; वेऴीच वैद्यकीय सल्ला ठरेल फायदेशीर

आता हा शो नेमका कोणता आणि कुठे पाहायला मिळेल, याची उत्सुकता तुम्हाला असेल. नेकेड अँड अफ्रेड असं या शोचं नाव आहे. हा शो डिस्कवरी चॅनेलवर प्रसारित होतो. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवरसुद्धा (Amazon Prime Video) तुम्ही हा शो पाहू शकता.

First published:

Tags: Couple, Entertainment, Reality show