मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

...म्हणून जुळी मुलं जन्माला येतात; शास्त्रज्ञांनी सांगितलं कारण

...म्हणून जुळी मुलं जन्माला येतात; शास्त्रज्ञांनी सांगितलं कारण

अ‍ॅमस्टरडॅममधल्या व्रीजे युनिव्हर्सिटीच्या (Vrije Universiteit in Amsterdam) संशोधकांनी जुळी मुलं होण्यामागचं नेमकं कारण शोधल्याचा दावा केला आहे.

अ‍ॅमस्टरडॅममधल्या व्रीजे युनिव्हर्सिटीच्या (Vrije Universiteit in Amsterdam) संशोधकांनी जुळी मुलं होण्यामागचं नेमकं कारण शोधल्याचा दावा केला आहे.

अ‍ॅमस्टरडॅममधल्या व्रीजे युनिव्हर्सिटीच्या (Vrije Universiteit in Amsterdam) संशोधकांनी जुळी मुलं होण्यामागचं नेमकं कारण शोधल्याचा दावा केला आहे.

नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर : आतापर्यंत आरोग्यशास्त्रात (Medical Science) प्रचंड संशोधन (Research) झालं आहे. अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे मानवी जीवन सुकर झालं आहे. अनेक दुर्मीळ आजारांवर उपचार उपलब्ध झाल्याने मानवी आयुमर्यादा वाढली आहे, मात्र काही गोष्टी आजही मानवी बुद्धीला उलगडलेल्या नाहीत. अशा अनेक रहस्यांबाबत अनेक वर्षांपासून संशोधन सुरू आहे. यापैकीच एक विषय म्हणजे जुळी मुलं (Birth of Twins) होण्याचा. गेली अनेक वर्षं याबाबत संशोधन सुरू आहे, पण दिसायला एकसारखी किंवा वेगवेगळी असणारी दोन बाळं एकाच वेळी जन्मण्यामागचं गूढ उलगडलेलं नव्हतं. आता मात्र या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

अ‍ॅमस्टरडॅममधल्या व्रीजे युनिव्हर्सिटीच्या (Vrije Universiteit in Amsterdam) संशोधकांनी जुळी मुलं होण्यामागचं नेमकं कारण शोधल्याचा दावा केला आहे. जुळी मुलं होण्याचा संबंध गर्भधारणेपासून प्रौढ वयापर्यंत टिकून राहणारे डीएनए (DNA) अर्थात मानवी जनुकांशी संबंधित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सुमारे 12 टक्के गर्भधारणांमध्ये जुळं होण्याची शक्यता असते. परंतु केवळ 2 टक्के केसेसमध्ये जुळ्या मुलांचा जन्म होतो. याला ‘व्हॅनिशिंग ट्विन सिंड्रोम’ म्हणतात, असं या संशोधकांनी आपल्या संशोधन अहवालात नमूद केलं आहे.

आतापर्यंत एकसारखी दिसणारी जुळी मुलं होणं हा योगायोग असल्याचं मानलं जात होतं, पण आता या संशोधनानं त्याचा संबंध डीएनएशी असल्याचं सिद्ध केलं आहे. जुळी मुलं होणार का हे डीएनएवरून कळू शकतं असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. मात्र हे डीएनए सर्वसाधारणपणे कसे ओळखता येतील हे अद्याप शोधता आलेलं नाही. याबाबतीत आणखी संशोधन करण्याची गरज असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे जुळी मुलं होण्यासाठी कारणीभूत ठरणारे डीएनए आई-वडिलांकडून आनुवंशिकतेनं (Hereditary) मिळतात की बीजफलन (Egg Split) होताना निर्माण होतात याची खात्री करणं देखील बाकी असल्याचं शास्त्रज्ञांनी नमूद केलं आहे.

तुमच्या बाळाला खूप स्वच्छ-स्वच्छ ठेवताय? प्रतिकारशक्तीवर होऊ शकतो असा परिणाम

या संशोधनासाठी, संशोधकांनी अगदी एकसारख्या जुळ्या मुलांच्या जीनोममध्ये 834 निकषांची तपासणी केली. ही जुळी मुलं स्त्रीच्या गर्भाशयातल्या बीजांचं दोन गर्भांमध्ये (Embryos) विभाजन झाल्यानं जन्माला आली होती. जुळ्या मुलांचे आनुवंशिक गुण जन्मजात रोगांवरच्या उपचारांमध्ये मदत करू शकतात, असंही या संशोधनात दिसून आलं आहे. यासाठी शास्त्रज्ञांनी एकसारख्या दिसणाऱ्या 3000 हून जास्त जुळ्या मुलांचे डीएनए स्कॅन करून रक्त आणि चीक सेलचे नमुने घेतले.

अलीकडच्या काळात पूर्वीपेक्षा जास्त जुळी मुलं जन्माला येत असल्याचं आढळलं आहे. 1980च्या दशकानंतर प्रति दहा हजार गर्भधारणांपैकी जुळी मुलं होण्याचं प्रमाण 9 ते 12 टक्के झालं आहे. सध्या प्रत्येक 42 मुलांमागे एका जुळ्याचा जन्म होतो. जगभरात दर वर्षी सुमारे 1.6 दशलक्ष जुळी जन्माला येतात. जगातल्या सर्व जुळ्या मुलांपैकी 80 टक्के जुळी आशिया (Asia) आणि आफ्रिकेत (Africa) आढळतात. ब्रिटनमध्ये (UK) दर 1000 प्रसूतींमध्ये 15 ते 17 जुळी असतात.

नपुंसकत्वाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच; वेऴीच वैद्यकीय सल्ला ठरेल फायदेशीर

यामागे आयव्हीएफ अर्थात इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF), ओव्हॅरियन सिम्युलेशन आणि एमएआर अर्थात कृत्रिम गर्भधारणा, तसंच स्त्रियांच्या गर्भधारणेला होणारा उशीर अशी महत्त्वाची कारणं आहेत. आजकाल मुलींच्या लग्नाचं वयही वाढलं आहे. त्यामुळे अपत्य जन्माला घालण्याचं वयही वाढलं आहे. तसंच रजोनिवृत्तीच्या जवळ असलेल्या स्त्रियांमधल्या हार्मोनल बदलांमुळे त्यांच्या शरीरात ओव्ह्युलेशन दरम्यान एकापेक्षा जास्त बीज निर्मितीला प्रोत्साहन मिळतं, असं संशोधकांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Pregnancy, Pregnant woman