मुंबई, 02 डिसेंबर : काही खाल्ल्यानंतर बऱ्याचदा ढेकर (Burp) येते. ढेकर आली म्हणजे आपण खाल्लेलं पचलं असं सर्वसामान्यपणे मानलं जातं. काही लोकांच्या ढेकरचा आवाज खूप मोठा असतो. अशी कुणी मोठ्याने ढेकर केली आज जास्तच खाल्लं वाटतं, असं मस्करीत म्हटलं जातं. पण एखाद्याच्या ढेकरचा आवाज मोठा म्हणजे फार फार तर किती मोठा असू शकतो (Loudest burp)? कधी विचार केला आहे का? एका व्यक्तीच्या ढेकरचा आवाज इतका मोठा आहे की जगातील सर्वात मोठी ढेकर देऊन (Loudest burp world record) या व्यक्तीने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे (Massive Burp Breaks Record) .
विश्वविक्रम तोसुद्धा ढेकरचा (Weird World Records) . कदाचित तुमच्या हे पचनी पडणार नाही. पण हे खरं आहे. जगातील सर्वात मोठ्या आवाजात ढेकर देणाऱ्या एका व्यक्तीची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (Guinness World Record) नोंद झाली आहे. गिनीज बुकमध्ये नाव ही छोटी गोष्ट नाही. पण या व्यक्तीने फक्त खाऊन खाऊन ढेकर देऊन आपल्या नावाची तिथं नोंद केली आहे. या व्यक्तीचं नाव आहे नेविले शार्प (Neville Sharp).
हे वाचा - अजबच! कोणतं ब्युटी प्रोडक्ट्स नाही; 'थप्पड' आहे कोरिअन महिलांच्या सौंदर्याचा राज
ऑस्ट्रेलियाच्या डार्विनमध्ये राहणारा 45 वर्षांचा नेविले आता जगातील सर्वात मोठी ढेकर देणारी व्यक्ती म्हणून प्रसिद्ध झाला आहे. नेविलेला त्याच्या मोठ्या बहिणीने ढेकर काढायला शिकवलं होतं. लहानपणापासून तो मोठ्या आवाजात ढेकर द्यायचा. त्याच्या या कौशल्याचा रेकॉर्ड करण्याची आयडिया त्याच्या बायकोने त्याला दिली. त्यानंतर त्याने सर्वात मोठी ढेकर म्हणून गिनीज बुकमध्ये रेकॉर्डकरण्याची नोंदणी केली.
View this post on Instagram
एका स्टुडिओत त्याच्या ढेकरची टेस्ट करण्यात आली. जेणेकरून त्याचा आवाज योग्यपद्धतीने तपासता येईल. एका डिव्हाइमार्फत त्याच्या ढेकरचा आवाज मोजण्यात आला. त्याच्या ढेकरचा आवाज 112.4 डेसिबल इतका आहे. हा आवाज ट्रॉम्बोनइतका किंवा इलेक्ट्रिक ड्रिलपेक्षाही जास्त असू शकतो.
हे वाचा - तुमच्या एका नजरेत कुणीही पडेल तुमच्या प्रेमात! तरुणीने दाखवला डोळ्याचा असा इशारा
याआधी इंग्लंडच्या पॉल हन नावाच्या व्यक्तीने सर्वात मोठ्या ढेकरचा रेकॉर्ड केला होता. त्याने 109.9 डेसिबल ढेकर घेतली होती. आधीच्या रेकॉर्डच्या तुलनेत नेविलेच्या ढेकरचा आवाज तीन प्वॉईंटने जास्त आहे. तीन प्वॉईंट जास्त आवाज करून नेविलने पॉलचा रेकॉर्ड तोडला आहे. 12 वर्षांनी हा नवा रेकॉर्ड झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Lifestyle, World news, World record