मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

अजबच! कोणतं ब्युटी प्रोडक्ट्स, कॉस्मेटिक सर्जरी नाही तर 'थप्पड' आहे कोरिअन महिलांच्या सौंदर्याचा राज

अजबच! कोणतं ब्युटी प्रोडक्ट्स, कॉस्मेटिक सर्जरी नाही तर 'थप्पड' आहे कोरिअन महिलांच्या सौंदर्याचा राज

दररोज 50 थप्पड मारण्याचा फॉर्म्युला कोरियन महिला आवर्जून वापरतात.

दररोज 50 थप्पड मारण्याचा फॉर्म्युला कोरियन महिला आवर्जून वापरतात.

दररोज 50 थप्पड मारण्याचा फॉर्म्युला कोरियन महिला आवर्जून वापरतात.

मुंबई, 02 डिसेंबर : आपण सुंदर दिसावं असं बहुतेक तरुणींना वाटतं (Beauty tips). त्यासाठी तरुणी काय काय करत नाहीत. मेकअप करतात, ब्युटी ट्रिटमेंट घेतात, गरज पडल्यास कॉस्मेटिक किंवा प्लॅस्टिक सर्जरी करतात. पण कोरियन महिला (Korean Women) शेकडो वर्षांपासून एका विचित्र थेरपीचा (Therapy) वापर करत आहेत. स्लॅप (Slap) म्हणजे थप्पड मारून सौंदर्य वाढवणारी थेरपी (Slap Therapy) असं या विचित्र थेरपीचं नाव आहे.

कोरियन महिला खूपच सुंदर दिसतात (Korean Women beauty secrets). त्यांचा चेहरा अतिशय नाजूक, चमकदार असा दिसतो. पण त्यांच्या अशा सौंदर्याचा राज आहे ते म्हणजे थप्पड.  गालावर किमान 50 वेळा थप्पड मारून घेतली तर त्वचा (Skin) चमकदार होते आणि सौंदर्य वाढतं, असा विश्वास या महिलांना आहे. ही थेरपी कोरियामध्ये सर्वसामान्य मानली जाते. वाढत्या वयाच्या खुणा चेहऱ्यावर दिसू नयेत यासाठीदेखील ही थेरपी उपयुक्त ठरते.

सौंदर्य वाढवण्यासाठी गालावर जोरदार थप्पड मारावी, असा समज तुम्ही करून घेत असाल तर तो चुकीचा आहे. कारण ही थेरपी करताना दोन्ही गालांवर दोन्ही हातांनी हलकेच थप्पड मारली जाते. ही थेरपी मूळची कोरियामधली असली तरी ती आता संपूर्ण जगात वापरली जात आहे. या थेरपीमागची वैज्ञानिक संकल्पना किंवा तर्कशास्त्र आता लोकांना पटू लागलं आहे.

हे वाचा - तुमच्या एका नजरेत कुणीही पडेल तुमच्या प्रेमात! तरुणीने दाखवला डोळ्याचा असा इशारा

या थेरपीमागं अतिशय सोपा असा तर्क आहे. तुम्ही तुमच्या गालांवर हलक्या हातानं थप्पड मारली तर चेहऱ्यावरच्या प्रत्येक भागातला रक्तप्रवाह (Blood Circulation) वाढतो आणि त्वचा स्वच्छ होण्यास मदत होईल. त्वचा स्वच्छ झाली तर चेहऱ्याच्या विविध भागांपर्यंत रक्त पोहोचेल आणि चेहरा तजेलदार दिसू लागेल. कोरियातल्या महिला दररोज या थेरपीचा वापर सौंदर्यवृद्धीसाठी करतात.

कोरियन महिला अगदी लहानपणापासून ही थेरपी वापरतात. कोरियातले पुरुषदेखील (Men) या थेरपीचा वापर करतात. या थेरपीमुळे कोरियन व्यक्तीचा चेहरा अगदी लालसर आणि ताजातवाना दिसतो. या थेरपीमुळे त्वचेचं पोषण होतं. नैसर्गिक दृष्टिकोनातूनदेखील ही थेरपी फायदेशीर आहे.

हे वाचा - दाढी वाढवणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट? डॉक्टरांनी दिलं उत्तर

कोरिया आणि चीनमधल्या महिला वाढतं वय चेहऱ्यावर दिसू नये, यासाठी ही थेरपी उपयुक्त मानतात. या थेरपीचा योग्य पद्धतीनं वापर केल्यास चेहऱ्यावरची त्वचा दीर्घ काळ तरुण आणि तजेलदार राहते, असा या महिलांना विश्वास आहे. त्यामुळे ही थेरपी अँटी एजिंग थेरपीही (Anti Ageing) मानली जाते. या थेरपीमुळे त्वचा मऊ मुलायम होते आणि त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत.

ही थेरपी अतिशय उपयुक्त असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. कोरियन महिला अनेकदा ही थेरपी करताना आपल्या गालावर जोरात थप्पडदेखील मारतात. दररोज 50 थप्पड मारण्याचा हा फॉर्म्युला कोरियन महिला आवर्जून वापरतात. यामुळे रक्तप्रवाह सुधारून गालांचे स्नायू मजबूत होतात आणि गालांची पकड किंवा घट्टपणा कायम राहतो, असा कोरियन महिलांचा समज आहे.

First published:

Tags: Beauty tips, Lifestyle, South korea, Woman