मुंबई, 01 डिसेंबर : पहिल्याच नजरेत प्रेमात पडणं (Love at First Sight), नजरेनं घायाळ करणं, नजरेचा इशारा प्रेम (Love) आणि नजर यांचा वारंवार उल्लेख पाहायला मिळतो (Love tips). पण खरंतर कुणालाही आपल्याला प्रेमात पाडण्यासाठी (Easy Tips for Falling in Love) प्रत्यक्षात मात्र नजरेची जादू क्वचितच चालताना दिसते. पण एका तरुणीने आता डोळ्यांचे असे इशारे दाखवले आहेत (Eye Trick For Instant Love). ज्यामुळे तुमच्या एका नजरेतच कुणीही तुमच्या प्रेमात पडू शकेल.
एका तरुणीने कुणालाही लगेच आपल्या प्रेमात पाडण्यासाठी डोळ्यांचे काही ट्रिक्स दाखवल्या आहेत. सोफी रोझ नावाच्या तरुणीने आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आपली एक सिक्रेट आय ट्रिक दाखवली आहे. @sophieroselloyd नावाच्या टिकटॉक ( TikTok) अकाऊंटवर तिने आपला व्हिडीओ पोस्ट केला आहे. ही आय ट्रिक वापरून तुम्हाला आवडत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करू शकता, असा दावा तिने केला आहे.
हे वाचा - काय म्हणावं याला! हटके प्रपोज करण्याच्या नादात तरुणाने Private part ची लावली वाट
सोफीने दाखवलेल्या ट्रिकमध्ये डोळ्यांनी हलकासा इशारा करायचा आहे. तिने सांगितल्यानुसार सर्वात आधी तुम्ही समोरील व्यक्तीच्या उजव्या डोळ्यात एक सेकंद पाहा. त्यामुळे तुमची नजर त्या व्यक्तीच्या ओठांच्या डाव्या बाजूला दीड सेकंदासाठी न्या. त्यानंतर लगेच त्या व्यक्तीच्या उजव्या डोळ्यात दोन सेकंद पाहा.
ती व्यक्ती काहीतरी बोलते आहे आणि तुम्ही तिचं ऐकत आहात, त्याचवेळी तुम्हाला असं करायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी ती व्यक्ती फक्त तुमच्यासोबतच असेल आणि इतर कुणीच नसेल तेव्हाच ही ट्रिक वापरायची आहे. कारण इतर कुणी असल्यास त्या व्यक्तीचं लक्ष इतर ठिकाणी विचलित होऊ शकतं.
हे वाचा - 27 वर्षीय तरुणीला होता बॉयफ्रेंडवर संशय; रागात उचललं असं पाऊल की सगळेच शॉक
या डोळ्यांच्या इशाऱ्यामुळे अशी जादू होईल की समोरील व्यक्ती तुमच्याकडे येईल. जर योग्य व्यक्तीवर या ट्रिकचा प्रयोग केला तर नक्कीच ती व्यक्ती तुमच्या प्रेमात पडेल असा दावा सोफीने केला आहे. मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार ज्या व्यक्ती ओळखीच्या आहेत. त्यांच्यावर ही ट्रिक चांगलं काम करते. अनोळखी व्यक्तीवर ही ट्रिक वापरू नका, असा सल्लाही सोफीने दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Couple, Love, Relationship, Viral