Home /News /lifestyle /

आपल्या GF सोबत हे काम करण्यासाठी या तरुणावर पुरुष उधळतात पैसे; आठवड्यालाच कमावतो लाखो रुपये

आपल्या GF सोबत हे काम करण्यासाठी या तरुणावर पुरुष उधळतात पैसे; आठवड्यालाच कमावतो लाखो रुपये

फोटो सौजन्य : Tiktok/@iceyxavier

फोटो सौजन्य : Tiktok/@iceyxavier

बहुतेक पुरुष या तरुणाला आपल्या गर्लफ्रेंडसोबत एक काम करायला भाग पाडतात आणि त्यासाठीच त्याला हजारो रुपये देतात.

    मॉंटगोमेरी, 08 जानेवारी : महिलांवर पैसे उधळणारे पुरुष तुम्हाला माहिती असतील पण पुरुषांनी कोणत्या पुरुषावरच पैसे उधळले असं तुम्हाला सांगितलं तर आश्चर्यच वाटेल. त्यातही जर हे पुरुष आपल्या गर्लफ्रेंडसोबत या तरुणाला एक काम करायला भाग पाडतात आणि त्यासाठीच त्याला हजारो रुपये देतात, असं सांगितलं तर ते आणखी शॉकिंग वाटेल. पण याच मार्गाने हा तरुण आठवड्याला तब्बल लाखो रुपये कमावतो. महिला असो वा पुरुष आपला पार्टनरची दुसऱ्या कुणासोबत जास्त जवळीक वाढली तर अनेकांना आवडत नाही (Man earns by flirting with woman). असं असताना किती तरी पुरुष या तरुणाला आपल्या गर्लफ्रेंडला या तरुणाच्या भरवशावर सोडतात (Man earns by woman loyalty test). तिच्यासोबत एक असं काम करायला भाग पाडतात, ज्यासाठी ते त्याला पैसेही देतात. हे काम म्हणजे लॉयल्टी चेक करणं. कोणत्याही नात्यात विश्वास, एकनिष्ठता खूप महत्त्वाची असते. पण हल्ली रिलेशनशिपमध्ये यापेक्षा जास्त फसवणूक आणि संशयच असतो. याचाच फायदा होतो आहे तो अलबामाच्या येर्कवूडमध्ये राहणारा 20 वर्षांचा जेव्हिअर लाँगला. ज्याच्याकडून पुरुष आपल्या पार्टनरची लॉयल्टी टेस्ट करून घेतात. आज तकने डेली मेलच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार जेव्हिअरच्या फॉलोअर्सने इन्स्टाग्रामवर त्याच्याकडे मदत मागितली. त्याला आपल्या गर्लफ्रेंडची लॉयल्टी पाहायची होती. जेव्हिअरने तसं केलं. त्यानंतर त्याने लॉयल्टी टेस्टबाबत टिकटॉकवर सांगितलं. त्याचा हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की किती तरी लोक त्याच्याकडे मदत मागू लागले. हे वाचा - या महिलेला बघताच प्रेमात पडतात पुरुष; पण तिचं 'हे' सत्य जाणून लगेचच काढतात पळ आपल्या पार्टनरची लॉयल्टी टेस्ट करण्यासाठी बऱ्याच मागणी येतात, यासाठी लोक पैसेही देता. काही लोक फक्त यासाठी लॉयल्टी टेस्ट करतात कारण त्यांची गर्लफ्रेंड चीट करताना पकडली जावी आणि ते तिच्यासोबच सहज ब्रेकअप करतील. तर काही जणांना ज्या महिलेशी ते लग्न करत आहेत, ती त्यांच्याशी एकनिष्ठ राहिल की नाही हे पाहायचं असतं. सुरुवातीला तो महिलांसोबत सोशल मीडियावर फ्लर्ट करतो. त्यावर महिलांची प्रतिक्रिया कशी येते ते पाहतो. त्यानंतर त्यांच्यासोबच जवळीक वाढण्याचा प्रयत्न करतो आणि यातूनच त्या महिला आपल्या पार्टनरसोबत एकनिष्ठ आहेत की नाही हे समजतं. जर एखादी महिला आपल्या बॉयफ्रेंडला न सांगता तिचा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर देते तर ती फेल ठरते. या लॉयल्टी टेस्टचा निकाल तो टिकटॉकवर शेअर करतो. वाइस न्यूजशी बोलताना त्याने सांगितलं, कधी कधी मी मोफत ही टेस्ट करतो. पण माझ्याकडे इतक्या रिक्वेस्ट येतात की मला चार्ज घ्यावा लागतो. एका टेस्टसाठी तो 744 रुपये घेतो. जास्तीत जास्त लोक मला 7 हजार रुपयांपर्यंत पैसे पाठवतात.  दिवसाला तो 14 हजारांपेक्षा जास्त रुपये कमावतो. आठवड्याला 1 लाख 48 हजार रुपये कमवतो. यामुळे माझी चांगली कमाई होते. मला नोकरीचीही गरज नाही. हे वाचा - नवविवाहित जोडप्यांनी या 5 गोष्टींची काळजी नक्की घ्यावी, सुखी संसाराचं सोपं सूत्र जर महिला टेस्टमध्ये फेल झाली तर तो ज्यांनी त्या महिलेची टेस्ट करण्यासाठी पैसे दिले आहेत, त्यांना त्यांचे पैसे परत करतो. आतापर्यंत सर्वात जास्त चार्ज मला 55 हजार रुपयांचा मिळाला आहे. ती व्यक्ती श्रीमंत होती. पण त्याच्या गर्लफ्रेंडची टेस्ट फेल झाली. तरी त्याने मला ती रक्कम पाठवली, असं त्याने सांगितलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Couple, Lifestyle, Relationship

    पुढील बातम्या