Home /News /lifestyle /

Tips For Newlyweds : नवविवाहित जोडप्यांनी या 5 गोष्टींची काळजी नक्की घ्यावी, सुखी संसाराचं सोपं सूत्र

Tips For Newlyweds : नवविवाहित जोडप्यांनी या 5 गोष्टींची काळजी नक्की घ्यावी, सुखी संसाराचं सोपं सूत्र

Relationship Tips For Newlyweds : पती-पत्नी दोघांनाही एकमेकांच्या सुख-दु:खाची काळजी घ्यावी लागते. तरच सुरक्षित आणि प्रेमळ नात्याचा (Relationship) मार्ग सुकर होतो. पण यादरम्यान एकमेकांना जाणून घेणं सर्वांत महत्त्वाचं असतं.

    मुंबई, 07 जानेवारी : लग्न हे एक असं बंधन आहे ज्यामध्ये शांती, प्रेम आणि विश्वास खूप महत्त्वाचा आहे. पण हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा लग्न (Wedding) झाल्यानंतरचे सुरुवातीचे दिवस चांगले जातात. नवीन लग्न (Newlyweds) झालं की आयुष्यात अनेक बदल होतात. पती-पत्नी दोघांनाही एकमेकांच्या सुख-दु:खाची काळजी घ्यावी लागते. तरच सुरक्षित आणि प्रेमळ नात्याचा (Relationship) मार्ग सुकर होतो. पण यादरम्यान एकमेकांना जाणून घेणं सर्वांत महत्त्वाचं असतं. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये जोडीदाराला (life partner) जाणून घेणं, समजून घेणं, हळूहळू त्याच्या सवयी, वागणूक यांची ओळख करून घेणं, एकमेकांच्या आवडी-निवडी समजून घेणं (Relationship Tips For Newlyweds) खूप गरजेचं असतं. जर तुम्ही ही पहिली पायरी सहज पार केली, तर तुमचं वैवाहिक जीवन (married life) अखंड राहू शकतं हे समजून घ्या. सुरुवातीपासूनच त्यांचं म्हणणं जपलं तर ही गाडी आयुष्यभर सुरळीत चालेल. जाणून घेऊ, नुकतंच लग्न झालेल्या जोडप्यांनी कोणत्या गोष्टी (Relationship Tips) लक्षात ठेवायला हव्यात. 1.संवाद आवश्यक बहुतेक तुटणाऱ्या नातेसंबंधांमध्ये खुला संवाद नसणं हे सर्वात महत्त्वाचं कारण असतं. नातं घट्ट करायचं असेल तर एकमेकांशी मनमोकळेपणानं बोला. तुमची भीती आणि अनिश्चितता एकमेकांसोबत शेअर करा. असं केल्यानं परस्परांमधील गैरसमज दूर होतील आणि तुम्ही दोघेही चांगल्या निर्णयावर पोहोचाल. 2. एकमेकांना सारखं सुनावू नका किंवा टोचून बोलू नका जेव्हा आपण नवीन नातेसंबंधात प्रवेश करता, तेव्हा दोघांनीही काही गोष्टी बाबी समजूतदारपणे जुळवून घेणं आवश्यक असतं. त्यामुळं एकमेकांना लहान-सहान गोष्टींवरून एकमेकांना सारखं सुनावू नका किंवा टोचून बोलू नका. वारंवार टोकण्याच्या सवयीमुळं आपापसात मतभेद निर्माण होऊ लागतात आणि प्रकरण चिघळू लागतं. 3. जीवनाबद्दलचा दृष्टीकोन आणि प्लॅन्स एकमेकांशी शेअर करत रहा जीवनाबद्दलचा आपापला दृष्टीकोन आणि प्लॅन्स तुमच्या जोडीदारासोबत शेअर करा आणि तुमच्या जोडीदाराची योजना देखील काळजीपूर्वक ऐका. असं केल्यानं तुमच्या पार्टनरला हे समजेल की, तुम्हाला त्याच्या/ तिच्या गोष्टी जाणून घेण्यात रस आहे. ते त्यांचा दृष्टिकोन तुमच्यासमोर उघडपणे मांडू शकतील आणि तुम्हाला एकमेकांच्या विचारसरणी समजून घेण्याची संधीही मिळेल. हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात 4. स्पेस द्या लग्न झालं असलं तरी तुम्ही एकमेकांना त्यांच्या आयुष्यात स्पेस देणं आवश्यक आहे. प्रत्येक वेळी हस्तक्षेप करणं योग्य नाही. एकमेकांची काळजी घ्या पण एकमेकांच्या आयुष्यात ढवळाढवळ टाळा. हे वाचा - Sexual Health : नवीन-नवीनच लग्न झालं असेल तर चुकूनही या 5 गोष्टी खाऊ नका; पश्चातापाची वेळ येईल 5.कौटुंबिक नातं तयार करा लग्न हे दोन व्यक्तींमध्येच नाही तर, दोन कुटुंबांमध्येही असतं. तुमचं नातं तुमच्या जोडीदाराशी आणि त्याच्या कुटुंबाशी आहे. जोडीदाराच्या कुटुंबीयांना भेटून गप्पा मारा. यामुळं तुमचं त्यांच्यासोबतचं नातंही घट्ट होईल आणि त्यांच्याशी बोलून तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दलही बरेच काही कळेल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Relationship, Relationship tips

    पुढील बातम्या