मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

धक्कादायक! मांसाच्या एका छोट्याशा तुकड्यामुळे गेला जीव; तरुणाचा तडफडून मृत्यू

धक्कादायक! मांसाच्या एका छोट्याशा तुकड्यामुळे गेला जीव; तरुणाचा तडफडून मृत्यू

मांसाचा तुकडा खाताच तरुणाचा श्वास गुदमरला. (प्रतीकात्मक फोटो)

मांसाचा तुकडा खाताच तरुणाचा श्वास गुदमरला. (प्रतीकात्मक फोटो)

मांसाचा तुकडा खाल्ल्यानंतर तरुणाला थेट रुग्णालयात दाखल करण्याची वेळ ओढावली.

  • Published by:  Priya Lad
लंडन, 16 ऑगस्ट : खाताना नीट खाल्लं नाही किंवा नीट काळजी घेतली नाही तर खाणंही आपल्या जीवावर बेतू शकतं. असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. मांसाच्या एका तुकड्यामुळे एका तरुणाचा जीव गेला आहे. मांसाचा एक तुकडा खाताच तरुणाचा तडफडून मृत्यू झाला आहे. यूकेच्या हेलवूडमधील हे धक्कादायक प्रकरण आहे. 26 वर्षांचा मार्टिन पीटर वीअर हेलबँकच्या मर्सी व्ह्यू पब्लिक हाऊसमध्ये लंचसाठी गेला होता. तो मांस खात होता. खाता खाता एक तुकडा त्याच्या घशात अडकला. त्यानंतर त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्याला तात्काळ विस्टन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण बरेच प्रयत्न करूनही डॉक्टरांना त्याचा जीव वाचवता आला नाही. या प्रकरणाच्या तपासासाठी एक समिती गठीत करण्यात आली. या समितीने दिलेल्या माहितीनुसार  मार्टिनला एक समस्या होती, ज्यामुळे त्याला खाणं गिळण्यात अडचण येत होती. श्वास कोंडल्याने त्याला हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला. रिपोर्टनुसार 10 एप्रिल 2022 रोजी ही घटना घडली. मात्र आता 15 ऑगस्टला सेफ्टन कोरोनरच्या कोर्टात या प्रकरणाची  सुनावणी झाली, त्यावेळी तपास समितीने याची माहिती दिली आहे. हे वाचा - 800 रुपये देऊन आवडत्या कबाबचा आस्वाद घेताना मोठी tragedy; दातांचा आकारच बदलला! जूनमध्येही थायलंडमध्ये एका तरुणीचा असाच मृत्यू झाला.  27 वर्षांची अरिसारा कार्डेचो (Arisara Karbdecho) ही इंटरनेट सेन्सेशन होती. एलिस या नावानं ओळखली जाणारी लोकप्रिय कॉस्प्लेअर अरिसारा हिला मार्चमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी घशात अन्न अडकल्याने तिला श्वसनास (Respiration) अडथळा निर्माण झाला होता. डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, तिच्या आईनं सांगितलं की अरिसारा पारंपरिक थाई फूड, पोर्क कबाब (Pork Kebab) आणि चिकट भात खाण्याचा सराव करत होती. एकदा तिनं हे पदार्थ खाऊन बघितले; पण कबाबमधील मांसाचा (Meat) तुकडा तिच्या घशात अडकला. त्यामुळे श्वास घेणं अवघड झालं आणि तिला तातडीने रुग्णालयात भरती करावं लागलं. मुलीला रुग्णालयात आणण्यासाठी नऊ मिनिटं उशीर झाला आणि त्यामुळे तिच्या मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला, असं डॉक्टर म्हणाले. हे वाचा - ...अन् उभ्या उभ्या निर्जीव पुतळा झाली जिवंत माणसं; पाहा मृत्यूचा भयावह LIVE VIDEO असा प्रकार अन्य कोणाबाबतीत घडू नये, यासाठी या महिलेच्या आईनं सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.
First published:

Tags: Health, Lifestyle, Uk

पुढील बातम्या