बरेचदा असे घडते की, लोक त्यांच्या आवडत्या अन्न पदार्थाचा आस्वाद घेत असतात. मात्र, त्याचवेळी त्याच्यामध्ये काही घाण, किडा किंवा खडा येतो आणि खाण्याचा संपूर्ण मूडच जातो. असाच काहीसा प्रकार इंग्लंडमधील एका कबाब खाणाऱ्या महिलेसोबत घडला. पण तिच्या कबाबमध्ये खडे नव्हते, तर त्याहूनही भयानक गोष्ट बाहेर आली, ज्यामुळे नंतर तिचे दातच तुटले. मिरर वेबसाइटने दिलेल्या अहवालानुसार, क्रैडले हीथ (Cradley Heath) येथील रहिवासी 34 वर्षाच्या महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. ही घटना अशी आहे की, या घटनेमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसणार आहे. या महिलेने वेस्ट मिडलँड्समधील सँडवेल येथे असलेल्या सीयर्स फिश अँड चिप्सच्या दुकानातून 800 रुपये किमतीत कबाब आणि नानचा कॉम्बो खरेदी केला होता. यानंतर ती घरी आली आणि आनंदाने या जेवणाचा आनंद घेत होती. मात्र, कबाब खात असताना तिच्यासोबत मोठी tragedy झाली. कबाब खात असताना एक कडक वस्तू तिच्या तोंडात आली आणि यामुळे तिला खूप त्रास होऊ लागला. यानंतर या महिलेने दातालील ती कडक वस्तू बाहेर काढली तो लोखंडी बोल्ट होता. महिलेने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, काही तोंडी खाल्ल्यानंतर तिचे दात खूप जड झाले होते, त्यामुळे तिचे पुढचे दोन दात खालून तुटले. त्यांच्याकडे पाहिल्यावर असे वाटत होते की, जणू ते घासले गेले असावेत. हा बोल्ट कबाबमध्ये अडकला होता. हॉटेल प्रशासनाने दिलं भलतंच उत्तर - यानंतर तिने लगेचच रेस्टॉरंटमध्ये फोन करुन तक्रार केली. तिला असे वाटले होते, ते लोक लवकरच याप्रकरणी कारवाई करतील मात्र, त्या लोकांनी असे सांगितले की, तुम्ही हा बोल्ट फेकू नका कारण तो कबाब बनविणाऱ्या मशीनचा आहे. आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये नवीन पार्सल पाठवू. यानंतर महिलेने तीन तास वाट पाहिली आणि जेव्हा कुणीच आले नाही तेव्हा तिने एनवायरमेंटल हेल्थ डिपार्टमेंट सोबत संपर्क केला. ही घटना 24 जूनची आहे आणि डिपार्टमेंट कडून महिलेला 3 ऑगस्टला फोन आला होता. त्यांनी सांगितले की, रेस्टॉरंटने आपली चूक मान्य केली आहे. तसेच चुकीमुळे मशीनमधील बोल्ट कबाबमध्ये पडला होता. हेही वाचा - व्हायोलिनच्या बहाण्याने पळवून नेलं, 6 महिन्यांनी विद्यार्थिनीसोबत पकडलं या अवस्थेत; बायकोनेही घेतला बदला तसेच या प्रकरणी रेस्टॉरंट प्रशासनाने असेही म्हटले की, त्यांनी आपली चूक मान्य केली आहे. तसेच त्यांनी महिलेची माफीही मागितली आहे. इतकेच नव्हे तर ते तिला 9 हजार रुपयाचे फूड व्हाऊचरही द्यायला तयार होते. मात्र, ही महिला जास्त पैसे मागत होती. नंतर तिने मेसेज करुन कमी पैसे मागितले होते. दरम्यान, हे प्रकरण आता न्यायालयात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







