नवी दिल्ली, 10 जून : घाईघाईत जेवू नका, अन्यथा अन्न घशात अडकू शकतं, अशा सूचना नेहमीच दिल्या जातात. परंतु, लोक अनेकदा अशा सूचनांकडे लक्ष देत नाहीत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना जेवण पटकन उरकायचं असतं. अशा स्थितीत समस्या निर्माण होणं स्वाभाविक आहे.
अलीकडे, थायलंडमधल्या एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसोबत (Social Media Influencer) असंच काहीसं घडलं. या इन्फ्लुएन्सरला कबाब (Kebab) आणि भात (Rice) खाणं महागात पडलं आणि आपला जीव गमवावा लागला. कबाब खाऊन कोणाचा मृत्यू कसा होऊ शकतो?, असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात येईल; पण आम्ही थायलंडमधल्या (Thailand) ज्या महिलेविषयी सांगत आहोत, तिच्याबाबत असंच घडलं आहे. घशात अन्न अडकल्यानं या महिलेचा मृत्यू (Death) झाला. असा प्रकार अन्य कोणाबाबतीत घडू नये, यासाठी या महिलेच्या आईनं सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. 27 वर्षांची अरिसारा कार्डेचो (Arisara Karbdecho) ही इंटरनेट सेन्सेशन होती आणि तिच्या मृत्यूने लोकांना हादरवून सोडलं आहे. एलिस या नावानं ओळखली जाणारी लोकप्रिय कॉस्प्लेअर अरिसारा हिला मार्चमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी घशात अन्न अडकल्याने तिला श्वसनास (Respiration) अडथळा निर्माण झाला होता.
घशात अडकला मांसाचा तुकडा
डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, 57 वर्षांच्या आईनं सांगितलं अरिसारा पारंपरिक थाई फूड, पोर्क कबाब (Pork Kebab) आणि चिकट भात खाण्याचा सराव करत होती. एकदा तिनं हे पदार्थ खाऊन बघितले; पण कबाबमधील मांसाचा (Meat) तुकडा तिच्या घशात अडकला. त्यामुळे श्वास घेणं अवघड झालं आणि तिला तातडीने रुग्णालयात भरती करावं लागलं. मुलीला रुग्णालयात आणण्यासाठी नऊ मिनिटं उशीर झाला आणि त्यामुळे तिच्या मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला, असं डॉक्टर म्हणाले.
महिलेच्या आईनं तरुणांना केलं सावध
दोन महिने रुग्णालयात लाईफ सपोर्टवर राहिल्यानंतर तिचं 6 जून रोजी निधन झालं. 2015 मध्ये अरिसाराने अवघ्या तीन आठवड्यांत 9 किलो वजन (Weight) कमी करून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. त्यावेळी एका डाएट फूड कंपनीच्या मालकानं तिला वजन कमी करण्याचं आव्हान दिलं होतं. या बदल्यात तिला लाखो रुपये मिळणार होते. अरिसारानं वजन कमी केलं; पण तरी त्या व्यक्तीनं सांगितल्यानुसार पैसे दिले नाहीत. युवकांनी आपल्या प्रकृतीची पुरेशी काळजी घ्यावी, असा सल्ला मांसाचा तुकडा घशात अडकून मरण पावलेल्या अरिसाराच्या आईनं सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Social media, Weight gain, Weight loss