मराठी बातम्या /बातम्या /मनी /अतिरिक्त उत्पन्नासाठी महिलेनं सुरू केला 'हा' व्यवसाय; आता दरमहा मिळतात 2 लाख रुपये

अतिरिक्त उत्पन्नासाठी महिलेनं सुरू केला 'हा' व्यवसाय; आता दरमहा मिळतात 2 लाख रुपये

एका महिलेनं व्यवसायाची एक अनोखी वाट शोधली. ही महिला ऑनलाईन सर्वेक्षण, खरेदी करून आणि मांजरांची देखभाल करून दरमहा सुमारे 2 लाख रुपये कमावते.

एका महिलेनं व्यवसायाची एक अनोखी वाट शोधली. ही महिला ऑनलाईन सर्वेक्षण, खरेदी करून आणि मांजरांची देखभाल करून दरमहा सुमारे 2 लाख रुपये कमावते.

एका महिलेनं व्यवसायाची एक अनोखी वाट शोधली. ही महिला ऑनलाईन सर्वेक्षण, खरेदी करून आणि मांजरांची देखभाल करून दरमहा सुमारे 2 लाख रुपये कमावते.

    यूके, 2 जून : नोकरी (Job) म्हटलं की ताण-तणाव आलेच. गेल्या काही वर्षांत नोकरदार वर्गाची स्थिती पाहिली तर ही गोष्ट अधिक स्पष्टपणे लक्षात येईल. मर्यादेपेक्षा अधिक वेळ काम करूनदेखील योग्य मोबदला मिळत नाही, अशी तक्रार नोकरदार वर्गातून ऐकायला मिळते. यावर उपाय म्हणून काही जण नोकरी सोडून व्यवसायात (Business) उतरतात. मनाप्रमाणे काम करून भरपूर पैसे कमवावेत, हा उद्देश त्यामागे असतो. काहीजण अधिक पैसे कमावण्यासाठी नोकरीसोबत व्यवसाय करतात. यूकेतल्या (UK) एका महिलेनं व्यवसायाची एक अनोखी वाट शोधली. ही महिला ऑनलाईन सर्वेक्षण, खरेदी करून आणि मांजरांची देखभाल करून दरमहा 2 हजार पौंड म्हणजेच सुमारे 2 लाख रुपये कमावते. तिचा हा व्यवसाय चर्चेचा विषय ठरला आहे. याविषयी माहिती देणारं वृत्त 'झी न्यूज हिंदी'ने प्रसिद्ध केलं आहे.

    यूकेमध्ये यॉर्क येथे राहणाऱ्या 33 वर्षांच्या जेम्मा यांनी ऑनलाईन सर्वेक्षण, खरेदी करून आणि मांजरांची देखभाल करून महिन्याला 2000 पौंड अर्थात सुमारे दोन लाख रुपये कमावत असल्याचा दावा केला आहे. परंतु, जेम्मा या व्यवसायाकडे वळण्यामागे एक वेगळी कहाणी आहे. 2014 मध्ये त्यांनी स्वतःचा गेमबॉब्स क्राफ्ट व्यवसाय (Crafts Business) सुरू केला. परंतु, अधिक उत्पन्नाचा स्रोत मिळवण्याबाबत त्यांनी विचार सुरू केला आणि त्यासाठी त्या ऑनलाईन सर्व्हे करू लागल्या. "कलाकुसरीच्या अर्थात क्राफ्ट्सच्या माध्यमातून मला जास्त पैसे मिळत नव्हते. त्यामुळे अतिरिक्त उत्पन्नाचा (Extra Income) विचार करू लागले. हे काम मी अनेक वर्ष केवळ छंदापोटी करत होते; पण मला यातून पुरेसे पैसे मिळत नसल्याची जाणीव झाली", असं जेम्मा यांनी सांगितलं.

    (महाराष्ट्रात 15 दिवसांनी पुन्हा निर्बंध लागणार? टास्क फोर्सच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचं महत्त्वाचं आवाहन)

    "मी अतिरिक्त उत्पन्नासाठी अनेक मार्ग शोधू लागले. या नोकरीसोबतच मी आणखी काही गोष्टी करू शकले असते, असं मला वाटलं. माझ्या मते माझं दरमहा उत्पन्न खूपच कमी आहे. आता मी माझा बहुतेक वेळ मार्केट रिसर्च, सर्व्हे, मिस्ट्री शॉपिंग आणि ई-बे (ebay) या ई-कॉमर्स वेबसाईटवर गोष्टी सूचीबद्ध करण्यात घालवते", असं जेम्मा म्हणाली.

    "या गोष्टींमुळे मी माझ्या कामात फ्लेक्झिबल झाली आहे. मी या व्हेरिएशन्समधून खूप काही शिकते. माझा आत्मविश्वास वाढला आहे. कारण मी नियमितपणे मिस्ट्री शॉपिंगसारख्या गोष्टी माझ्या पद्धतीनं करत आहे. ज्या गोष्टी सर्वसामान्य व्यक्ती सहसा करत नाहीत, अशा गोष्टी मी करते. या कामात मला अनेक गोष्टी मोफत मिळतात आणि झूम कॉलच्या माध्यमातून लोकांशी संवादही साधता येतो", असं जेम्मा सांगतात.

    "मी एकटी राहते. मला उत्पादक (Productive), तसंच सक्रिय (Active) गोष्टी चांगल्या वाटतात. या गोष्टी केल्यानं मला खरोखरच मानसिक समाधान मिळतं. कारण मी यापूर्वी खूप संघर्ष केला आहे. पूर्ण वेळ काम करणं आणि त्यासाठी बांधील राहणं या गोष्टी माझ्यासाठी नाहीत. त्यामुळे मी जे काही करू शकते, त्या गोष्टी मी सुरू केल्या आहेत. मला सामान्य नोकरी कंटाळवाणी वाटते. मी सध्या दर महिन्याला 2000 पौंड कमावते. कधीकधी ही रक्कम 2500 पौंडांपर्यंत जाते", असं जेम्मानं सांगितलं.

    First published:
    top videos