मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Male-Female Friendship: मुलगा अन् मुलीमध्ये फक्त मैत्री असते? या नात्यात रोमान्सची शक्यता किती? 

Male-Female Friendship: मुलगा अन् मुलीमध्ये फक्त मैत्री असते? या नात्यात रोमान्सची शक्यता किती? 

कित्येक वेळा केवळ मैत्री तुटू नये म्हणून काही जण आपलं प्रेम व्यक्त करत नाहीत. अशा वेळी समोरच्या व्यक्तीच्या मनात काय सुरू आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. कारण, दोन्ही बाजूंनी समान भावना असतील, तर असं प्रेम मोठ्या प्रमाणात यशस्वी होतं.

पुढे वाचा ...

    नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : ‘एक लडका और लडकी कभी दोस्त नहीं हो सकते’ हा हिंदी फिल्मचा डायलॉग (A Girl and a boy can never be Friends) तुम्ही किती तरी वेळा ऐकला असेल. खरं तर हा अगदी जुना डायलॉग आहे आणि कदाचित त्या काळची परिस्थिती पाहता हा तेव्हा खरादेखील असू शकेल. तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या लहानपणी मुलांनी मुलींशी बोलणं म्हणजे दोघांच्या घरी ओरडा बसणार अशी परिस्थिती असेल; मात्र आताच्या पिढीमध्ये हा भेद बराच कमी झाला आहे. त्यामुळे तेव्हाचा हा डायलॉग आतादेखील तेवढाच लागू होतो का, हे पाहणं गरजेचं आहे. 'झी न्यूज'ने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    मुला-मुलीमध्ये मैत्री शक्य

    सध्याच्या काळात खरं तर मुली सर्वच क्षेत्रात पुढे आहेत. त्यामुळे मुलगा-मुलगी हा भेद अगदी कमी प्रमाणात राहिला आहे. त्यामुळेच मुला-मुलींमध्ये चांगली मैत्री (Friendship between Men and Women) होण्याचं आणि शेवटपर्यंत ती केवळ मैत्रीच राहण्याचं प्रमाण भरपूर आहे. मुलं जेव्हा एखाद्या मुलीला इतर मुलांप्रमाणेच मित्र समजू लागतात, तेव्हा अशी मैत्री जास्त टिकते. अर्थात, मुलं आपल्या मैत्रिणींशी मित्रांच्या तुलनेत अधिक सांभाळून बोलतात. कारण मुली मुलांपेक्षा अधिक हळव्या मनाच्या असतात.

    BreaK-Up: ब्रेकअप झालाय? दुःखातून सावरण्यासाठी उपयोगी पडतील 'या' टिप्स

    मुलींना हवी असते सुरक्षितता

    एखाद्या मुलीला जेव्हा आपल्या मित्रासोबत सुरक्षित (Women look for safety in friendship) वाटू लागतं किंवा मग मैत्रीच्या नावाखाली आपला वापर करून घेतला जात नाहीये याची खात्री असते, तेव्हा तीदेखील चांगल्या प्रकारे मैत्री निभावते. आयरलँडमधले प्रसिद्ध कवी ऑस्कर वाइल्ड (Oscar Wilde) म्हणतात, की मैत्री ही प्रेमाच्या तुलनेत अधिक ट्रॅजिक असते, ती जास्त काळ टिकते. अर्थात, प्रेमापेक्षाही मैत्री जास्त श्रेष्ठ असते असं म्हटलं (Oscar Wilde on Love and Friendship) आहे. ही गोष्ट मुला-मुलींच्या मैत्रीबाबतही लागू होते. दोघांपैकी कोणाच्याही मनात कसलाही स्वार्थ नसेल, तर अशी मैत्री चिरकाल टिकते.

    Friendship or Love : ‘असं’ ओळखा तुम्ही मैत्रीत आहात की प्रेमात?

    प्रेम महत्त्वाचं

    मुला-मुलींची मैत्री (Male-Female friendship) प्रेमात बदलण्याची शक्यता भरपूर असते. त्यामुळेच तर मुलगा-मुलगी ‘केवळ मित्र’ राहू शकत नाहीत असं म्हटलं जातं. 'जर्नल ऑफ सोशल अँड पर्सनल रिलेशनशिप' यामध्ये छापलेल्या एका अभ्यासानुसार, कित्येक मित्र-मैत्रिणींनी आपल्या नात्यात रोमान्स येऊ शकतो हे मान्य केलं आहे. अर्थात, बऱ्याच वेळा हे प्रेम केवळ एकतर्फी असतं. त्यामुळे ते यशस्वी होण्याची शक्यता अगदी कमी असते.

    कित्येक वेळा केवळ मैत्री तुटू नये म्हणून काही जण आपलं प्रेम व्यक्त करत नाहीत. अशा वेळी समोरच्या व्यक्तीच्या मनात काय सुरू आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. कारण, दोन्ही बाजूंनी समान भावना असतील, तर असं प्रेम मोठ्या प्रमाणात यशस्वी होतं.

    First published:
    top videos

      Tags: Friendship