NEWS18 लोकमत 03 ऑगस्ट : मैत्री (Friendship) हे खूप सुंदर नातं असतं. आपण ज्या गोष्टी घरात पालकांशी, भावंडांशी शेअर करू शकत नाही, त्या गोष्टी मित्र-मैत्रिणींशी शेअर करतो. कोणतंही टेन्शन (Tension) असेल किंवा आनंदाची बातमी असेल तर आपण मित्रांशी शेअर करतो. अशीच मैत्री वाढत जाते काही जण एकमेकांच्या प्रेमात पडतात, पण त्यांना ते प्रेम आहे की मैत्रीतलं प्रेम (Love), आकर्षण आहे, हे कळत नाही. त्यामुळे आज आपण असे काही संकेत जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने तुमच्या नात्यात फक्त मैत्री आहे की ते त्या पलीकडे प्रेमापर्यंत पोहोचलंय हे जाणून घेण्यास मदत होईल. या संदर्भात एबीपी लाइव्हने वृत्त दिलंय.
इर्ष्या वाटणं
मैत्रीमध्ये ईर्ष्या नसते, परंतु जर तुमचा मित्र दुसऱ्या कुणाच्या तरी जास्त जवळ जात असेल किंवा तुमचा मित्र त्याच्या आधीच्या गर्लफ्रेंडबद्दल बोलत असेल आणि तुम्हाला ईर्ष्या वाटत असेल तर तुमच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर होत आहे, हे समजून घ्या.
मित्राबद्दल विचार मनात येऊ लागतात
जर तुमच्या मनात सतत तुमच्या मित्राबद्दल विचार येत असतील तर समजायचं की तुमचं नातं मैत्रीच्या एक पाऊल पुढे गेलंय. प्रेमात मैत्री आवश्यक असते आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी होतं हेदेखील कळत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही एकटे बसले असाल आणि तुमच्या मित्राचे शब्द आठवत असतील किंवा त्याची आठवण येत असेल तर समजून घ्या की तुम्ही प्रेमात पडला आहात.
मित्राची प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवणं
मैत्रीचं प्रेमात रूपांतर होताच अचानक तुमचा मित्र तुमच्यासाठी आणखी खास असल्याचं वाटू लागतं. मग तुम्हाला त्याची प्रत्येक गोष्ट आठवू लागते. त्याच्या सवयी, त्याचं बोलणं आठवू लागतं. तुम्हाला त्याच्यासंबंधी सर्व काही आवडू लागतं आणि याच गोष्टी तुम्हाला त्याच्याकडे आकर्षित करतात. तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर तुमच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालंय असं समजा.
सतत आठवण येणं
जेव्हा तुम्हाला खूप एकटं वाटत असेल, सतत मित्राची आठवण येत असेल आणि फक्त त्याच एका व्यक्तीला तुम्ही मिस करत असाल तर तो फक्त तुमचा मित्र नसून तुम्हाला त्याच्यावर प्रेम जडलंय, असा त्याचा अर्थ होतो.
वाढते आकर्षण
प्रेमात पडल्यानंतर जसं वाटतं तसंच तुम्हाला तुमच्या मित्राबद्दल वाटू लागल्यास तुमच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालंय असं समजा. कारण ती भावना आणि आकर्षण हा तुम्हाला प्रेम झालंय हे दर्शवणारा एक मोठा संकेत आहे. जेव्हा तुम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडतं, एकमेकांबद्दलची फिलिंग जाणवू लागते आणि हळूहळू आपल्या मित्राबद्दल अट्रॅक्शन वाढू लागतं, तेच प्रेम असतं. मैत्रीतही अट्रॅक्शन (Attraction) असते पण त्याची फिलिंग वेगळी असते. तसेच तुम्हाला अचानक तुमच्या मित्राबद्दल फिजिकल अट्रॅक्शन वाटू लागत असेल तर तुमच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर होतंय, हे समजून घ्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.