मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

BreaK-Up: ब्रेकअप झालाय? दुःखातून सावरण्यासाठी उपयोगी पडतील 'या' टिप्स

BreaK-Up: ब्रेकअप झालाय? दुःखातून सावरण्यासाठी उपयोगी पडतील 'या' टिप्स

नातेसंबंध उत्तम राहावेत, ब्रेक-अपची नामुष्की टळावी यासाठी काही गोष्टी करता येतात. तरीदेखील अनेकांना ब्रेक-अपला सामोरं जावं लागतं.

नातेसंबंध उत्तम राहावेत, ब्रेक-अपची नामुष्की टळावी यासाठी काही गोष्टी करता येतात. तरीदेखील अनेकांना ब्रेक-अपला सामोरं जावं लागतं.

नातेसंबंध उत्तम राहावेत, ब्रेक-अपची नामुष्की टळावी यासाठी काही गोष्टी करता येतात. तरीदेखील अनेकांना ब्रेक-अपला सामोरं जावं लागतं.

     मुंबई, 11 ऑगस्ट-  विश्वास, प्रेम आणि आपुलकी या गोष्टी रिलेशनशिपमध्ये  महत्त्वाच्या असतात; मात्र बऱ्याचदा काही कारणांमुळे प्रेमाचं नातं संपुष्टात येतं. खरं तर ब्रेक-अप हा शब्दही कोणाला आवडत नाही. नातेसंबंध उत्तम राहावेत, ब्रेक-अपची नामुष्की टळावी यासाठी काही गोष्टी करता येतात. तरीदेखील अनेकांना ब्रेक-अपला सामोरं जावं लागतं. ब्रेक-अप किंवा नातं संपुष्टात येणं ही गोष्ट जीवनावर प्रतिकूल परिणाम करते. आपण ज्या व्यक्तीला आयुष्याचा जोडीदार समजत असतो, तो काही कारणांमुळे आपल्यापासून दुरावतो, ही गोष्ट मनाला नक्कीच खूप वेदना देणारी असते. नातं संपुष्टात आल्यानंतर मनाला होणारा त्रास कसा कमी करायचा, याविषयी अनेकांना माहिती नसते. त्यामुळे साहजिकच संबंधित व्यक्तीवर खोलवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतं; मात्र काही गोष्टी केल्याने ब्रेक-अपमुळे मनाला झालेला त्रास नक्कीच कमी करता येतो. `झी न्यूज हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. आपला भूतकाळ (Past) बऱ्याचदा आपल्याला खूप सतावतो. फोन पुन्हा वाजेल अशी आशा मनात कुठे तरी असते; पण तुम्हाला तुमच्या जुन्या जोडीदाराकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही आणि निराशा कायम राहते. परंतु, शेवटी तुम्हाला हार मानावी लागेल आणि हाच शेवट आहे, हे सत्य स्वीकारावं लागेल. बऱ्याच वेळा आपला पूर्वीचा जोडीदार परत येईल आणि सर्व काही पुन्हा ठीक होईल, अशी आशा आपण ठेवतो; पण आता गोष्टी पहिल्यासारख्या होणार नाहीत, हे स्वीकारण्याची हीच योग्य वेळ असते. जितक्या लवकर तुम्ही हे स्वीकारू शकाल, तितक्या लवकर तुम्ही यातून बाहेर याल. तुम्ही आणि तुमचं आयुष्य (Life) यापेक्षा अन्य कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाही, हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. पुढं जाण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही लगेच दुसरं नातं जोडावं. आयुष्यात पुढे जाताना करिअरसंबंधी (Career) काही महत्त्वाचे निर्णय घ्या, जे तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडतील. अडचणींचा स्वीकार करून वाटचाल करणं हा शहाणपणाचा निर्णय ठरतो. आयुष्यात काय चूक झाली आहे, त्यातून शिकत असताना भूतकाळातल्या चुकांची पुनरावृत्ती टाळा. प्रत्येक जखम भरून येण्यासाठी काळ हे सर्वोत्तम औषध आहे. काही काळानंतर, तुम्हाला स्वतःला असं वाटेल, की ज्या नातेसंबंधाबद्दल तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त गंभीर होतात, ते तुटणं तुमच्यासाठी कदाचित फायदेशीर ठरलं. ब्रेक-अप झाल्यानंतर, तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती तुम्हाला तुमच्या नैराश्यावर (Depression) मात करण्यात मदत करण्यासाठी सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. तुमच्या जुन्या जोडीदाराच्या कॉमन मित्रांना (Common Friends) जास्त भेटणं टाळा. कारण यामुळे जुन्या जोडीदाराच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळू शकतो. अनेकदा जेव्हा तुम्ही रोमॅंटिक रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा तुम्ही कुटुंब आणि मित्रांना कमी महत्त्व देऊ लागता. ब्रेक-अपनंतर या चुका सुधारा आणि तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवा. दुखावलेल्या मनासह आपण गमावलेल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो. जुन्या भावना संपुष्टात आणण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतःची काळजी घेणं होय. ब्रेक-अपच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी दुसरा जोडीदार शोधणं हा पुरुषांसाठी, तर शॉपिंग (Shopping) हा महिलांसाठी सर्वोत्तम उपाय ठरतो. जेव्हा ब्रेक-अप होतो, तेव्हा तुम्हाला विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. अशा वेळी स्वतःला वेगवेगळ्या कामांमध्ये व्यग्र ठेवा, जेणेकरून तुम्हाला आनंद वाटेल. शॉपिंग करणं, चित्रपट पाहणं, नवीन मेकओव्हर करणं या गोष्टी तुमचं दुःख दूर करण्यासाठी चांगले पर्याय ठरू शकतात. तसंच जुन्या आठवणींमध्ये रमणं टाळा. (हे वाचा:Relationship Tips : पार्टनरचा विश्वास जिंकण्यासाठी नक्की विचारा हे प्रश्न; नातं होईल अधिक घट्ट ) तुम्ही तुमच्या जुन्या जोडीदाराला फोन करणं बंद करू शकता. तसंच मेसेज ब्लॉक करू शकता. त्याच्याशी संबंधित गोड आठवणींपासून (Memories) सुटका होण्यासाठी काय करावं, असा प्रश्न मनात नक्कीच येतो. खरं तर ब्रेक-अपनंतर ही सर्वांत कठीण गोष्ट असते. जुन्या जोडीदारावर चिडणं योग्य नाही. त्यामुळे तुम्हाला या गोष्टी हळूहळू संपुष्टात आणाव्या लागतील. त्यासाठी अशा गोष्टी करा, ज्यामुळे तुम्हाला तुमचा भूतकाळ आठवणार नाही. ज्या ठिकाणी तुम्ही जोडीदारासोबत फिरायला जात होतात, त्या ठिकाणी पुन्हा जाणं टाळा.
    First published:

    Tags: Break up, Lifestyle, Love, Relationship

    पुढील बातम्या