मुंबई, 22 जून : चहा (Tea) अनेकांना प्रिय असतो. चहामुळे मुड आणि शरीर रिफ्रेश होण्यास (Mood Refreshing Tea) मदत होते. पावसाळ्यात तर अनेकांना पुन्हा पुन्हा चहा (Tea In Rainy Season) प्यायला आवडतो. अनेक जण चहाची चव वाढवण्यासाठी कधी आलं घातलेला तर कधी वेलची घातलेला चहा पितात. पंरतु कधी कधी त्याच त्याच चवीचा (Taste of Tea) कंटाळा येतो. तुमचा हा कंटाळा दूर करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळ्या फ्लेवरच्या (Tea Flavors) चहाची रेसिपी घेऊन आलो आहोत. यानंतर तुमच्या प्रत्येक कपाची चव आधीच्या कपापेक्षा वेगळी (Different Flavors Tea) असेल. त्यामुळे तुम्हाला पावसाळ्यात चहाचा अधिक आनंद लुटता येईल. चला जाणून घेऊया या 5 वेगवेगळ्या चवींच्या चहाविषयी.
मसाला चहा - मसाला चहाचे (Masala Tea) नाव तुम्ही ऐकले असेल. परंतु तो प्रत्येक घरात बनवला जात नाही. त्यामुळे अनेकांना त्याची चव माहीत नसते. मसाला चहासोबत तुम्ही पावसाळ्याची मजा द्विगुणित करू शकता. यासाठी चहाच्या पाण्यात साखरेसोबत, बडीशेप, वेलची, लवंग, दालचिनी, आले आणि काळी मिरी घाला आणि ते मिश्रण चांगले उकळू द्या. यानंतर तयार झालेल्या चहाचा आनंद घ्या.
डोळ्यांच्या पापण्या फडफडण्याचा अर्थ काय? धार्मिक आणि वैज्ञानिक कारण समजून घ्या
तुळशीचा चहा - तुळशीच्या फ्लेवरचा चहा (Basil Tea) देखील तुम्हाला अत्यंत रिफ्रेश करू शकतो. यासाठी सामान्य दुधाचा चहा बनवल्यानंतर त्यात तुळशीची काही पानं बारीक करून टाका. तुळशीची पानं टाकल्यानंतर चहा आणखी थोडा वेळ उकळवा. यामुळे चहाला तुळशीचा फ्लेवर प्राप्त होईल. आणि तो आणखी चवदार होईल. तुळशीचा चहा तुम्हाला हंगामी समस्यांपासून वाचवण्यासाठी देखील प्रभावी ठरतो.
हळदीचा चहा - तुम्ही हळदीचे दूध पिले असेलच परंतु हळदीचा चहा (Turmeric Tea) देखील तुमच्यासाठी अत्यंत फायदेशूर ठरू शकतो. पावसाळ्यात तुम्ही हळदीच्या चहाचाही आस्वाद घेऊ शकता. यासाठी सामान्य चहा बनवताना त्यात शेवटी चिमूटभर हळद घाला. हळद घातल्यानंतर एक ते दोन मिनिटं मंद आचेवर चहा उकळवा. या चहात तुम्ही साखरेऐवजी गुळाचा वापर केला तर तो आणखी चवदार होतो आणि हा चहा आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
मुलांच्या मेंटल ग्रोथसाठी या टिप्स आहेत उपयोगी; लहान असल्यापासूनच होईल फायदा
सुलेमानी चहा - पावसाळ्यात चहाची चव वाढवण्यासाठी तुम्ही सुलेमानी चहाचा (Sulemani Tea) आस्वाद घेऊ शकता. हा चहा तुम्ही दालचिनी, पुदिना, लवंग, वेलची, साखर आणि चहाच्या पत्तीच्या मदतीने तयार करू शकता. हे सर्व साहित्य चहाच्या पाण्यात टाका आणि चांगले उकळा आणि गरमागरम चहाचा आनंद घ्या.
गुळाचा चहा - चहामध्ये साखरेऐवजी तुम्ही गुळाचा वापर करू शकता. गुळाचा चहा आरोग्यासाठी देखील अतिशय उपयुक्त असतो. हा चहा बनवण्यासाठी आधी सामान्य चहा तयार आणि शेवटी त्यात गूळ घाला. हा चहा बनवताना तो आधी चांगला उकळू द्या, गॅस बंद करा आणि मगच त्यात गूळ घाला. आधी गूळ घातला तर चहा फुटू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Rains, Tea, Tea drinker