Home /News /lifestyle /

डोळ्यांच्या पापण्या फडफडण्याचा अर्थ काय? धार्मिक आणि वैज्ञानिक कारण समजून घ्या

डोळ्यांच्या पापण्या फडफडण्याचा अर्थ काय? धार्मिक आणि वैज्ञानिक कारण समजून घ्या

सामुद्रिकशास्त्रानुसार, महिला आणि पुरुषांमध्ये पापण्या फडफडण्याचा अर्थ भिन्न आहे. स्त्रियांचा डावा आणि पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे शुभ मानले जाते. वैज्ञानिक कारणांसह अधिक माहिती जाणून घेऊया.

    मुंबई, 17  जून : हिंदू धर्मात अशा अनेक प्राचीन श्रद्धा आहेत, ज्यांना काही लोक अंधश्रद्धा मानतात तर काही लोक पूर्ण श्रद्धेने त्यावर विश्वास ठेवतात. सामुद्रिक शास्त्रात या सर्व समजुतींचे तपशीलवार वर्णन केले आहे. यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोळ्यांच्या पापण्या फडफडणे. डोळ्यांच्या पापण्या फडफडण्याला अनेकजण अशुभ मानतात. परंतु त्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारणे (dole fadfadnyache karan) आहेत. याबद्दल ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी माहिती दिली आहे. जाणून घेऊया डोळ्यांच्या पापण्या फडफडण्याच्या बाबतीत सामुद्रिकशास्त्र काय सांगते. डोळ्याच्या पापण्या फडफडणे - सामुद्रिक शास्त्र म्हणजे ज्यामध्ये आपल्या चेहऱ्याच्या आणि संपूर्ण शरीराच्या विविध भागांच्या कार्याचा अभ्यास केला जातो. सामुद्रिकशास्त्रानुसार, महिला आणि पुरुषांमध्ये पापण्या फडफडण्याचा अर्थ भिन्न आहे. स्त्रियांचा डावा आणि पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे शुभ मानले जाते. उजवा डोळा - सामुद्रिक शास्त्रात असे सांगितले आहे की, जर एखाद्या माणसाचा उजवा डोळा फडफडत असेल तर ते त्याच्यासाठी शुभ चिन्ह आहे आणि असे झाल्याने त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात. उजवा डोळा फडफडणे हे एखाद्या व्यक्तीच्या पदोन्नतीचे आणि धनलाभाचे लक्षण असू शकते. याउलट जर एखाद्या महिलेचा उजवा डोळा फडफडत असेल तर ती तिच्यासाठी अशुभ लक्षण मानले जाते. त्यामुळे स्त्रियांच्या अनेक गोष्टी बिघडू शकतात. हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर - डावा डोळा सामुद्रिक शास्त्रात असे सांगितले आहे की जर एखाद्या स्त्रिच्या डाव्या डोळ्याच्या पापण्या फडफडत असतील तर ते त्या स्त्रीसाठी शुभ लक्षण आहे. डाव्या डोळ्याच्या पापण्या फडफडत असतील तर आगामी काळात महिलांना पैसा, सोन्या-चांदीचे दागिने मिळण्याचे ते संकेत मानले जातात. याउलट जर एखाद्या पुरुषाचा डावा डोळा फडफडत असेल तर त्याला इजा होण्याची शक्यता असते. हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा विज्ञान काय म्हणते - वैज्ञानिक दृष्टीकोनातून जाणून घ्यायचे झाल्यास मांसपेशी-स्नायूंमध्ये काही प्रॉब्लेम असल्यास त्यामुळे डोळ्याच्या पापण्या फडफडतात. तसेच माणसाला पुरेशी झोप न मिळाल्यास, मनात थोडा ताण असताना, जास्त थकवा येतो तेव्हा किंवा आपण लॅपटॉप-कॉम्प्युटरवर बराच वेळ काम केल्यानंतर डोळ्याच्या पापण्या फडफडू शकतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Lifestyle, Religion

    पुढील बातम्या