मुंबई, 11 जून : पाऊस (Monsoon) सुरू झाला आहे. पाऊस (Rain) म्हटलं की सोबत गरमागरम चहा आणि भजी (Chai and bhaji) आलीच. अगदी पहिल्या पावसातच प्रत्येकाच्या घरी हा बेत झाला असेल. अहो, फक्त तुम्हीच नाही तर अगदी सेलिब्रिटींही याला अपवाद ठरले नाही. धकधक गर्ल माधुरी दीक्षितनेही (Madhuri dixit) पावसाळ्यात चहा आणि भजीचा (Chai and bhajiya) आस्वाद घेतला आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपल्या सोशल मीडियावर चहा आणि भजीचा फोटो शेअर केला. मुंबईच्या पावसात तिनं गरमागरम चहा आणि भजी खाल्ली. चाहत्यांसोबतही हा सुंदर फोटो शेअर केला. साहजिकच हा फोटो पाहून तुमच्या तोंडालाही पाणी सुटलंच असेल, नाही का?
Chai and Bhajiya kinda day in Mumbai today. What say? Stay safe guys and take care.❤️ pic.twitter.com/KD8DtdeX00
— Madhuri Dixit Nene (@MadhuriDixit) June 9, 2021
तसं पाऊस, चहा आणि भजी हे समीकरणच आहे. पावसाळ्यात गरमागरम काहीतरी खाणं-पिणं थोडं बाजूला ठेवू आणिचहा आणि भजीपुरतं विचार करू. खरंच चहा आणि भजीचं कॉम्बिनेशन योग्य आहे का? म्हणजे चहा-भजी या शब्दाबाबत नाही म्हणत आहोत आम्ही तर त्या दोन वेगवेगळ्या पदार्थांबाबत म्हणत आहोत. म्हणजे चहा हे पेय आणि भजी हा पदार्थ एकत्र खाणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे का? हे वाचा - तुमच्या साबणावर कोरोनाव्हायरस तर नाही ना? तज्ज्ञांच्या मते, काही विशिष्ट पदार्थ चहासोबत खाऊ नयेत. चहाबरोबर काही ठराविक पदार्थांचं सेवन केल्याने आपण आजाराला निमंत्रण देत असतो. चहाबरोबर काही पदार्थ खाल्ल्याने आपलं पोट बिघडतं. अपचन आणि अॅसिडीटी सारख्या समस्या सुरू होतात. यामध्ये बेसन आणि हळद घातलेले पदार्थ यांचाही समावेश आहे. आता भजी म्हणजे ती बेसनचीच असते आणि त्यात हळद तर आपण टाकतोच. बेसन पिठाचे कोणतेही पदार्थ चहाबरोबर खाऊ नयेत. बेसन पिठाचा पदार्थ चहाबरोबर खाल्याने त्याची पौष्टिकता संपते आणि अपचनासारखा त्रासही होऊ शकतो. तसंच चहा प्यायल्यावर लगेच हळद असलेले पदार्थ खाऊ नयेत. चहा आणि हळद यांच्यातील रासायनिक घटक यांची रिअॅक्शन झाल्यास पोटाला त्रास होतो. हे वाचा - कोरोनाला दूर ठेवण्यासाठी नियमित करा ही 6 योगासनं त्यामुळे पावसाळ्यात गरमागरम काहीतरी हवं आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी चहा-भजीचा आस्वाद घ्या. पण तोंडावर मात्र ताबा ठेवा. याचं मर्यादितच सेवन करा.

)







