नवी दिल्ली, 24 जून : कोरोनाव्हायरसची परिस्थिती, त्यामुळे अर्थव्यवस्थेवर होत असलेला परिणाम आणि आता भारत-चीनमधील तणाव यामुळे आता मेड इन इंडियाला (made in india) प्राधान्य दिलं जात आहे. आत्मनिर्भरतेच्या दिशेनं भारताने पाऊल टाकलेलं आहे. अनेक उत्पादनं भारतात उत्पादित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशात आता भारतातील सेक्शुअल वेलनेस इंडस्ट्रीही मागे राहिली नाही. मेड इन इंडिया सेक्स टॉयजही (made in india sex toys) लवकरच उत्पादित केलं जाणार आहे.
भारतातील सेक्स टॉयज ई-रिटेलर मेड इन इंडिया सेक्स टॉयज बनवण्याचा विचार करत आहेत. लाइव्ह मिंटने याबाबत वृत्त दिलं आहे. सेक्स टॉयज विक्री करणारं IMbesharam.com भारतीय बनावटीचे सेक्स टॉयज उत्पादीत करून विकण्याचा विचार करत आहे. डिसेंबरपर्यंत मेड इन इंडिया सेक्स टॉयज आपल्या वेबसाईटवर लाँच करण्याचा त्यांचा विचार आहे.
या वेबसाईटचे संस्थापक राज अरमानी म्हणाले,"भारतीयांचा विचार करता हे टेक्स टॉयज तयार केले जातील. कामसूत्रच्या आधारावर याचं ब्रँडिंग असेल. या उत्पादनासाठी समाज आणि संस्कार अशी दोन नावांचाही विचार करून ठेवला आहे"
हे वाचा - फक्त महिलाच नव्हे तर पुरुषांनाही भरपगारी मासिक पाळी रजा
भारतात विक्री होणारे बहुतेक सेक्स टॉयज आयात केले जातात. त्यापैकी बहुतेक उत्पादनं चीनमधून येतं, जिथं जगातील 70% सेक्स टॉयजची निर्मिती केली जाते. यूएस आणि युरोपमध्ये नामांकित ब्रँडमार्फत ज्या प्रोडक्टची विक्री जाते, त्यांचाही चीनशी काही ना काही संबंध आहेत. सध्या चीनची मुजोरी लक्षात घेता भारतात चीनी वस्तूंवर बहिष्कार घातला जातो आहे. त्यामुळे भविष्यातील मागणी लक्षात घेता सेक्स टॉयजही भारतातच उत्पादित करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
हे वाचा - चीन वाद: सोनिया गांधींनी पंतप्रधान मोदींवर केला हा थेट आरोप, मागितलं आश्वासन
लंडनमधील Technavio या कंपनीच्या मार्केट रिसर्चनुसार अडल्ट टॉयज, गेम्स आणि हेल्थ सप्लिमेंट यांचा समावेश असलेली भारतातील सेक्शुअल वेलनेस इंडस्ट्री 2018 साली जवळपास 2 हजार कोटींची होती. भारतातील ही इंडस्ट्री झपाट्याने वाढत असल्याचं Technavio कंपनीने 2018 साली बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं.
हे वाचा - करोनाच्या संकटात ई-कॉमर्स स्टार्टअप देणार 5 हजार नोकऱ्या, महाराष्ट्रातही जॉब्स
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.