Home /News /lifestyle /

फक्त महिलाच नव्हे तर पुरुषांनाही भरपगारी मासिक पाळी रजा

फक्त महिलाच नव्हे तर पुरुषांनाही भरपगारी मासिक पाळी रजा

पत्नीच्या मासिक पाळीत (menstrual period) पुरुषांनाही मासिक पाळीची रजा (menstrual leave) दिली जाणार आहे.

    बंगळुरू, 19 जून : मासिक पाळीत (menstrual period) महिलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. काही महिलांना तर त्यांची दैनंदिन कामं करणंही शक्य नसतं. अशा वेळी फक्त शारीरिकच नाही तर मानसिक त्रासही होत असतात आणि हेच लक्षात घेत बंगळुरूतील एका कंपनीने आपल्या महिला कामगारांना भरपगारी मासिक पाळी रजा (menstrual leave)  देण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे फक्त महिलाच नव्हे तर पुरुषांना भरपगारी मासिक पाळी रजा दिली जाणार आहे. बंगळुरूतील हॉर्सेस स्टेबल न्यूज (Horses Stable News) या कंपनीने आपल्या कंपनीतील महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळी रजेची योजना लागू केली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांना त्यांच्या मासिक पाळीत दोन दिवस रजा घेण्याची मुभा देण्यात आली आहे. जेणेकरून त्यांना त्यांच्या त्या दिवसात पुरेसा आराम मिळेल. रजेदरम्यान त्यांचा पगार कापला जाणार नाही. तर त्यांना 250 रुपये भत्ता दिला जाईल. फक्त महिलाच नाही तर पुरुष कर्मचाऱ्यांसाठीही अशी सुविधा आहे, जेणेकरून ते आपल्या जोडीदाराच्या मासिक पाळीत तिची काळजी घेतील. दरम्यान आजारपणासाठी दिल्या जाणाऱ्या रजेत या रजेचा समावेश नाही, तर ही स्वतंत्र रजा आहे. हे वाचा - हेल्दी आणि सुरक्षित आहारासाठी लक्षात ठेवा 'या' गोष्टी हॉर्सेस प्रोडक्शनच्या सहसंस्थापक सलोनी अगरवाल म्हणाल्या, "महिलांना मासिक पाळीच्या कालावधीत तीव्र वेदना आणि क्रॅम्प्स होतात. त्यामुळे महिलांसाठी ही योजना आहेच, मात्र महिला-पुरुषांना समान संधी असावी, असादेखील आमचा उद्देश आहे. त्यामुळे पुरुषांसाठीदेखील आम्ही ही योजना लागू केली आहे" "आमच्या कंपनीत अशी योजना सुरू करताना आम्हाला खूप आनंद होतो आहे. इतर कंपन्यांनाही आम्ही प्रोत्साहीत करत आहोत, त्यांनीदेखील अशी योजना आपल्या कंपनीत सुरू करावी. अशा उपक्रमामुळे आपण मासिक पाळीबाबत असलेला टॅबू तोडू शकतो, अशी मला आशा आहे" या कंपनीत 60% महिला आणि 40% पुरुष कर्मचारी असल्याची माहिती कंपनीच्या व्यवस्थापकांनी दिली आहे. संपादन - प्रिया लाड हे वाचा - योनीमार्ग नीट स्वच्छ केलात नाहीत तर उद्भवतील या समस्या; असं करा Vaginal cleaning
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Menstrual cycle, Menstrual period, Woman

    पुढील बातम्या