करोनाचं संकट असताना हा ई-कॉमर्स स्‍टार्टअप देणार 5 हजार नोकऱ्या, महाराष्ट्रातही मिळणार जॉब्स

करोनाचं संकट असताना हा ई-कॉमर्स स्‍टार्टअप देणार 5 हजार नोकऱ्या, महाराष्ट्रातही मिळणार जॉब्स

डिलशेयर (Dealshare) पुढच्या तीन महिन्यांमध्ये 3 हजार आणि डिसेंबरपर्यंत 5 हजार जणांना नोकरी देणार आहे.

  • Share this:

मुंबई 19 जून: देशात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अनेक उद्योगांनी नोकऱ्यांमध्ये कपात केली आहे. हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहे. छोटे व्यवसाय बंद झाल्या आहेत. अशी परिस्थिती असताना डिलशेयर (Dealshare) या ई कॉमर्स स्टार्टअपने 5 हजार जणांना नोकरी देण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रासह आणखी इतर तीन राज्यांमध्ये या रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.

डिलशेयर (Dealshare) स्थानिक छोट्या व्यावसायिकांची उत्पादनं घरपोच उपलब्ध करून देतो. कोरोनामुळे इतर व्यवसायांवर संकट असलं तरी ई कॉमर्स कंपन्यांना चांगले दिवस आले आहेत. लोक आता बाजारात न जाता घरीच सामान मागवून घेत आहेत.

त्यामुळे नवीन गोदाम आणि वस्तुंच्या हाताळणीसाठी मनुष्यबळ लागणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि कर्नाटक या राज्यांमध्ये या संधी निर्माण होणार आहेत. 25 ते 50 हजारांपर्यंत उत्पन्न असणारे ग्राहक हेच आपलं मुख्य टार्गेट असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

डिलशेयर (Dealshare) पुढच्या तीन महिन्यांमध्ये 3 हजार आणि डिसेंबरपर्यंत 5 हजार जणांना नोकरी देणार आहे.

भाजपने शिवसेनेला पाठिंबा देत सरकार स्थापन करावं, भाजप खासदाराचा प्रस्ताव

दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. गुरुवारी स्टेट बँकेने ट्विटरवरून अशी माहिती दिली की, 21 जून 2020 रोजी त्यांची ऑनलाइन सर्व्हिस बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्ही कोणत्या ऑनलाइन ट्रान्सॅक्शन करण्याच्या विचारात असाल, तर याच हिशोबाने तुमचा प्लॅन आखा.

सुशांतला 'हेट स्टोरी'साठी साइन केलं होतं पण बालाजीने करू दिला नाही सिनेमा- विवेक

काही दिवसांपासून एसबीआय ग्राहकांना ऑनलाइन ट्रान्सॅक्शनमध्ये समस्या येत होती. गुरुवारी SBI ने त्यांच्या ट्वीटमध्ये असं लिहिलं आहे की, बँकेच्या काही अॅप्लिकेशन्ससाठी आम्ही काही नवीन प्रणाली लागू करत आहोत. परिणामी 21 जून रोजी आमच्या ऑनलाइन सुविधा बंद राहू शकतात. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी त्यानुसार प्लॅन आखावा'.

 

 

First published: June 19, 2020, 7:10 PM IST
Tags: startup

ताज्या बातम्या