मराठी बातम्या /बातम्या /देश /चीन वाद: सोनिया गांधींनी पंतप्रधान मोदींवर केला हा थेट आरोप, मागितलं आश्वासन

चीन वाद: सोनिया गांधींनी पंतप्रधान मोदींवर केला हा थेट आरोप, मागितलं आश्वासन

चीनच्या वादावर नेमकं काय सुरू आहे? सध्या काय चाललं आहे? हे आम्हा विरोधीपक्षांना काहीही माहित नाही.

चीनच्या वादावर नेमकं काय सुरू आहे? सध्या काय चाललं आहे? हे आम्हा विरोधीपक्षांना काहीही माहित नाही.

चीनच्या वादावर नेमकं काय सुरू आहे? सध्या काय चाललं आहे? हे आम्हा विरोधीपक्षांना काहीही माहित नाही.

     नवी दिल्ली 19 जून: चीनसोबत सुरू असलेल्या वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक घेतली. यात काँग्रेसह 20 पक्षांनी सहभाग घेतला. पराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी सर्व नेत्यांना घटनाक्रमाची माहिती दिली. बैठकीच्या सुरुवातीला सर्वच नेत्यांनी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. या बैठकीत काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका केली. सीमेवर जैसे थे परिस्थिती राहिल असं आश्वासन देशाला द्या असं त्या पंतप्रधानांना म्हणाल्या.

    चीनच्या वादावर नेमकं काय सुरू आहे? सध्या काय चाललं आहे? हे आम्हा विरोधीपक्षांना काहीही माहित नाही. त्याची वळोवेळी माहिती दिली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. विरोधी पक्षांना पूर्णपणे अंधारात ठेवलं गेलं असंही त्या म्हणाल्या. ही सर्वपक्षीय बैठक आधीच घ्यायला पाहिजे होती असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

    दरम्यान, चीनसोबतच्या तणावाच्यार पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलानेही जोरदार तयारी सुरू केली आहे. हवाईदल प्रमुख आरकेएस भदौरिया (RKS Bhadauria) यांनी लडाख, लेह आणि श्रीनगरचा दोन दिवस दौरा केला आणि तयारीचा आढावा घेतला. खबरदारीचा उपाय म्हणून भारताने लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्स सीमेजवळच्या तळांवर तैनात केले असून त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

    हवाई दलाने सीमेजवळ सुखोई एमकेआई, मिराज 2000 आणि जग्वारसारखी लढाऊ विमाने तैनात केली आहेत. त्यामुळे चीनने केलेल्या कृतीला जशास तसे उत्तर देता येणं शक्य होणार आहे. जमीनीवर कामगिरी करणाऱ्या जवानांसाठी अपाचे हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

    सैनिकांच्या वाहतुकीसाठी चिनूक हेलिकॉप्टर आणि मालवाहतुकीसाठी MI17 हे हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आले आहेत.

     

     

    First published: