मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

नशीबवान! 'प्लेन, ट्रेन, कार, बस' 7 भयंकर अपघात; पण वारंवार त्याने मृत्यूला दिला चकवा

नशीबवान! 'प्लेन, ट्रेन, कार, बस' 7 भयंकर अपघात; पण वारंवार त्याने मृत्यूला दिला चकवा

त्याच्या नशीबाने त्याला वारंवार मृत्यूच्या दारातून बाहेर काढलं.

त्याच्या नशीबाने त्याला वारंवार मृत्यूच्या दारातून बाहेर काढलं.

त्याच्या नशीबाने त्याला वारंवार मृत्यूच्या दारातून बाहेर काढलं.

  • Published by:  Priya Lad

झग्रेब, 09 सप्टेंबर : पुराण काळात मृत्यूवरही (Death) मात करण्याचं वरदान दिलं जायचं. कठोर तप करून अमरत्व म्हणजे अमर राहण्याचं, कधीही मरण न येण्याचं वरदान मिळवलं जायचं. अशा बऱ्याच पुराणकथा आपल्याला माहिती आहेत. पण सध्याच्या युगात असं होणं अशक्यच. पण कदाचित एक व्यक्ती याला अपवाद ठरली आहे, असं म्हणू शकतो. ज्या व्यक्तीचे वारंवार भयंंकर अपघात (Accident) झाले. पण प्रत्येक वेळी तिने मृत्यूला चकवा दिला (Luckiest man survived in 7 accident).

मृत्यू कधी, कुठे कसा येईल सांगू शकत नाही. मृत्यूवर कोणीही मात करू शकत नाही, त्याला हरवू शकत नाही. मृत्यू होणं न होणं आपल्या हातात नाही. असं असताना क्रोएशियातील फ्रेन सेलाकने (Frane Selak) मात्र एकदा-दोनदा नव्हे तर चक्क सात वेळा मृत्यूला चकवा दिला आहे. त्याचा मृत्यू होणार नाही, असं जणू त्याला वरदानच मिळालं आहे. त्याला जगातील सर्वात नशीबवान व्यक्ती मानलं जातं (Luckiest Man).

फ्रेनचा जन्म 1929 साली क्रोएशियात झाला. नशीब घेऊनच तो जन्माला आला. फ्रेन 7 भयंकर अपघातातलून वाचला आहे. विमान, ट्रेन, बस आणि कार अशा सर्व गाड्यांच्या अपघातात तो सापडला.  पण त्याचं नशीब इतकं मोठं वारंवार त्याचा जीव वाचला. नशीबाने त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं.

हे वाचा - VIDEO - चिमुकल्या हाती रिक्षाचं स्टेअरिंग! अंध पालकांसाठी गोपाल बनला श्रावणबाळ

बोल न्यूजच्या रिपोर्टनुसार 1962 साली एका ट्रेन दुर्घटनेतून तो बचावला. साराजेवाहून डबरोवनिक रेल्वे प्रवास करताना ट्रेन एका नदीत कोसळली. त्यावेळी 17  प्रवाशांचा मृत्यू झाला. फ्रेनच्या एका हाताला गंभीर दुखापत झाली. पण तरी तो पोहोत नदीकिनारी आला.

यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी विमान दुर्घटनेतही तो सापडला. जाग्रेबहून रिझेकासाठी विमानाने टेक ऑफ केलं. त्यानंतर विमानापासून एक दरवाजा वेगळा झाला आणि दुर्घटना झाली. यामध्ये 19 जणांनी आपला जीव गमावला. पण फ्रेन एका गवताच्या ढिगाऱ्यावर बेशुद्धावस्थेत पडलेला सापडला होता, असं सांगितलं जातं. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, तिथं तो शुद्धीवर आला.

हे वाचा - चमत्कार! ऑनलाईन गेम खेळता खेळता 'मृत्यू'; 20 मिनिटांनी पुन्हा जिवंत झाला तरुण

त्यानंतर 1966 साली तो बसने प्रवास करत होता, तेव्हा बसही नदीत कोसळली. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. पण फ्रेन वाचला.  1970 फ्रेनच्या कारचं फ्युल टँक फुटलं होतं, तेव्हासुद्धा सुदैवाने फ्रेन त्यातून बचावला. 1973 साली आणखी एक कार दुर्घटना झाली. त्याच्या कारला आग लागली. पण त्यात तोसुद्धा भाजला पण त्याचा जीव वाचला. 1995 साली पुन्हा एक बस अपघात झाला. जाग्रेब बसने त्याला पाडलं होतं.

त्याच्या पुढच्या वर्षीच फ्रेनचा शेवटचा अपघात झाला. डोंगर असलेल्या रस्त्यावर एका ट्रकने त्याच्या कारला धडक दिली आणि त्याच्या कारचा विस्फोट झाला. पण तो वेळीच कारमधून बाहेर आला आणि या भयंकर दुर्घटनेतूनही तो बचावला.

इतक्या वेळा अपघातातून कोण कसं काय वाचू शकतं, याचं आश्चर्यच वाटतं नाही का? त्यामुळेच फ्रेनला नशीबवान समजलं जातं आहे.

First published:

Tags: Accident, Lifestyle, World news