• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • चमत्कार! ऑनलाईन गेम खेळता खेळता 'मृत्यू'; 20 मिनिटांनी पुन्हा जिवंत झाला तरुण

चमत्कार! ऑनलाईन गेम खेळता खेळता 'मृत्यू'; 20 मिनिटांनी पुन्हा जिवंत झाला तरुण

त्याच्या हृदयाची धडधड थांबली, श्वासही थांबला पण नंतर...

 • Share this:
  बीजिंग, 08 सप्टेंबर :  ऑनलाईन गेम (Online game) खेळता खेळता मृत्यू (Boy died while playing online game) झाल्याच्या काही बातम्या आपण पाहिल्या आहेत. पण सध्या असं प्रकरण चर्चेत आहे, ज्यात ऑनलाईन गेम खेळताना तरुणाचा मृत्यू झाला पण त्यानंतर काही मिनिटांतच तो तरुण जिवंतही झाला. चीनमधील (China) ही  विचित्र घटना आहे. हेनान प्रांतातील झेंग्झोतील एका इंटरनेट बारमध्ये 20 वर्षांचा तरुण ऑनलाईन गेम खेळता खेळता बेशुद्ध पडला. हा तरुण रात्रभर गेम खेळत होता, त्यानंतर तो खुर्चीतून उठलाच नाही. अचानक त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला आणि तो जमिनीवर धाडकन कोसळला. अशी माहिती  इथल्या कर्मचाऱ्याने दिली. हे वाचा - जास्त Ketchup खाणं ठरू शकते धोकादायक; Side Effects ने 'या' आजारांची होऊ शकते लागण यानंतर लगेच डॉक्टरांना बोलवण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला तपासलं तेव्हा त्याच्या हृदयाची धडधड आणि श्वासही थांबला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पण तरीसुद्धा डॉक्टरांनी त्याला शर्थीचे प्रयत्न करून मृत्यूच्या दारातून परत आणण्याचं ठरवलं. कारण त्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवास थांबून फार वेळ झाला नव्हता. झी न्यूजने ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार डॉक्टरांनी सांगितलं की गेम खेळताना अचानक हा तरुण  पल्मोनरी एम्बोलिज्मच्या स्थितीत गेला होता, ज्यामुळे त्याच्या हृदयाचं कार्य थांबलं होतं. या परिस्थितीत गुठळ्यांनुळे फुफ्फुसापर्यंत योग्य पद्धतीने रक्त पोहोचत नाही. हे वाचा - Video- रस्त्यावर हलताना 'काळा दगड'; सत्य समजताच लोकांच्या काळजाचं पाणी पाणी झालं डॉक्टरांनी लगेच या तरुणावर उपचार सुरू केले. सुरुवातील त्याला 20 मिनिटं कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन करण्यात आलं. त्यानंतर त्याला एपिनेफ्रीन औषध देण्यात आलं. यामुळे त्याचं हृदय पुन्हा धडधडू लागलं. त्याच्या हृदयाचं काम सुरू झालं. मग त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
  Published by:Priya Lad
  First published: