मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

VIDEO - चिमुकल्या हाती रिक्षाचं स्टेअरिंग! अंध आई-बाबांसाठी 8 वर्षांचा गोपाल बनला श्रावणबाळ

VIDEO - चिमुकल्या हाती रिक्षाचं स्टेअरिंग! अंध आई-बाबांसाठी 8 वर्षांचा गोपाल बनला श्रावणबाळ

ऑटोरिक्षा चालवणाऱ्या या चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

ऑटोरिक्षा चालवणाऱ्या या चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

ऑटोरिक्षा चालवणाऱ्या या चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • Published by:  Priya Lad

हैदराबाद, 09 सप्टेंबर : आपल्या अंध आईबाबांना (Blind parent) आपल्या खांद्यावर घेऊन फिरणारा आणि त्यांची सेवा करणारा श्रावणबाळ (Shravanbal) तर आपणा सर्वांना माहितीच आहे. असाच सध्याच्या युगातील एक श्रावणबाळ चर्चेत आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्याने आपल्या अंध आईबाबांसाठी चक्क ऑटोरिक्षाचं (Auto rickshaw)  स्टेअरिंग आपल्या चिमुकल्या हातात धरलं आहे (Hyderabad 8 year old boy driving Aut0 rickshaw).

हैदराबादमधील 8 वर्षांचा गोपाल कृष्ण श्रावणबाळ बनला आहे. इतक्या कमी वयातच त्याने आपल्या कुटुंबाच्या जबाबदारीचा भार आपल्या छोट्याशा खांद्यावर पेलतो आहे. सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून तुम्ही भावुक व्हाल.

" isDesktop="true" id="602388" >

MANAM MEDIA युट्युब चॅनेलवरील हा व्हिडीओ पाहा. गोपाल ज्या वयाच्या आहे, त्या वयातील मुलं शाळेत जातात, मित्रमैत्रिणींसोबत खेळतात, मजामस्ती करतात. गोपालचे इतर मित्रमैत्रिणीही हेच करत आहे, पण तो मात्र घराचा गाडा हाकतो आहे.

हे वाचा - Video- रस्त्यावर हलताना 'काळा दगड'; सत्य समजताच लोकांच्या काळजाचं पाणी पाणी झालं

अमर उजालाच्या रिपोर्टनुसार गोपालचे आई-वडिल अंध आहेत. शिवाय त्याला तीन भावंडं आहेत. आईवडील दिव्यांग असल्याने त्याने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाची जबाबदारी उचलली. त्याने आपल्या छोट्याशा हातात ई-रिक्षाचं स्टेअरिंग धरलं. हैदराबादच्या रस्त्यावर तो ई-रिक्षा पळवतो आहे. कुटुंबासाठी कमाई करता करता तो शाळेत शिक्षणही घेतो आहे.  शाळेच्या गणवेशात तो रिक्षा चालवताना दिसतो आहे.

हे वाचा - हात जोडून उकळत्या पाण्याच्या कढईत ध्यानावस्थेत बसला चिमुकला; भयानक घटनेचा VIDEO

एवढ्याशा वयात ड्रायव्हिंग करण्याला परवानगी नाही. ते योग्यही नाही. पण गोपालकडे दुसरा पर्याय नाही, त्यामुळे त्याला हे करावं लागतं आहे. तुम्ही मात्र असं धाडसं करू नका.

First published:

Tags: Autorickshaw driver, Hyderabad, Parents and child, Viral, Viral videos