मुंबई, 15 मार्च : सोशल मीडिया (Social media) जिथं दररोज काही ना काही चॅलेंज सुरूच असतात. सध्या अशाच एका चॅलेंजनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे आणि हे चॅलेंज म्हणडे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी (Center of gravity). एक पुरुष आणि एक महिला एकत्र हे चॅलेंज स्वीकारत आहेत. या चॅलेंज स्वीकारणाऱ्या अनेकांनी आपल्या सोशल मीडियावर आपले व्हिडीओ पोस्ट केले आहेत. पण हे चॅलेंज फक्त महिलाच जिंकत आहेत. बहुतेक पुरुष यामध्ये फेल होताना दिसत आहेत. सुरुवातीला व्हिडीओ पाहून असं वाटेल की कदाचित पुरुष महिलांना जिंकवण्यासाठी मुद्दामहून असं करत असतील. पण सर्वाधिक व्हिडीओमध्ये असंच पाहायला मिळतं आहे. महिलाच हे चॅलेंज अगदी सहजरित्या पूर्ण करत आहेत. आता नेमकं असं का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना?
सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी नावाचं या चॅलेंजमध्ये महिला आणि पुरुष असतात. दोघंही आपल्या गुडघ्यावर बसतात. पुढे वाकून दोन्ही हातांचे कोपर जमिनीवर ठेवून दोन्ही हात दोन गालांवर ठेवून प्लँक एक्सरसाइझच्या पोझिशनमध्ये बसतात. त्यानंतर एकेक करून दोन्ही हात पाठीमागे घेतात. हे अगदी परफेक्ट करणं महिलांना जमतं, पुरुषांना नाही. हे वाचा - OMG! हा तर चक्क फ्रिजमध्ये जाऊन बसला, फोटोवर नेटकऱ्यांनी दिल्या धमाल प्रतिक्रिया काहींच्या मते, महिलांचा बॅलेन्स खूप चांगला असतो. महिलांची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पुरुषांपेक्षा वेगळी असते. त्यामुळेच या चॅलेंजमध्ये यशस्वी होताना दिसत आहेत. एका अभ्यासानुसारदेखील हे सिद्ध झालं आहे. महिलांची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पुरुषांच्या तुलनेत 8 से 15 टक्के कमी असते. यामुळे प्रेग्नन्सीतही त्यांचं शरीर नियंत्रणात राहण्यास मदत होते. हे वाचा - काय ती धडपड! अर्धनग्न झाली तरीही चोरी करुनच ठोकली धूम, Video Viral याआधीदेखील एक असंच चॅलेंज मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं. ज्यामध्ये आपलं ़डोकं भिंतीवर टेकवून पाय सामान्य स्थितीत ठेवून खुर्ची उठवण्याचा प्रयत्न करतात. यातही महिला यशस्वी होत होत्या. हेदेखील महिलांच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमुळे झालं होतं.