मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /बॅक्टेरिअल इन्फेक्शनवर सर्वात प्रभावी; अँटिबायोटिक औषधांपेक्षाही आईचं दूध भारी

बॅक्टेरिअल इन्फेक्शनवर सर्वात प्रभावी; अँटिबायोटिक औषधांपेक्षाही आईचं दूध भारी

एका संशोधानुसार आईच्या दुधात (Breast Milk is better than Antibiotics) बॅक्टेरियल इन्फेक्शनशी लढण्याची क्षमता पेन्सलिन (Penicillin) सारख्या औषधांपेक्षांही जास्त असते.

एका संशोधानुसार आईच्या दुधात (Breast Milk is better than Antibiotics) बॅक्टेरियल इन्फेक्शनशी लढण्याची क्षमता पेन्सलिन (Penicillin) सारख्या औषधांपेक्षांही जास्त असते.

एका संशोधानुसार आईच्या दुधात (Breast Milk is better than Antibiotics) बॅक्टेरियल इन्फेक्शनशी लढण्याची क्षमता पेन्सलिन (Penicillin) सारख्या औषधांपेक्षांही जास्त असते.

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : जन्मानंतर मुलांसाठी आईचे दूध सर्वात जास्त फायदेशीर (Benefits of Breast Milk)  मानलं जातं. याआधी आईच्या दुधात रोग प्रतिकारकशक्ती (Immunity) वाढवण्याचे गुणधर्म असतात असं तज्ज्ञांचं मत होतं. आता नवीन संशोधनातील दाव्यानुसार आईच्या दुधात असलेली साखर अ‍ॅन्टीबायोटीकच्या  (Antibiotic) जागी वापरली जाऊ शकते. कारण माणसाच्या टीशूमध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन (Bacterial Infection) औषधांपेक्षांही जास्त लवकर संपवू शकतात.

संशोधनात (Research) असं आढळून आलं आहे की, अ‍ॅन्टीबायोटीक आणि बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनशी लढण्याचे गुणधर्म आईच्या दुधात आसतात. संशोधानुसार आईच्या दुधात (Breast Milk is Better than Antibiotics) बॅक्टेरियल इन्फेक्शनशी लढण्याची क्षमता पेन्सलिन (Penicillin) सारख्या औषधांपेक्षांही जास्त असते. या अभ्यासाचा अहवाल  American Chemical Society च्या कॉन्फरन्समध्ये प्रकाशित केला आहे.

(लॉटरीच! फक्त 86 रुपयात इटलीत मिळणार स्वत:चं घर; पाहा कसं खरेदी करायचं)

आईच्या दुधात अ‍ॅन्टीबायोटीक

संशोधनासाठी आईच्या दुधाचे काही नमुने गोळा करण्यात आले. या नमुन्यांमधून HMO(Human Milk  Oligosaccharides) दुधापासून वेगळे केले गेले. नंतर ग्रुप बी स्ट्रेप्टोकोकस (GBS) बॅक्टेरियाने इन्फेक्शन असलेल्या मानवी पेशींवर याचा वापर केला गेला. GBS हा रक्ताची विषबाधा, मेंदुज्वर आणि स्टिलबर्थ यासारख्या परिस्थिती निर्माण होतात. आईच्या दुधात असलेली साखर या सर्व जिवाणू संसर्गावर उपचार करण्यास सक्षम असल्याचा दावा करणारा हा अभ्यासाचा अहवाल सादर करताना केला गेला.

(अंडं खाऊन फेकू नका कवच; लांबसडक केसांसाठी तयार करा हेयर मास्क)

बॅक्टेरियाने इन्फेक्शनवर आईचे दूध उपयोगी

शास्त्रज्ञांनी प्रेग्नन्ट उंदीरांवरही याची चाचणी केली. आईच्या दुधात असलेले घटक मुलांना संसर्गापासून वाचवण्यासाठी प्रभावी असतात आणि त्याचा उपयोग औषधे विकसित करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो असाही निष्कर्ष काढण्यात आला आहे.

(Covishield : कोरोना लशीच्या 2 डोसमधील अंतर कमी होणार; लसीकरणातही मोठा बदल)

नॅशव्हिलमधील वेंडरबिल्ट विद्यापीठातील संशोधक रेबेका म्हणतात की, HMO उपचारानंतर उंदरांच्या पाच प्रजनन अवयवांमध्ये संसर्ग कमी होताना स्पष्टपणे दिसला. अमेरिकन शास्त्रज्ञांच्या टीमच्या मते, आईच्या दुधात सुमारे 200 प्रकारच्या साखर असतात. त्यांच्या माहिसाठी संशोधन कार्य सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Health Tips, Lifestyle, Mother, Research