जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / आळशीपणा घेऊ शकतो तुमचा जीव; गाफील राहू नका, पाहा काय आहे WHO चा रिपोर्ट

आळशीपणा घेऊ शकतो तुमचा जीव; गाफील राहू नका, पाहा काय आहे WHO चा रिपोर्ट

आळशीपणा घेऊ शकतो तुमचा जीव; गाफील राहू नका, पाहा काय आहे WHO चा रिपोर्ट

हल्ली बरेच लोक घरी काम करतात म्हणजेच वर्क फ्रॉम होम करतात. काहीवेळा अशा लोकांची जीवनशैली खूपच निवांत आणि आळशीदेखील होते. व्यायाम किंवा शारिक कष्ट न करणारे लोक आळशी होतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 2 ऑक्टोबर : आपल्याला कायम फिट आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर आपण योग्य आहार घेणं, पुरेशी झोप घेणं आणि नियमित व्यायाम करणं खूप महत्वाचं असतं. हल्ली बरेच लोक घरी काम करतात म्हणजेच वर्क फ्रॉम होम करतात. काहीवेळा अशा लोकांची जीवनशैली खूपच निवांत आणि आळशीदेखील होते. तर काही लोक बाहेर जाऊन काम करतात. मात्र ते कोणत्याही प्रकारचे शारीरिक काष्ठ करत नाहीत. अशाप्रकारे व्यायाम किंवा शारिक कष्ट न करणारे लोक आळशी होतात. झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, WHO ने एक नवीन अहवाल सादर केला आहे. यामध्ये असे म्हणलेले आहे की, हल्ली लोकांच्या अळशीपणामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आहे. दरवर्षी जगातील 8 लाख 30 हजार लोकांचा मृत्यू त्यांच्या आळशीपणामुळे होतो. WHO च्या मते, लोकांनी आठवड्यातून किमान 150 मिनिटे व्यायाम किंवा 75 मिनिटे हेवी वर्कआउट करायला हवे. असे न केल्यास ते लोक आळशी मानले जातातआणि शारीरिक हालचालींचा अभाव त्यांच्या मृत्यूचे कारण बानू शकते.

Happy Singles Day 2022: सिंगल असणं काही चुकीचं नाही; जाणून घ्या ‘सिंगल्स डे’ कसा साजरा करतात

भारतात होणाऱ्या मृत्यूची कारणे हल्ली लोकांची जीवन शाली खूप बदलली आहे. चुकीच्यावेळी खाणे-झोपणे, चुकीचा आहार घेणं, व्यायाम न करणे अशा जीवनशैलीमुळे भारतातील 66% लोकांचा मृत्यू होतो. यामुळे दरवर्षी 60 लाख 46 हजार 960 लोकांना गंभीर आजार होतात आणि यामुळेच त्यांचा मृत्यू होतो. मुख्य म्हणजे अशा पद्धतीने जीव गमावलेल्या एकूण लोकांपैकी 54% लोकांचे वय 70 वर्षांपेक्षा कमी आहे.

News18लोकमत
News18लोकमत

तसेच दरवर्षी भारतात 28% लोकांचा मृत्यू हृदयविकाराने, 12% श्वासोच्छवासाच्या आजारांमुळे, 10% कर्करोगाने, 4% मधुमेहामुळे आणि उर्वरित 12% लोकांना वाईट जीवनशैलीमुळे जीव गमवावा लागतो.

Popcorn Benefits : हलकेफुलके पॉपकॉर्न तुमचंही वजन कमी करतात; इतरही आश्चर्यकारक फायदे

भारतात दारू पिणाऱ्या लोकांची संख्यादेखील दिवसागणिक वाढते. तसेच अनेक लोक तंबाखूचे सेवन जास्त प्रमाणात करतात आणि यामुळे कर्करोगासारखे आजार होतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात