जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Popcorn Benefits : हलकेफुलके पॉपकॉर्न तुमचंही वजन कमी करतात; इतरही आश्चर्यकारक फायदे

Popcorn Benefits : हलकेफुलके पॉपकॉर्न तुमचंही वजन कमी करतात; इतरही आश्चर्यकारक फायदे

Popcorn Benefits : हलकेफुलके पॉपकॉर्न तुमचंही वजन कमी करतात; इतरही आश्चर्यकारक फायदे

पॉपकॉर्नमध्ये अनेक पोषक तत्व आढळतात जे शरीरातील चरबी कमी करतात आणि हृदय, रक्तातील साखर, रक्तदाब यासारख्या समस्यांपासून संरक्षण करतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 सप्टेंबर : थिएटरमध्ये मुव्ही पाहताना असो किंवा घरात हॉलमध्ये सिनेमा पाहणे असो. चित्रपट पाहण्याची मजा पॉपकॉर्नशिवाय अपूर्ण राहते. अनेक फिटनेस फ्रिक लोक ज्यांना त्यांच्या डाएटशी फसवणूक करायला आवडत नाही, ते अनेक वेगवेगळ्या डाएट प्लॅन फॉलो करतात, पण तुम्हाला माहित आहे का की डाएटमध्ये फसवणूक न करता तुम्ही पॉपकॉर्नसारखा चविष्ट स्नॅक्स अगदी पोटभर खाऊ शकता. पॉपकॉर्न खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. कारण पॉपकॉर्नमध्ये भरपूर फायबर असते आणि त्यात पॉलिफेनॉलिक कंपाऊंड्स, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि मॅग्नेशियम सारखे घटक असतात. पॉपकॉर्न हे निरोगी संपूर्ण धान्य आहे, जे जगभरात खूप लोकप्रिय आहे. पॉपकॉर्न हे हलके आणि कमी उष्मांक असलेले अन्न आहे, जे वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. चला तर मग जाणून घेऊया पॉपकॉर्नचे आरोग्यदायी फायदे.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही देखील खाता का सॅलेड? मग जरा सांभाळून, कधीही करु नका ‘या’ चूका

पॉपकॉर्नचे आरोग्य फायदे मधुमेहाचा धोका कमी करा WebMD.com नुसार, संपूर्ण धान्य खाल्ल्याने तुम्हाला अनेक आरोग्य फायदे मिळतात. नियमितपणे संपूर्ण धान्य खाल्ल्यास टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो. विशेषतः मध्यम वयोगटातील महिला आणि पुरुषांसाठी ते फायदेशीर आहे. उच्च रक्तदाब प्रतिबंध पॉपकॉर्नच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयाच्या समस्या कमी होतात, मीठाचे सेवन कमी केल्यास उच्च रक्तदाबाचा धोकाही कमी होतो.

News18लोकमत
News18लोकमत

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त वजन कमी करणे हे खूप कठीण काम असते. अशा परिस्थितीत, पॉपकॉर्न हा एक उत्तम लो कॅलरी स्नॅक पर्याय आहे, जो वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. पॉपकॉर्न हलके असते आणि तरीही त्याने पोट बराच काळ भरलेले राहते. हे वाचा : पुदिन्यामध्ये आहेत अनेक औषधी गुणधर्म; 7 महत्त्वाचे फायदे येथे जाणून घ्या हृदयाच्या समस्या होतात कमी पॉपकॉर्नमध्ये भरपूर फायबर गुणधर्म असतात, त्याच्या जास्त सेवनाने हृदयविकार तसेच कोरोनरी हृदयरोगाचा धोका कमी होतो. फायबर हा संपूर्ण आहाराचा प्रमुख भाग आहे. तुम्ही तुमच्या नाश्त्यातही याचा समावेश करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात