जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Happy Singles Day 2022: सिंगल असणं काही चुकीचं नाही; जाणून घ्या 'सिंगल्स डे' कसा साजरा करतात

Happy Singles Day 2022: सिंगल असणं काही चुकीचं नाही; जाणून घ्या 'सिंगल्स डे' कसा साजरा करतात

Happy Singles Day 2022: सिंगल असणं काही चुकीचं नाही; जाणून घ्या 'सिंगल्स डे' कसा साजरा करतात

National Singles Day 2022- अविवाहित आहेत त्यांच्यासाठी असाही एक खास दिवस आहे आणि ते हा दिवस स्वतःचा दिवस म्हणून साजरा करू शकतात, त्यानिमित्ताने आणखी आनंदी जीवन जगू शकतात.

  • -MIN READ Lanja,Ratnagiri,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : अविवाहित असणे म्हणजे जणू पाप आहे, अशी आपल्या समाजात धारणा आहे. असा समज समाजात पसरवणे चुकीचे आहे, याचे प्रतीक आता ‘सिंगल डे’ आहे. जे लोक अविवाहित आहेत ते त्या दिवशी त्यांच्या इच्छेनुसार हवे ते करू शकतात. सिंगल असणाऱ्यांविषयी या दिवशी आपल्याला प्रेम आणि आदर असायला हवा. 11 नोव्हेंबर 1993 रोजी काही विद्यार्थ्यांच्या गटाला वाटले की, जीवनात जीवनसाथी नसेल तर या कारणाने दु:खी होणे योग्य नाही. भिन्नलिंगी व्यक्तीसोबत वैवाहिक किंवा रिलेशन-प्रेमात असणाऱ्या लोकांना व्हॅलेंटाईन व्यतिरिक्त काही दिवस आहेत हे कदाचित माहीत नसेल. सिंगल लोकांना इतरांच्या खास दिवसांवेळी निराश वाटण्याची गरज नाही, कारण अविवाहित आहेत त्यांच्यासाठी असाही एक खास दिवस आहे आणि ते हा दिवस स्वतःचा दिवस म्हणून साजरा करू शकतात, त्यानिमित्ताने आणखी आनंदी जीवन जगू शकतात. इतिहास काय? सुरुवातीला चीनमध्ये 11 नोव्हेंबर रोजी सिंगल्स डे साजरा करण्यास सुरुवात झाली. हा दिवस निवडण्यामागचे कारण म्हणजे 11 ही संख्या एक एक अशी सिंगल आहे. सुरुवातीला हा दिवस चीनमध्ये साजरा केला जात होता आणि चीनचे लोक 11 नोव्हेंबर रोजी हा दिवस साजरा करत, परंतु नंतर तो 24 सप्टेंबर रोजी युनायटेड स्टेट्समध्ये सिंगल डे म्हणून साजरा करण्यात आला. बर्‍याच देशांमध्ये, राष्ट्रीय सिंगल दिवस आता दरवर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या शनिवारी साजरा केला जातो. सिंगल दिवस कसा साजरा करायचा? जर तुम्हाला खरोखरच हा दिवस साजरा करायचा असेल, तर तुम्ही एकमेकांना (तुमच्या जोडीदाराला नव्हे तर तुमच्या एकट्या मित्राला) कंपनी देऊन विशेष बनवू शकता किंवा तुम्ही कुठेतरी छान ठिकाणी फिरायला जाऊ शकता. या दिवशी तुम्ही तुमच्या घरी तुमच्या सिंगल मित्र-मैत्रिणीसाठी आवडीचे पदार्थ बनवून हा दिवस साजरा करू शकता.

News18लोकमत
News18लोकमत

तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक आहात जे अविवाहित आहेत. अविवाहित आहे म्हणून नाराज असण्याचे कारण नाही, उलट तुमच्या स्वातंत्र्याचा आनंद घ्या आणि तुमच्या या खास दिवसामध्ये तुम्हाला हवे ते करा, मग ते मित्रांसोबत फिरणे असो, स्पामध्ये जाणे असो. लाँग ड्राईव्ह घ्या किंवा बीचवर जा, डेटला जा… तुमच्या मनाला आवडेल ते करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात