नवी दिल्ली, 27 जानेवारी: व्हिटॅमिन (Vitamin) शरीरासाठी खूप उपयुक्त असतात. शरीराच्या योग्य कार्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात व्हिटॅमिन असणे आवश्यक असते. आपल्या शरीरात व्हिटॅमिनची कमतरता असल्यास अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. आपल्या शरीराला 8 प्रकारच्या व्हिटॅमिनची गरज असते. वनस्पतींमध्येही मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन आढळतात. व्हिटॅमिन 'A', 'C' आणि 'E' हे अँटिऑक्सिडेंट आहेत. जे आपल्या शरिरातील सेल प्रोटीन आणि डीएनएच्या मुक्त रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी करतात.
थायमाइन (B 1), राइबोफ्लेविन (B 2), नियासिन (B 3), पॅन्टोथेनिक अॅसिड (B 5), पायरोडॉक्सिन (B 6), बायोटिन (B 7), फोलेट (B 9) आणि सायनोकोबालामीन (B 12) हे आठ व्हिटॅमिन 'B' आहेत. व्हिटॅमिन 'B-12' च्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक गंभीर आजार होऊ शकतात. व्हिटॅमिन 'B-12' फक्त मांसाहारातूनच मिळते असे नाही तर ते मिळवण्यासाठी अनेक शाकाहारी स्रोत आहेत. मशरुम, सोया आणि ताक यांच्यासह इतर अनेक पौष्टिक पदार्थ आहेत ज्यांच्यापासून आपण मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन 'B-12' मिळवू शकतो.
हे ही वाचा-मृत्यूशी लढतेय 5 महिन्यांची तीरा कामत; 16 कोटींचं इंजेक्शन दिलं तरच वाचेल जीव!
व्हिटॅमिन 'B' मेंदूचे कार्य, हृदय आणि मज्जासंस्था इतर अवयवांमध्ये मदत करते. व्हिटॅमिन 'B' शरीरात नवीन लाल रक्तपेशी तयार करतात आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात, कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवतात तसंच त्वचेचे संरक्षण करतात. व्हिटॅमिन 'D' शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फेटची योग्य पातळी राखते. रक्त गोठणे आणि जखम बरी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आज आपण मांसाहाराव्यतिरिक्त 5 स्रोत पाहणार आहोत ज्याद्वारे आपल्याला व्हिटॅमिन मिळेल.
भाज्या -
भाज्यांमध्ये (vegetables) व्हिटॅमिन मोठ्याप्रमाणात असते. पालकसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन 'A', 'B', 'C' आणि 'E' असते. ब्रोकोली, कोबी, फ्लॉवर, हिरवे वाटाणे, रताळे, शतावरी आणि भोपळा या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन मोठ्याप्रमाणात असते. या भाज्या खाणे शरिरासाठी खूप फायदेशीर असते.
हे देखील वाचा - भारतीय महिलांचा Eggs Freezing कडे वाढता कल; नेमकं काय आहे कारण?
फळे -
फळांमध्येदेखील मोठ्याप्रमाणात व्हिटॅमिन असते. संत्री, लिंबू, द्राक्ष या फळांमध्ये व्हिटॅमिन 'C' आणि एस्कॉर्बिक अॅसिड असते. हे एक अँटिऑक्सिडेंट आहे जे फ्री रॅडिकल-प्रेरित सेलच्या नुकसानापासून संरक्षण करते. तसंच, हाडे आणि दात यांचे कार्य व्यवस्थित राखण्यास मदत करतात. चेरीप्रमाणेच पेरू, अननस, आंबे आणि बेरीमध्ये देखील व्हिटॅमिन 'C' मोठ्याप्रमाणात असते.
धान्य -
गहू, तांदूळ, मका आणि बाजरी या धान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन 'B' आणि 'E' तसंच, खनिजे आणि फायबर जास्त प्रमाणात आढळते. मात्र मिलिंग आणि रिफाइनिंगमुळे मोठ्याप्रमाणात व्हिटॅमिन कमी होते. प्रक्रिया केलेलं धान्य कधीकधी व्हिटॅमिन बाहेरून देऊन मजबूत केले जाते; पण यामुळे ग्राहकांच्या आरोग्यास फायदा झाल्याचे कोणतेही महत्वपूर्ण पुरावे नाहीत.
डाळी -
सर्व प्रकारच्या डाळींपासून आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन मिळते. भारतीय जेवणामध्ये डाळींचा समावेश असतो. प्रामुख्याने मसूर, उडीद, मूग, चण आदी डाळींचा जेवणामध्ये वापर केला जातो. या डाळींमध्ये व्हिटॅमिन 'B' मोठ्या प्रमाणात असते.
ड्रायफ्रूट -
शेंगदाणे, काजू, अक्रोड, बदाम, पिस्ता हे व्हिटॅमिनचे चांगले स्रोत आहेत. या सर्व ड्रायफ्रूट्समध्ये व्हिटॅमिन 'E' आणि 'B' मोठ्या प्रमाणात असते.