भारतीय महिलांचा Eggs Freezing कडे वाढता कल; नेमकं काय आहे कारण?

भारतीय महिलांचा Eggs Freezing कडे वाढता कल; नेमकं काय आहे कारण?

वैद्यकीय किंवा सामाजिक कारणांमुळे, वाढत्या जागरुकतेमुळे भारतातही एग्ज फ्रिजिंगकडे कल वाढतो आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 जानेवारी : काही वर्षांपूर्वी स्त्रियांना वयाच्या 18 ते 22 वर्षादरम्यान लग्न करण्यास सांगितलं जायचं आणि वयाच्या 24 ते 26 वर्षादरम्यान कुटुंब पूर्ण करण्यासाठी दबाव आणला जायचा. पण आता काळ बदलला आहे. सामाजिक आणि आर्थिक कारणांमुळे बहुतांश महिला कौटुंबिक आयुष्य लवकर सुरू करण्यास इच्छूक नसतात. त्यामुळे बीज फ्रिजिंग (Eggs Freezing) ही प्रक्रिया वाढत्या वयातील आणि जैविक बाबी टिकून ठेऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी एक वरदान तसंच सर्वोत्तम पर्याय ठरत आहे.

जगातील फ्रोजन आओसाईटसव्दारे (Frozen Oocytes) पहिली गर्भधारणा 1986 मध्ये सिंगापूरमधील डॉ. क्रिस्तोफर चेन यांनी नोंदवली होती. केमो (Chemo) किंवा रेडीओथेरपीमुळे (Radiotherapy)  जननपेशी किंवा गेमेटवर (Gamete) विषारी परिणाम होतो. एखाद्या कर्करोगग्रस्त महिलेला भविष्यात बालकास जन्म देता यावा तसंच स्त्रीबिजांना नुकसान होऊ नये आणि ती टिकून राहावी यासाठी केमो किंवा रेडीओथेरपीपूर्वी एग्ज फ्रिजिंगची प्रक्रिया सुरू केली जात असे. आता मात्र ज्या महिलांना एन्डोमेट्रोसिस, लवकर मेनोपाज होण्याची हिस्ट्री किंवा काही सामाजिक कारणं आहेत त्यांच्यासाठी एग्ज फ्रिजिंगची प्रक्रिया सर्रास वापरली जाते.

हे वाचा - आईच्या मायेला तोड नाहीच! कुशीत घेऊन कुत्र्यानं मांजराला पाजलं दूध; VIDEO VIRAL

वैद्यकीय किंवा सामाजिक कारणांमुळे, वाढत्या जागरूकतेमुळे भारतातही एग्ज फ्रिजिंगकडे कल वाढतो आहे. वयस्क अवस्थेत गर्भधारणा झाल्यास आईची प्रकृती आणि गर्भाशयातील गुंतागुंत वाढू शकते, हे जाणून या तंत्राची योग्य वेळी आणि योग्य प्रकारे निवड करणं आवश्यक आहे. ज्या महिलांचं वय 40 पेक्षा अधिक आहे त्यांच्यात 45 टक्के तर ज्या महिलांचं वय 45 पेक्षा अधिक आहे त्यांच्यात गर्भपाताची शक्यता 70 टक्के असते. जर त्यांनी योग्य वयात एग्ज फ्रिजिंगची ट्रिटमेंट घेतली तर त्यांना नंतरच्या काळातही निरोगी बालकास जन्म देता येतो. ही अतिशय सोपी आणि परवडण्याजोगी प्रक्रिया आहे. एग्ज फ्रिजसाठी वयाच्या 35 वर्षापूर्वीचा कालावधी योग्य असतो कारण वयाच्या पस्तीशीनंतर अंड्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होते. एग्ज फ्रिजिंगची प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित असून एखाद्या महिलेस तिच्या इच्छेनुसार कालावधीपर्यंत एग्ज फ्रिज ठेवता येतात.

आयोसाइटस फ्रिजिंग तंत्र विकास आणि प्रगतीमुळे आता प्रयोगात्मक पातळीच्याही पुढे गेले आहे. चांगल्या गर्भधारणेसाठी हे एक योग्य तंत्रज्ञान आहे. प्रजननक्षमता टिकवण्यासाठी देखील हे तंत्र उपयुक्त ठरते, असे ताज्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. फर्टीसिटी फर्टिलिटी क्लिनिकच्या ताज्या आकडेवारीनुसार, गोठवलेल्या आॅसिटीसचा जगण्याचा दर 95 टक्के, गर्भधानाचा दर 85.3 तर गर्भधारणेचा दर 68.75 टक्के आहे.

हे वाचा -  नवऱ्याला स्वप्न पडलं आणि बायकोचं नशीब फळफळलं; 437 कोटी रुपयांची मालकीण झाली

अंडी पुर्नप्राप्ती ही एक दिवसाची (OPD) कोणतंही स्टिचेस किंवा चिरफाड न करता केली जाणारी प्रक्रिया आहे. यामध्ये सर्वसाधारण भूल देऊन अल्ट्रासाऊंडसच्या आधारे ट्रान्सव्हेजिनल केलं जातं. प्रक्रियेनंतर त्याच दिवशी पेशंटला डिस्चार्ज दिला जातो आणि अंडी फ्रोझन केली जातात. जेव्हा एखादी स्त्री गर्भधारणेचा निर्णय घेते तेव्हा ही अंडी आणि शुक्राणूंच्या सहाय्याने गर्भ तयार केला जातो. त्यानंतर 3 ते 5 दिवस लॅबमध्ये त्यावर प्रक्रिया करून ती गर्भाशयात सोडली जातात. कोणत्या वयात एग्ज फ्रिजिंग केले आहे आणि किती एग्ज फ्रिजिंग केले आहेत यावर निरोगी बाळ होण्याचं यश निश्चित केलं जातं. ही संपूर्ण प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी संबंधित तज्ज्ञ, डॉक्टर्स, भ्रूणविज्ञान तज्ज्ञ हे कौशल्यपूर्ण आणि अनुभवी असणं गरजेचं आहे. या प्रक्रियेविषयी जागरुकता वाढत असल्याने अधिकाधिक महिला याकरिता पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. या प्रक्रियेची लोकप्रियता विकसित राष्ट्रांबरोबरच भारतामध्येही असल्याचे दिसून येते.

Published by: Aditya Thube
First published: January 26, 2021, 10:33 AM IST

ताज्या बातम्या