जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / वजन वाढेल म्हणून खाणं सोडू नका, देशी तुपाचे हे आहेत असंख्य फायदे!

वजन वाढेल म्हणून खाणं सोडू नका, देशी तुपाचे हे आहेत असंख्य फायदे!

देशी तूप खाण्याचे फायदे

देशी तूप खाण्याचे फायदे

तूप शरीराला ऊर्जा देतं. सोबतच रोगप्रतिकारक क्षमताही वाढवतं. याच्या नियमित सेवनानं विविध प्रकारचे आजार दूर राहतात. देशी तूप आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत गुणकारी मानलं जातं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 डिसेंबर : शुद्ध देशी तूप हे शरीरासाठी अत्यंत मौल्यवान असतं. त्यातील पोषकतत्त्व शरीराला असंख्य फायदे मिळवून देतात. अगदी लहान मुलांपासून ते वडीलधाऱ्यांपर्यंत प्रत्येकासाठी तूप खाणं गरजेचं आहे.  तूप शरीराला ऊर्जा देतं. सोबतच रोगप्रतिकारक क्षमताही वाढवतं. याच्या नियमित सेवनानं विविध प्रकारचे आजार दूर राहतात. देशी तूप आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत गुणकारी मानलं जातं. रोज देशी तूप खाल्लं तर आपला विविध आजारांपासून बचाव होऊ शकतो. वाताचा प्रभाव कमी करतो शरीरात वातप्रकृती असंतुलित झाली तर अनेक रोग होण्याची शक्यता बळावते. रोज जेवणात देशी तूप घेतल्यास वाताच्या प्रभावापासून दूर राहता येतं. पचनशक्ती वाढवतं देशी तूप पचनयंत्रणेला चांगलं ठेवतो. पचनशक्ती चांगली असेल तर तुम्ही कसलाही संभ्रम न बाळगता हवं ते खाऊ शकता. आयुर्वेदात सांगितलं गेलं आहे, की देशी तूप योग्य प्रमाणात खाल्लं तर पचनशक्ती मजबूत होते. अशक्तपणा दूर होतो जे लोक शारीरिकदृष्ट्या खूप मेहनत करतात किंवा जिमला जातात त्यांनी देशी तूप नियमितपणे खाल्लं पाहिजे. हेच नाही, लहान मुलांच्या आहारातही देशी तूप दिलं गेलं पाहिजे. यातून बाळाचा शारीरिक आणि मानसिक विकास होतो. मानसिक आरोग्यासाठी उपयोगी देशी तुपाचा नियमित उपयोग केल्यानं स्मरणशक्ती आणि तर्कक्षमता वाढते. याशिवाय इतरही मानसिक आजारांमध्ये देशी तूप फायदेशीर आहे.

News18लोकमत
News18लोकमत

खोकला कमी करतं तुम्हाला सतत खोकल्याचा त्रास होत असेल, तर जेवणात देशी तूप आवर्जून खा. आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, खोकला झाल्यावर तुपाचं सेवन करणं खूप गरजेचं आहे. प्रेग्नन्सीमध्ये उपयोगी देशी तूप प्रेग्नन्सीमध्ये खाल्ल्यास जन्मणाऱ्या बाळाचं आरोग्य चांगलं होतं. देशी तूप खाल्ल्यानं शुक्राणूंची संख्याही वाढते. हे वाचा -  पुरुष बाळांना स्तनपान करू शकत नाहीत, तरी त्यांच्या छातीवर स्तनाग्र का असतात? टीबीमध्ये लाभदायक वेब एमडीच्या एका रिपोर्ट नुसार, देशी तूप टीबीच्या रोग्यांसाठी फायदेशीर आहे. मात्र केवळ घरगुती गोष्टींनी टीबी बरा होऊ शकत नाही. त्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावे लागतात. (सूचना -  येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहेत. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात