नवी दिल्ली, 06 मे: आधार (Aadhar Number) हा युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया (UIDAI) या संस्थेकडून प्रत्येक भारतीय नागरिकाला देण्यात येणारा 12 अंकी यूनिक क्रमांक असतो. सध्याच्या काळात आधार कार्ड (Aadhar Card) हा नागरिकाच्या सर्व प्रकारच्या ओळखीचा पुरावा मानला जातो. त्यामुळे आधार क्रमांक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. महत्त्वाचा आहे. आधार कार्डसाठी नोंदणी करताना संबंधित व्यक्तीच्या जन्मतारखेपासून वास्तव्यापर्यंतची आणि त्याची बायोमेट्रिक माहितीही गोळा केली जाते. आधार नंबर मोफत उपलब्ध करून दिला जातो. सर्व भारतीय नागरिकांना आधार कार्डसाठी नोंदणी बंधनकारक असून, लहान मुलांनाही हा नियम लागू आहे. लहान मुलांना आधार कार्ड देण्यासाठी बाल आधारकार्ड नावाची मोहीम UIDAIने सुरू केली आहे. भारतात आता अगदी नवजात बालकही आधार कार्डसाठी पात्र आहे. लहान मुलांच्या आधारकार्डसाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया प्रौढांप्रमाणेच आहे. त्यासाठी बालकांच्या पालकांना त्यांच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जाऊन आवश्यक माहितीसह फॉर्म भरावा लागतो. हे आधार कार्डही मोफतच दिलं जातं. तसंच पाच वर्षांखालच्या मुलांच्या नोंदणीवेळी त्यांचा बायोमेट्रिक डेटा घेतला जात नाही. मात्र पहिल्यांदा मुलं पाच आणि आणि नंतर 15वर्षांची झाली, की त्यांची माहिती आणि बायोमेट्रिक डेटा (Bio metric Data) अपडेट करावा लागतो. हाताच्या दहा बोटांचे ठसे (Fingerprints), चेहऱ्याचा फोटो, तसंच डोळ्यांच्या बाहुल्यांचं स्कॅनिंग करून बायोमेट्रिक माहिती नोंदवली जाते. हे वाचा- कोरोना काळात मोठा दिलासा! इमरजन्सी हेल्थ सेवांसाठी RBI ने दिले 50,000 कोटी लहान मुलांच्या आधार कार्डसाठी ऑनलाइन (Online) अर्ज कसा करायचा? -https://uidai.gov.in/याUIDAIच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. -आधार कार्ड रजिस्ट्रेशन लिंकवर (Registration Link) क्लिक करा -आवश्यक ती सर्व वैयक्तिक माहिती त्यात भरा. त्यात मुलाचं नाव, पालकांचा फोन नंबर, ई-मेल आयडी इ. माहितीचा समावेश असतो. आधार एनरोलमेंट फॉर्मही भरावा लागतो. - त्यानंतर तुम्ही वास्तव्य करत असलेल्या ठिकाणाचा संपूर्ण पत्ता द्या -त्यानंतर अपॉइंटमेंट बटणावर क्लिक करा आणि आधार कार्डच्या रजिस्ट्रेशनसाठी तारीख निश्चित करा -अर्जदार/पालक/आई-वडील यांपैकी जे कोणी अर्ज करत असतील, ते नोंदणीच्या पुढच्या प्रक्रियेसाठी जवळचं नोंदणी केंद्र निवडू शकतात. -ज्या तारखेची अपॉइंटमेंट घेतली असेल, त्या तारखेला संबंधित नोंदणी केंद्रावर प्रत्यक्ष जा. जाताना आपल्यासोबत मुलाचा जन्मदाखला,आई-वडिलांच्या आधार कार्डच्या सत्यप्रती अशी सर्व संबंधित कागदपत्रं घेऊन जा. ऑनलाइन नोंदणी करताना जो रेफरन्स नंबर मिळाला असेल, तोही सोबत घेऊन जावा. हे वाचा- Gold Price Today: सोन्याचांदीला पुन्हा झळाळी! खरेदीआधी इथे तपासा नवा दर -संबंधित केंद्रावर असणारे अधिकारी सर्व कागदपत्रांची पडताळणी (Verification) करतील. मूल पाच वर्षांवरचं असेल, तर मुलाची बायोमेट्रिक नोंदणी करून तीही त्याच्या अकाउंटला जोडली जाईल. मूल पाच वर्षांपेक्षा कमी वयाचं असेल, तर केवळ फोटो घेतला जाईल, बायोमेट्रिक नोंदणी केली जाणार नाही. -कन्फर्मेशन/व्हेरिफिकेशन प्रक्रियेनंतर अर्जदाराला अॅक्नॉलेजमेंट नंबर (Acknowledgement Number) दिला जाईल. तो नंबर वापरून वेबसाइटवरून तुमच्या अर्जाचं स्टेटस तपासता येईल. -अर्ज केल्यानंतर 60 दिवसांच्या आत तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे एक नोटिफिकेशन येईल. -नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 90 दिवसांच्या आत तुम्हाला बाल-आधार कार्ड (Bal-Aadhaar Card) घरी मिळेल. लहान मुलांच्या आधार कार्डसाठी ऑफलाइन (Offline)अर्ज कसा करायचा? -आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जा -लहान मुलांच्या आधार कार्डसाठी नोंदणी करण्याचा फॉर्म तिथल्या अधिकाऱ्याकडून घ्या -माहिती भरून, कागदपत्रांसह तो फॉर्म तिथल्या अधिकाऱ्यांकडे सादर करा हे वाचा- कोरोनामध्ये ‘या’ कर्मचाऱ्यांना 4 दिवसांचा आठवडा;Covid उपचाराचा खर्च कंपनी उचलणार -नोंदणीच्या वेळी मुलाच्या आई-वडिलांचा आधार कार्ड क्रमांक देणं बंधनकारक असतं. -व्हेरिफिकेशन प्रक्रियेनंतर मुलाचा फोटो काढला जाईल. मूल पाच वर्षांपेक्षा लहान असेल, तर बायोमेट्रिक नोंदणी केली जाणार नाही. -मूल पाच वर्षांपेक्षा मोठं असेल, तर त्याचा फोटो, दहा बोटांचे ठसे, डोळ्यांच्या बाहुल्यांचं स्कॅनिंग आदी बायोमेट्रिक नोंदणी केली जाईल. -कन्फर्मेशननंतर अॅक्नॉलेजमेंट स्लिप दिली जाईल. ती पुढील संदर्भासाठी जपून ठेवावी. -वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 60 दिवसांच्या आत मोबाइलवर मेसेज येईल. तसंच, मेसेज आल्यानंतर 60 दिवसांच्या आत बाल-आधार कार्ड घरी पोहोचेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.