Home /News /money /

Gold Price Today: सोन्याचांदीला पुन्हा झळाळी! खरेदीआधी इथे तपासा नवा दर

Gold Price Today: सोन्याचांदीला पुन्हा झळाळी! खरेदीआधी इथे तपासा नवा दर

Gold Price Today: सोन्याचांदीच्या किंमतीत सध्या चढउतार सुरू आहे. आज बुधवारी सोन्याचांदीचे दर वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं

    नवी दिल्ली, 05 मे:  सोन्याचांदीच्या दरात (Gold and Silver Rates Today) लग्नसराईच्या काळामुळे चढउतार सुरुच आहे. आज बुधवारी सोन्याच्या दरात (Gold Rates on 5th May 2021) तेजी पाहायला मिळाली. तर चांदीच्या किंमतीतही (Silver Price) जोरदार उसळी पाहायला मिळाली आहे. एमसीएक्सवर (MCX Multi Commodity Exchange) वर जूनसाठीच्या सोन्याची वायदे किंमती 0.26 टक्क्यांनी वाढली आहे. यानंतर सोन्याचे भाव प्रति तोळा 46,993 रुपयावर आहेत. तर चांदीच्या दरात 0.56 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर चांदीचे दर 70,039 रुपये प्रति किलोग्राम आहेत. सर्वोच्च स्तरावरून जवळपास 10 हजारांनी कमी झाले दर गेल्यावर्षीच्या ऑगस्टमध्ये सोन्याचे दर (August 2020 Gold Rates) 56200 रुपये प्रति तोळा या सर्वोच्च स्तरावर (Gold Record High) पोहोचले होते. तसं पाहिलं तर रेकॉर्ड हायवरून सोन्याचे दर जवळपास 9000 ते 10000 रुपयांनी कमी झाले आहे. कशाप्रकारे तपासाल सोन्याची शुद्धता? जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल. हे वाचा-कोरोना काळात मोठा दिलासा! इमरजन्सी हेल्थ सेवांसाठी RBI ने दिले 50,000 कोटी का वाढले सोन्याचे दर? एचडीएफसी सिक्‍योरिटीजचे सीनियर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते रुपयामध्ये आलेल्या घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर वाढले आहेत. शिवाय देशात कोरोनाचे संक्रमण देखील वाढले आहे, परिणामी सोन्याकडे गुंतवणूकदार एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. यामुळे सोन्याच्या किंमतीना पाठिंबा मिळत आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today

    पुढील बातम्या