नवी दिल्ली, 4 मे : कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान खासगी व सरकारी कर्मचारी नित्यनियमाने आपलं काम करीत आहे. त्यातही अत्यावश्यक सेवेत डिलिव्हरी प्लॅटफॉर्ममध्ये काम करणारे कर्मचारी गेल्या अनेक महिन्यांपासून काम करीत आहे. (Swiggy Online Food Delivery) फूड ऑर्डर आणि डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Swiggy चे कर्मचारी मे महिन्यात आठवड्यातील केवळ 4 दिवस काम करणार आहेत. यासंदर्भात एक इंटरनल मेल पाठविण्यात आली आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता स्विगी (Swiggy) ने आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी (Employees) हा निर्णय घेतला आहे. Swiggy चे कर्मचारी आठवड्यातील 4 दिवस करणार काम PTI मधील बातमीनुसार या महिन्यात म्हणजे मे मध्ये स्विगीचे कर्मचारी आठवड्यातील केवळ 4 दिवस काम करतील. उरलेले तीन दिवस त्यांना सुट्टी असेल. स्विगीचे एचआर हेड गिरीश मेनन (Girish menon) यांनी कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या इमेलमध्ये याबाबत माहिती दिली आहे. यात त्यांना सांगितलं आहे की, स्विगीच्या स्टाफने खूप मेहनत केली आहे आणि आम्हाला त्यांचं कौतुक आहे. देशातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आम्ही मे महिन्यात आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 4 दिवसांचा आठवडा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे ही वाचा- कोरोनामध्ये पैशांचा काहीच उपयोग नाही’; ब्रीजवरुन पैशांचा पाऊस, VIDEO VIRAL कर्मचारी ठरवणार कधी काम करायचं मेनन यांनी ई-मेलमध्ये लिहिलं आहे की, आठवड्यातील चार दिवस ठरवा व त्यानुसार तुम्ही काम करू शकता. बाकीचे दिवस तुम्ही आराम करा. स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याची जबाबदारी कंपनीची आहे. इतकच नाही तर स्विगीने आपल्या स्टाफसाठी ऑनलाइन मेडिकल कन्सल्टेशन (online doctor consultation) आणि मेडिकल सपोर्ट (medical support) ही सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा जे होम क्वारंटाइन, किंवा महासाथीतून रिकव्हरीच्या प्रक्रियेत आहेत, अशा कर्मचाऱ्यांसाठी असेल. यामध्ये स्विगी (swiggy) च्या स्टाफला होम आइसोलेशन आणि क्वारंटाइन केयर कव्हरेजसारख्या सुविधा दिल्या जात आहे. कंपनी यासाठी लागणारा खर्चदेखील उचलणार आहे. याशिवाय कंपनीच्या स्टाफ किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज असेल तर तोदेखील खर्च कंपनीकडून उचलण्यात येईल. जर स्विगीचे 2 स्टाफ एकत्र राहतील आणि त्यापैकी एक कोरोना पॉझिटिव्ह आला तर दुसऱ्या स्टाफसाठी सेल्फ क्वारंटाइन सुविधा कंपनीकडून देण्यात येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.