जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Vastu Shastra : घरात कायम ठेवावी ही एक वस्तू, पैशांची चणचण कधी भासणार नाही

Vastu Shastra : घरात कायम ठेवावी ही एक वस्तू, पैशांची चणचण कधी भासणार नाही

Vastu Shastra : घरात कायम ठेवावी ही एक वस्तू, पैशांची चणचण कधी भासणार नाही

घरात वास्तुशास्त्रानुसार काही बदल केल्यानंतर तुमच्या आयुष्यात आनंदच नाही तर, व्यक्तीच्या आयुष्यातून आर्थिक त्रास आणि सर्व प्रकारचे दु: खही दूर होतात, असं म्हटलं जातं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : पैसे मिळवण्यासाठी लोक रात्रंदिवस काम करतात. काही शारीरिक श्रम करतात, काही बौद्धिक श्रम करतात. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लोक मेहनत करत राहतात. प्रत्येक व्यक्तीला त्याच्याकडे पैशाची कमतरता नसावी, असं वाटतं. वास्तुशास्त्राचाही (Vastu Tips) आधार घेतला जातो. घरात वास्तुशास्त्रानुसार काही बदल केल्यानंतर तुमच्या आयुष्यात आनंदच नाही तर, व्यक्तीच्या आयुष्यातून आर्थिक त्रास आणि सर्व प्रकारचे दु: खही दूर होतात, असं म्हटलं जातं. हे करून पहा देवी लक्ष्मी संपन्नतेची देवता आहे. ती घरात राहण्यासाठी लोक सर्व उपाय करतात. परंतु, जर तुमच्या घरात शांतता नसेल, तुम्हाला आर्थिक समस्या येत असतील आणि तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव असेल तर, तुमच्या घरात चांदीचा मोर (keep silver peacock in the house) ठेवा. चांदीचा मोर खूप फायदेशीर मानला जातो. हे ही वाचा- शुभकार्यात आहेर म्हणून 11, 21, 51, 101 रुपये का देतात? चांदी शुभ मानली जाते. शिवाय मोर देवतांना खूप प्रिय असल्याचंही म्हटलं जातं. या कारणामुळं चांदीचा मोर घरात ठेवल्यानं सकारात्मक उर्जा तर मिळतेच. पण पैशाची कमतरताही भासत नाही, असं मानलं जातं. नाचणारा मोर करेल आर्थिक संकटावर मात तुम्ही आर्थिक समस्यांनी घेरलेले असाल तर घरात चांदीच्या नाचणाऱ्या मोराची मूर्ती ठेवा. यामुळं पैशाशी संबंधित कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा समस्या दूर होते. वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारचे तणाव असतील किंवा कोणतेही वादविवाद चालू असतील तर घरात चांदीचा मोर ठेवावा. असं केल्यानं तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. तसंच, तुमच्या वैवाहिक जीवनातील ताणही दूर होईल. सुख-समृद्धी वाढेल तुम्ही तुमच्या ड्रॉईंग रूममध्ये चांदीचा मोर ठेवला तर आनंद आणि समृद्धी वाढेल. नकारात्मकता निघून जाईल आणि घरात राहणाऱ्या सर्व सदस्यांच्या जीवनात स्थिरता आणि शांतता आणि यश येईल. पूजेच्या ठिकाणी चांदीचा मोर ठेवल्यास दुहेरी फळ मिळते. मात्र, पूजाघरात ठेवलेल्या मोराची मूर्ती शांत स्थितीतील असावी. (सूचना : वास्तूशास्त्रावर आधारित ही माहिती विविध स्त्रोतांतून मिळवलेली आहे. न्यूज 18 लोकमत यांची कोणतीही हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: money
  • First Published :
जाहिरात
जाहिरात