मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Vastu tips : घरात मुंग्याची रांग लागली आहे.... यातून वास्तू देत असते विशिष्ट संकेत

Vastu tips : घरात मुंग्याची रांग लागली आहे.... यातून वास्तू देत असते विशिष्ट संकेत

घरात एखाद्या पदार्थाला मुंग्या लागणं काही नवं नाही. पण कधी कधी मुंग्यांची रांग घरात कुठेही दिसते आणि त्या कशाला लागल्यात हेही कधी समजत नाही. पावसाळ्याच्या सुरुवातीला (Rainy Season) किंवा उन्हाळ्याच्या (Heat) दिवसात घरात भिंतीवर मुंग्यांची रांग (Ants in row) दिसणं अगदी सामान्य बाब आहे. अन्नाच्या शोधात एका रांगेने जाणाऱ्या असंख्य मुंग्या नेहमीच आपल्याला दिसतात. साखरेच्या (Sugar)किंवा अन्य पदार्थांच्या डब्यापर्यंत त्या गेलेल्या दिसल्या की आपण त्यांना नष्ट करण्याचे उपाय योजतो. अनेकदा काळ्या मुंग्याही (Black Ants)दिसतात. लाल मुंग्या (Red Ants)आपल्या अंगावर चढल्यास चांगलाच डंख करतात. त्यामुळे चांगलेच झोंबते, चुरचुरते; पण काळ्या मुंग्या चावत नाहीत. त्यामुळे काळ्या मुंग्या दिसल्या तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं.

एवढीशी मुंगी आपल्याला कष्टाळूपणा, शिस्त, चिकाटी यांचे धडे देत असते. त्यामुळे लहानपणापासून ही मुंगी आपल्या भावविश्वात आश्चर्यकारक प्राणी म्हणून कायमची नोंदली गेलेली असते. अशी ही मुंगी घरात दिसल्यास त्यामागे काही विशिष्ट संकेत असल्याचे वास्तूशास्त्रात (Vastu Shastra) मानले जाते. वास्तूमध्ये विविध रंगांच्या मुंग्यांच्या आगमनाचे अनेक प्रतीकात्मक अर्थ आहेत. अशा काही संकेताविषयी आपण जाणून घेणार आहोत.

वास्तूशास्त्रानुसार घरात मुंग्याची रांग लागणे हे घरामध्ये सुख आणि संपत्ती असल्याचे लक्षण मानले जाते आणि त्यामुळे अनेक लोक मुंग्यांना मारत नाहीत तर त्यांना धान्य वगैरे खाद्य पुरवतात. अनेक घरांमध्ये काळ्या रंगाच्या मुंग्यांचे आगमन शुभ मानले जाते आणि त्यांना अन्न देणे हे धार्मिक प्रथा मानली जाते.

भिंतीवर मुंग्या :

घरामध्ये भिंतींवर (Wall) मुंग्याची रांग चढताना दिसली तर याचा अर्थ घरात शुभ कार्य (Auspicious work) होणार आहे असा होतो. हे समृद्धी आणि प्रगतीचे लक्षण मानले जाते. मुंग्या उतरत असतील तर मात्र ते नुकसानीचे लक्षण मानले जाते.

काळ्या मुंग्या :

घरामध्ये काळ्या मुंग्या दिसल्या तर ते शुभ मानले जाते. घरात काळ्या मुग्यांची रांग लागली असेल तर तुमच्या आयुष्यात लवकरच धनसंपत्ती आणि सुख येणार आहे, असा याचा अर्थ असतो. काळ्या मुंग्यांना खायला दिल्यास ते शुभ मानले जाते.

तांदळाच्या डब्यात मुंग्या :

अनेकदा आपण बघतो की घरातील धान्याला मुंग्या लागलेल्या असतात. मुंग्या तांदळाच्या (Rice)डब्यातून बाहेर येत असतील तर ते एक चांगले चिन्ह मानले जाते. हे धनाच्या आगमनाचे लक्षण आहे. काळ्या मुंग्या तांदळाच्या डब्याला लागलेल्या असतील तर काही आर्थिक संकट असेल दूर होते. घरात अन्नधान्याची कमतरता उरत नाही. घर अन्नधान्याने भरते.

लाल मुंग्या :

घरात लाल मुंग्या दिसल्या तर मात्र ते अशुभ मानले जाते. लाल मुंग्या आल्या असतील तर त्याचा याचा अर्थ आयुष्यात त्रास, वाद आणि ज्यादा खर्च होण्याची शक्यता असते.

तेच मात्र घरात लाल मुंग्या तोंडात अंडी ( Eggs) घेऊन जाताना दिसल्या तर मात्र ते शुभ चिन्ह (Good Sign) मानले जाते. तुमच्या घरातील महत्त्वाचे काम प्रगतीपथावर असल्याचे हे चिन्ह असते.

दिशानिर्देशावर आधारित

घरामध्ये उत्तर किंवा दक्षिण दिशेकडून काळ्या मुंग्या येत असतील तर हे शुभ लक्षण आहे. मात्र पूर्व दिशेकडून मुंग्या येत असतील तर घरात वाईट बातमी येण्याची शक्यता असते. मुंग्या पश्चिमकडून येत असतील तर तो प्रवासाचा योग असल्याचा संकेत असतो.

(Disclaimer: या लेखातली माहिती सामान्यपणे उपलब्ध ज्ञानावर आधारित आहे. News18 याची पुष्टी करत नाही.)

First published:

Tags: Home-decor