मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सर्वच कोरोना रुग्णांना Plasma therapy देणं गरजेचं आहे का? काय आहे डॉक्टरांचं म्हणणं

सर्वच कोरोना रुग्णांना Plasma therapy देणं गरजेचं आहे का? काय आहे डॉक्टरांचं म्हणणं

सध्या अनेक ठिकाणी प्लाझ्माचा तुटवडा निर्माण झाल्याच्या बातम्या येत होत्या. कोरोना रुग्णांसाठी ही प्लाझ्मा थेरेपी (plasma therapy) किती महत्त्वाची आणि त्यासंबंधित अशा अनेक प्रश्नांना महाराष्ट्र आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिलेली ही उत्तरं.

सध्या अनेक ठिकाणी प्लाझ्माचा तुटवडा निर्माण झाल्याच्या बातम्या येत होत्या. कोरोना रुग्णांसाठी ही प्लाझ्मा थेरेपी (plasma therapy) किती महत्त्वाची आणि त्यासंबंधित अशा अनेक प्रश्नांना महाराष्ट्र आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिलेली ही उत्तरं.

सध्या अनेक ठिकाणी प्लाझ्माचा तुटवडा निर्माण झाल्याच्या बातम्या येत होत्या. कोरोना रुग्णांसाठी ही प्लाझ्मा थेरेपी (plasma therapy) किती महत्त्वाची आणि त्यासंबंधित अशा अनेक प्रश्नांना महाराष्ट्र आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिलेली ही उत्तरं.

पुढे वाचा ...

मुंबई, 18 एप्रिल : कोरोना रुग्णांवर सध्या वेगवेगळ्या औषधांनी उपचार (Coronavirus treatment) केले जात आहे. शिवाय काही रुग्णांना प्लाझ्मा थेरेपी (Plasma therapy) दिली जात आहे. गेले काही दिवस प्लाझ्माचा तुटवडा असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. ही प्लाझ्मा थेरेपी म्हणजे काय? कोरोना रुग्णांसाठी ती किती फायदेशीर आहे? प्लाझ्मा दान कोण आणि केव्हा करू शकतं? प्लाझ्मा दान केल्याने किंवा प्लाझ्मा घेतल्याने काही दुष्परिणाम होतात का? असे बरेच प्रश्न तुमच्या मनातही असतील.

महाराष्ट्र आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी प्लाझ्माबाबत असलेल्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

१. प्लाझ्मा म्हणजे काय?

रक्तातील पांढऱ्या पेशी, लाल पेशी, प्लेटलेट्स बाजूला काढल्यावर रक्तातील द्रवस्वरूप जो भाग उरतो त्याला प्लाझ्मा म्हणतात. आपल्या शरीरातील द्रव पदार्थांमध्ये ५५ टक्के भाग प्लाझ्माने व्यापलेला असतो.

२. प्लाझ्मा थेरेपी काय आहे?

करोनाच्या आजारातून पूर्ण बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील प्लाझ्मा, करोनाने बाधित असलेल्या आणि मध्यम गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णाच्या शरीरात शिरेवाटे उपचारासाठी दिला जातो, त्याला 'कॉन्व्हालिसन्ट प्लाझ्मा थेरपी' म्हणतात.

३. प्लाझ्मा थेरेपी केव्हा वापरली जाते?

करोनाची बाधा झाल्यामुळे गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाला पहिल्या ७२ तासात प्लाझ्मा थेरपी दिली जाते. बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातील अॅण्टिबॉडीज या प्लाझ्मामध्ये असतात. त्यामुळे प्लाझ्मा घेणाऱ्या रुग्णाच्या आजाराचे गांभीर्य कमी होते, त्याच्या शरीरातील करोनाच्या तो लवकर बरा होण्याची शक्यता असते.

४. सामान्यपणे कोण प्लाझ्मा दान करू शकतं?

करोनाची बाधा होऊन बरा झालेला रुग्ण, जर १८ ते ५५ वयोगटातील असेल तर तो आजारपणानंतर ३० ते ४० दिवसांनंतर प्लाझ्मा दान करू शकतो. मात्र त्याच्या रक्ताची तपासणी करून त्यात किती प्रमाणात अॅण्टिबॉडीज आहेत, त्याला रक्तातून पसरणारे आजार तर नाहीत ना? याचे मोजमाप करूनच त्याचा प्लाझ्मा घेतला जातो. कमी अॅण्टिबॉडीज असल्यास त्या प्लाझ्माचा रुग्णाला उपयोग होणार नसल्याने अशा व्यक्तींना प्लाझ्मा दान करता येत नाही.

5. सामान्यपणे प्लाझ्मा दान कोण करू शकत नाही?

• करोना न झालेल्या व्यक्ती,

• ज्यांच्या शरीरात अगदी कमी प्रमाणात अॅण्टिबॉडीज आहेत अशा व्यक्ती,

• ५० किलोपेक्षा कमी वजन असलेल्या व्यक्ती,

• ६० वर्षावरील वयाच्या व्यक्ती,

• ज्यांचे हिमोग्लोबिन १२ ग्रॅम टक्क्यांपेक्षा कमी आहे अशा व्यक्ती

• एचआयव्ही, सिफिलीस, मूत्रपिंडारोपण झालेले रुग्ण, कर्करोग, ह्युमन टी सेल ल्युकेमिया व्हायरस1 ने बाधित झालेल्या व्यक्ती,

हे वाचा - अपुऱ्या आरोग्य सोयी-सुविधांचं आव्हान; पंतप्रधान मोदींनी दिला नवा ACTION PLAN

• क्षयरोग, हिपॅटायटिस बी, सी, इ झालेले रुग्ण,

• ज्यांची गेल्या सहा महिन्यात मोठी शस्त्रक्रिया झाली आहे असे रुग्ण,

• गरोदर स्त्रिया, गरोदरपणी ज्यांना करोना झाला आणि ज्यांना १ वर्ष किंवा त्याहूनही लहान वयाचे बाळ आहे अशा स्त्रिया

• ज्यांचा मधुमेह अनियंत्रित आहे किंवा ज्यांना गेल्या २८ दिवसात मधुमेहाच्या गोळ्या बदलाव्या लागल्या आणि इन्सुलिन घेणाऱ्या मधुमेही रुग्णांना देखील प्लाझ्मादान करता येत नाही.

• १४०/९० पेक्षा जास्त रक्तदाब असलेल्या व्यक्ती किंवा गेल्या २८ दिवसात ज्यांची रक्तदाबाची औषधे बदलावी लागली अशा व्यक्तींना प्लाझ्मादानाचे कार्य करता येत नाही.

६. सामान्यपणे प्लाझ्मा दान करण्याच्या अटी काय आहेत?

१८ वर्षावरील आणि ६० वर्षांच्या आतील वय असले पाहिजे, करोनामधून बरे होऊन साधारणपणे एक महिना झालेला असला पाहिजे अशा व्यक्ती आणि प्लाझ्मा दान करण्यातून ज्यांना वगळले जाते असे आजार नसलेल्या व्यक्तींची तपासणी करून त्यांच्या रक्तातील अॅण्टिबॉडीजचे प्रमाण व्यवस्थित असले पाहिजे.

७. कोणकोणत्या आजारावर प्लाझ्मा थेरपी फायदेशीर ठरली?

अनेक प्रकारच्या जन्मजात जनुकीय आजारांवर प्लाझ्मा थेरपी वापरली जाते.

• अल्फा-१ अॅण्टिट्रिप्सिन डेफीशियन्सी

• हेरेडीटरी अँजिओइडिमा

• हिमोफिलिया ए आणि बी

• व्हॉन विलिब्रान्ड डिसीज

• प्रायमरी इम्युनोडिफीशियन्सी डिसीज

• इडिओपाथिक थ्रोम्बोसायटोपेनिक पर्प्युरा (आयटीपी)

• कावासाकी डिसीज

हे वाचा - दारिद्य रेषेखालील नागरिकांना Remdesivir मोफत देण्याचा 'या' राज्याचा निर्णय

याशिवाय गंभीररित्या भाजलेल्या व्यक्ती, आजारपणामुळे रक्तदाब खूप कमी होऊन 'शॉक'मध्ये गेलेल्या व्यक्ती, गंभीर अपघातात शरीरामध्ये अनेक ठिकाणी जखमा आणि हाडे मोडलेल्या व्यक्ती, खूप दीर्घकाळ चालणारी मोठी शस्त्रक्रिया, आरएच रक्तगट न जुळल्याने रक्तदानात समस्या निर्माण झालेले रुग्ण, हृदयाचे आणि फुफ्फुसाचे आजार, इंद्रियारोपण, एचआयव्हीग्रस्त लहान मुले, हिपॅटायटिस आणि यकृताचे अन्य आजार, श्वानदंश आणि काही ऑटोइम्युन डिसिजेस यामध्येही प्लाझ्मा यशस्वीरित्या वापरला गेलेला आहे.

८. प्लाझ्मा थेरेपी कोरोनावर किती फायदेशीर आहे?

२०२०सालच्या ऑगस्टपर्यंत प्लाझ्मा थेरपी करोना रुग्णांना दिली जात होती, मात्र त्यानंतर प्लाझ्मा थेरपीने रुग्ण लवकर बरा होतो आणि त्याचा मृत्यू टळतो या दोन गोष्टी अमान्य करत आयसीएमआरने करोनाच्या अधिकृत उपचारांच्या यादीतून प्लाझ्मा थेरपी काढून टाकली.

९. प्लाझ्मा थेरेपी कोरोनाच्या इतर नव्या स्ट्रेनवरदेखील प्रभावी आहे का?

नव्या स्ट्रेनमुळे बाधित झालेल्या व्यक्तींनी ते बरे झाल्यावर जर प्लाझ्मा दान केले तर ते त्याच नव्या स्ट्रेनने बाधित झालेल्या रुग्णांना उपयुक्त ठरू शकेल

१०. प्लाझ्मा थेरेपी सुरुवातीला कोरोनावर खूप फायदेशीर असल्याचं सांगितलं जात होतं? आता त्याबाबत फारसं का बोललं जात नाही? याबाबत जनजागृती कमी आहे का?

प्लाझ्मा थेरपीवर केलेल्या जागतिक संशोधनात कोरोना बाधित रुग्णांना प्लाझ्मा दिल्यास त्यांच्या आजाराच्या संभाव्य गुंतागुंतीमध्ये आणि मृत्युदरात फरक पडत नाही असे दाखवून दिल्यामुळे आज सरकारतर्फे प्लाझ्मा थेरपीबद्दल फारसे बोलले जात नाही.

केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या संशोधनानुसार प्लाझ्मा थेरपी कोरोनाच्या रुग्णांना दिल्यानंतर त्यांच्यात कोरोनाचे नवे स्ट्रेन निर्माण झाले.

प्लाझ्मा थेरपीच्या अवांछित दुष्परिणामांबद्दल लोकांमध्ये जागृती नाही. त्यामुळे प्लाझ्मा थेरपी म्हणजे रुग्णांना संजीवनी देणारा उपचार असेच अजूनही मानले जाते.

११. ICMR आणि WHO या यांचं कोरोना आणि प्लाझ्मा थेरेपीबाबत काय म्हणणं आहे?

ICMR ने प्लाझ्मा थेरपीमुले रुग्णाच्या परिस्थितीत फारसा फरक पडत नाही आणि मृत्यूदरात सुधारणा होत नाही असे जाहीर करून प्लाझ्मा थेरपी आपल्या अधिकृत उपचारांच्या मार्गदर्शक सूचनांमाद्झून वगळली आहे.

WHO च्या अधिकृत संकेतस्थळावर प्लाझ्मा थेरपीबद्दल कोणतेही मत व्यक्त केले गेलेले नाही.

१२. कोरोना आणि प्लाझ्मा थेरेपीची सद्यस्थिती काय आहे?

जगभरात आजवर २२१ देशात कोरोना पसरला आहे. या जागतिक महामारीमध्ये १३ कोटी १६ लक्ष व्यक्ती कोरोनाने बाधित झाले आहेत आणि त्यात सुमारे २८ लाख ६० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका, भारत आणि ब्राझील या देशात सर्वात जास्त रुग्ण आहेत. युरोपियन देशात कोरोनाची तिसरी लाट आली असून भारतात दुसरी मोठी लाट आली आहे. गेल्या चार महिन्यात ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि भारतात नवे म्युटंट सापडले आहेत आणि त्यामुळे रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे.

हे वाचा - Explainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल?

जगभरात प्लाझ्मा थेरपीबाबत फारसा उत्साह नाही. ब्रिटनसह अनेक देशातले प्लाझ्मा थेरपीबाबतची संशोधने बंद केली आहेत. त्याऐवजी सर्वांना लस द्यावी असे अधिकृतरित्या अनेक संस्थांनी जाहीर केले आहे.

१३. कोरोनामुक्त व्यक्ती प्लाझ्मा दान कधी करू शकतात?

कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात ती बाधित झाल्यावर १४व्या दिवशी कोरोनाविरोधी अॅण्टिबॉडीज तयार होतात. त्यामुळे त्याकाळात ती व्यक्ती प्लाझ्मा दानाला पत्र असू शकते. पण सर्वसाधारणपणे कोरोना बरा झाल्यानंतर ३० ते ४० दिवसांच्या दरम्यान प्लाझ्मा दान करावे.

१४. मी कोरोनामुक्त आहे पण हार्ट पेशंट आहे मी प्लाझ्मा दान करू शकतो का?

आपला हृदयाचा आजार नियंत्रित असला तर प्लाझ्मा दान करू शकता. मात्र जर रक्तदाबासाठी सतत औषधे बदलावी लागत असतील तर आपण प्लाझ्मा दान करू नये.

१५. मी कोरोनामुक्त आहे मला मधुमेह आहे मी प्लाझ्मा देऊ शकतो का?

आपल्याला जन्मजात मधुमेह असेल, किंवा आपण टाईप-१ पद्धतीच्या मधुमेहाचे रुग्ण असाल आणि आपल्याला इन्सुलिन सुरु असेल तर आपण प्लाझ्मा दान करू शकत नाही. जर टाईप-२ पध्दतीचा मधुमेह असेल आणि तो नियंत्रित असेल; तुमच्या मधुमेहासाठी असलेली औषधे गेल्या सहा महिन्यात बदलावी लागली नसतील तर आपण प्लाझ्मा दान करू शकता.

१६. कोरोनामुक्त आहे, पण ब्लड प्रेशर आहे मी प्लाझ्मा दान करू शकतो का?

आपला रक्तदाब नियंत्रित असेल तर आपण प्लाझ्मा दान करू शकता. मात्र रक्तदाब नियंत्रित नसेल, किंवा गेल्या सहा महिन्यात आपली रक्तदाबाची औषधे बदलली गेली असतील तर आपल्याला प्लाझ्मा दान करण्याची परवानगी नाही.

१७.मी कोरोनामुक्त आहे पण ब्रेस्टफिडिंग करते मी प्लाझ्मा देऊ शकते का?

आपण प्लाझ्मा दान करू शकत नाही.

१८. प्रेग्नन्सीत कोरोनामुक्त झाले तर मी प्लाझ्मा देऊ शकते का?

आपणही प्लाझ्मा दान करू शकत नाही.

१९.प्लाझ्मा दान केल्यानंतर माझ्या आरोग्यावर काही दुष्परिणाम तर होणार नाही ना?

प्लाझ्मा दान केल्याने आरोग्यावर कोणताही दुषपरिनाम होत नाही.

२०. प्लाझ्मा दान केल्यानंतर माझ्या शरीरातील कोरोनाविरोधातील अँटिबॉडीज कमी तर होणार नाहीत ना?

प्लाझ्मा दान केल्याने शरीरातील अँटिबॉडीज घटत नाहीत.

२१. प्लाझ्मा दान केल्यानंतर मला परत कोरोना तर होणार नाही ना?

प्लाझ्मा दान केल्याने कोरोना होत नाही. मात्र आपल्याला नव्या स्ट्रेनने बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येण्याने कोरोना पुन्हा होऊ शकतो.

२२. प्लाझ्मा दान केल्यानंतर त्याचा आपल्या शरीरावर काही परिणाम दिसून येतो का?

कोणताही दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत नाही.

२३. मला प्लाझ्मा दान करायचं आहे पण प्रक्रिया काय आहे? कोरोनामुक्त व्यक्ती प्लाझ्मा दान कुठे करू शकतात?

आपल्याला प्लाझ्मा दान करायचे असेल तर,

• आपल्याला कोरोना होऊन त्यातून पूर्ण बरे होऊन किमान १५ ते ३० दिवस झाले असले पाहिजे.

• आपण वर दिलेल्या पात्रतेमध्ये असला पाहिजे आणि उपर्निर्दिष्ट आजार आपल्याला नसले पाहिजे.

• आपल्या जवळच्या मान्यताप्राप्त रक्तपेढीमध्ये ज्यांना प्लाझ्मा घेण्याची मान्यता आहे अशा ठिकाणी जाऊन आपण आपले नाव नोंदवू शकता.

हे वाचा - लसीकरणानंतरही अनेकांचा कोरोना अहवाल का येतोय पॉझिटिव्ह? वाचा महत्त्वाची कारणं

• आपली प्राथमिक तपासणी आणि रक्तातील अँटिबॉडीज तपासून योग्य असल्या आपले रक्त घेतले जाते.

• रक्त घेण्याची प्रक्रिया रक्तदानासारखीच असते.

२४. प्लाझ्मा दान केल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी?

प्लाझ्मा दान केल्यावर रक्तदानाप्रमाणेच प्यायला पाणी, कॉफी, बिस्किट्स दिली जातात. साधारणतः अर्धा तास तेथे बसवून ठेवले जाते. क्वचित काही व्यक्तींना रक्तदान केल्यानंतर होते त्याप्रमाणे हलकेसे गरगरू शकते. रक्तपेढीमधील डॉक्टर्स आपली योग्य ती काळजी घेऊन आवश्यक ते उपचार करू शकतात.

२५. प्लाझ्मा थेरेपीसाठी पैसे आकारले जातात का आणि किती?

आपल्याला प्लाझ्मा दान करायचे असेल तर पैसे आकारले जात नाहीत. मात्र रुग्णाला प्लाझ्मा देण्यासाठी जेंव्हा रुग्णाचे नातेवाईक रक्तपेढीमध्ये जातात, त्यावेळेस त्यांना महाराष्ट्र सरकारने नियोजित केल्यानुसार दर आकाराला जातो. प्लाझ्मा दात्याचे रक्त घेतल्यावर त्यावर केली जाणारी प्रक्रिया, त्याची साठवण अशा गोष्टींसाठी हे शुल्क आकारले जाते.

२६. कोणत्या कोरोना रुग्णांना प्लाझ्मा थेरेपी घेता येते?

भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या आदेशानुसार, मध्यम पातळीवरील कोरोनाचा संसर्ग असलेल्या रुग्णामध्ये जर ऑक्सिजनची पातळी जर ऑक्सिजन आणि स्टीरॉइड्स तसेच इतर उपचार घेऊन वाढत नसेल तर त्यांना प्लाझ्मा थेरपी द्यावी असे सांगितले गेले आहे. यामध्ये रुग्णाच्या रक्तगटानुसार प्लाझ्मा रक्तपेढीतून रुग्णाच्या नातेवाईकांकडून किंवा इस्पितळाची स्वतःची रक्तपेढी असेल तर तेथून मागवला जातो.

२७. मला प्लाझ्मा हवा असल्यास मी कुठे संपर्क करावा?

आपण ज्या कोव्हिड डेसीग्नेटेड रुग्णालयात असाल तिथे आपल्या गावातील प्लाझ्मा देऊ शकतील अशा केंद्रांची अथवा रक्तपेढीची माहिती दिली जाते. तिथे संपर्क करू शकता.

२८. प्लाझ्मा थेरेपी हवी हे रुग्ण ठरवू शकतो की फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेऊ शकतो?

कोरोना हा एक गंभीर संसर्गजन्य आजार आहे. त्याचा प्रत्येक उपचार हा तुमच्या डॉक्टरांनीच ठरवायचा असतो. आपल्याला प्लाझ्माची आवश्यकता आहे किंवा नाही, हे रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाच ठरवू द्या.

२९. प्लाझ्मा थेरेपीचे काही गंभीर दुष्परिणाम आहेत का?

प्लाझ्मा थेरपीचे काही साईडइफेक्ट्स नक्कीच असतात. उदा.

• सौम्य ताप येणे

• अॅलर्जीक रीअॅक्शन येणे

• श्वासनलिका अचानक आकुंचन पावून श्वास कोंडल्यासारखे वाटणे

• रक्तगट न जुळल्यास संपूर्ण रक्तामधील पेशींचे विघटन होणे.

• फुफ्फुसांना इजा होणे

हे वाचा - Explainer : वर्षभरानंतर लस मिळाली पण कोरोनाव्हायरसवर अद्याप औषध का नाही?

• प्लाझ्मा दात्याला जर एखादा रक्तामधून पसरणारा आजार असेल तर तो प्लाझ्माद्वारे रुग्णाला होऊ शकतो. उदा. एचआयव्ही, हीपटायटिस बी, सी वगैरे. मात्र अशा आजारांची रक्त दात्याच्या नमुन्यावर आधी तपासणी करूनच प्लाझ्मा घेतला जात असल्याने याची शक्यता खूप कमी असते.

३०. प्लाझ्मा थेरेपी झाल्यानंतर किती दिवसात कोरोना बरा होतो? काही विशिष्ट कालावधी आहे का?

प्लाझ्मा थेरपी झाल्यावर त्याचा परिणाम म्हणून रुग्ण किती दिवसात बरा होतो याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र उपलब्ध असलेल्या निरीक्षणानुसार मध्यम पातळीवरील संसर्ग असलेले रुग्ण कोरोनामधून १० दिवसात बरे होतात.

३१. प्लाझ्मा थेरेपी घेतल्यानंतर काही विशेष काळजी घ्यावी लागते का?

प्लाझ्मा थेरपी हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या रुग्णांनाच दिली जाते. त्यामुळे वर सांगितलेले साईडइफेक्ट्स रुग्णामध्ये दिसतायत का? याचे निरीक्षण रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सेस करत असतात. काही त्रास दिसल्यास त्याचे योग्य उपचार त्वरित केले जातात.

First published:
top videos

    Tags: Blood donation, Corona, Coronavirus