Corona संकटात मोठा निर्णय; 'या' राज्यात दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना Remdesivir मिळणार FREE

Corona संकटात मोठा निर्णय; 'या' राज्यात दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना Remdesivir मिळणार FREE

देशभरात कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येसोबतच रेमडेसिवीर औषधाचीही मागणी वाढत आहे. यामुळे अनेक ठिकाणी रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाल्याचं समोर येत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 एप्रिल: कोरोनाचा संसर्ग देशभरात वेगाने वाढत आहे. यामुळे गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर औषधाचाही तुटवडा जाणवत आहे. रेमडेसिवीरची वाढती मागणी लक्षात घेत मोदी सरकारने रेमडेसिवीरच्या किमतीत 50 टक्क्यांनी कपात केली आहे. तर त्याचवेळी दुसरीकडे आसाम सरकारने आपल्या राज्यातील काही नागरिकांना मोफत रेमडेसिवीर देण्याची घोषणा केली आहे.

रेमडेसिवीर हे औषध दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना मोफत देण्याचा निर्णय आसाम सरकारने घेतला आहे. आसामच्या आरोग्य विभागाने सांगितले की, दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना रेमडेसिवीर मोफत देण्यात येईल तर इतर नागरिकांना सरकारने ठरवून दिलेल्या दरात रेमडेसिवीर खरेदी करावे लागणार आहे.

रेमडेसिवीरच्या उत्पादनासाठी परवानगी

केंद्रीय रसायने आणि खत राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगतले, रेमडेसिवीरचे देशांतर्गत दुप्पट उत्पादन करण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने 12 एप्रिल 2021 पासून आतापर्यंत आणखी 20 कारखान्यांना परवानगी दिली आहे. महाराष्ट्रात रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार पूर्णपणे मदत करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Remdesivir औषध झालं स्वस्त; पाहा काय आहे नवी किंमत, कुठे होईल उपलब्ध?

रेमडेसिवीरच्या दरात 50 टक्क्यांनी कपात

रेमडेसिवीरच्या दरात 50 टक्क्यांनी कपात करण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे. यामुळे आता कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. मनसुख मांडवीय यांनी ट्विट करत भारतातील सात कंपन्यांची नावे आणि सध्या असलेली रेमडेसिवीर इंजेक्शनची किंमत तसेच 50 टक्के किमतीत कपात केल्यावर किती रुपयांना रेमडेसिवीर उपलब्ध होईल याची माहिती दिली आहे.

Published by: Sunil Desale
First published: April 17, 2021, 10:58 PM IST

ताज्या बातम्या