'बाला' प्रमाणे तुमचेही केस गळतात, आता तांदळाचं पाणी येईल मदतीला

'बाला' प्रमाणे तुमचेही केस गळतात, आता तांदळाचं पाणी येईल मदतीला

ऊन, प्रदूषण आणि हवेतील बदलाचा सरळ परिणाम केसांवर होतो. केस रुक्ष होऊन तुटतात आणि गळू लागतात. केस कमी झाल्याचा सरळ परिणाम व्यक्तिमत्त्वावर आणि आत्मविश्वासावर होतो.

  • Share this:

'बाला' सिनेमात अभिनेता आयुष्मान खुराना केस गळतीमुळे फार त्रासलेला दाखवण्यात आला आहे. गेलेले केस नव्याने मिळवण्यासाठी तो वेगवेगळे उपायही करतो. केस गळती किंवा टक्कल येणं ही सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात सर्वसामान्य गोष्ट आहे. ऊन, प्रदूषण आणि हवेतील बदलाचा सरळ परिणाम केसांवर होतो. केस रुक्ष होऊन तुटतात आणि गळू लागतात. केस कमी झाल्याचा सरळ परिणाम व्यक्तिमत्त्वावर आणि आत्मविश्वासावर होतो. याचमुळे आपण केस गळती थांबवण्याचे उपाय जाणून घेऊ...

तांदळाच्या पाण्याचे फायदे-

मेडिकल न्यूज टुडेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, तांदळाच्या पाण्यामुळे केसांमध्ये गुंता होत नाही. केस सरळ आणि चमकदार होतात. या पाण्यामुळे केस मजबूत तर होतातच शिवाय वाढही चांगली होते.

केसांच्या वाढीसाठी तांदळाचं पाणी कसं तयार करावं-

अर्धा कप तांदूळ पाण्यातून धुवून काढा. यानंतर तांदूळ एका भांड्यात घेऊन त्यात दोन ते तीन कप पाणी टाका. तीन ते चार मिनिटं तांदूळ पाण्यात भिजत ठेवा. एका चांगल्या भांड्यात ते पाणी काढून घ्या. तुमचं तांदळाचं पाणी तयार..

कसं वापरायचं पाणी-

नेहमीप्रमाणे केस शॅम्पूने धूवा, केसांमधून पूर्ण शॅम्पू जात नाही तोवर केस स्वच्छ धूवा. यानंतर तांदळाचं पाणी केसांवर टाकून चांगल्याप्रकारे मसाज करा. 20 मिनिटं हे पाणी केसांवर ठेवा. यानंतर केस स्वच्छ कोमट पाण्याने धूवा.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

आपल्या पार्टनर सोबत करा हे काम, घरात नांदेल सुखच सुख!

जगातभारी! चक्क बॉसनं धुतले कर्माचाऱ्यांचे पाय, पाहा VIRAL VIDEO

तुम्हाला स्पर्म काउंट वाढवायचाय? तर 'ही' गोष्ट दररोज खा, नक्कीच होणार फायदा

 

Published by: Madhura Nerurkar
First published: November 12, 2019, 2:45 PM IST

ताज्या बातम्या