Home /News /lifestyle /

हे ट्रॅफिक नियम माहित असणं तुमच्याच फायद्याचं! जेणेकरून कारणाशिवाय होणार नाही अडवणूक

हे ट्रॅफिक नियम माहित असणं तुमच्याच फायद्याचं! जेणेकरून कारणाशिवाय होणार नाही अडवणूक

नवा मोटर वाहन कायदा (New Motor Vehicle Act) देशात लागू होऊन आता एका वर्षाहून अधिक काळ उलटला आहे. जुन्या कायद्यात केलेल्या सुधारणा माहीत नसल्यामुळे नागरिकांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो.

    नवी दिल्ली, 06 मे: नवा मोटर वाहन कायदा (New Motor Vehicle Act) देशात लागू होऊन आता एका वर्षाहून अधिक काळ उलटला आहे. जुन्या कायद्यात केलेल्या सुधारणा माहीत नसल्यामुळे नागरिकांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेकदा तुम्हाला ट्रॅफिक पोलीस अडवतात आणि त्यांच्यासोबत तुमची खडाजंगी होते. त्यामुळे रागावून पोलीस इतर कलमांतर्गत गुन्हे दाखल करून तुम्हाला दंड करतात. त्यामुळे मोटर वाहन कायद्यातील बदल तुम्हाला माहीत असतील तर तुमचा पोलिसांशी वाद होणार नाही आणि तुम्हालाही लक्ष ठेवता येईल की त्यांनी कुठलं कलम लावलंय. जाणून घेऊया मोटर वाहन कायद्यातील कलमांमध्ये झालेल्या सुधारणा आणि बदललेले वाहतुकीचे नियम. -कलम 181 अंतर्गत विनापरवाना वाहन चालवणाऱ्याला 5000 रुपये दंड. -कलम 182 अंतर्गत अपात्र असूनही वाहन चालवल्याबद्दल 10,000 रुपये दंड भरावा लागेल. -कलम 183 अंतर्गत आता ओवरस्पीडिंग (निश्चित मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालवल्याबद्दल) LMV (Light Motor Vehicle) साठी 1000 रुपये तर MPV साठी2000 रुपये दंड भरावा लागेल. -कलम 184 अंतर्गत इतरांच्या जीवाला धोका निर्माण करेल अशा पद्धतीने वाहन चालवल्याबद्दल आता 5000 रुपये दंड भरावा लागेल. -कलम 185 अंतर्गत दारु पिऊन वाहन चालवल्याबद्दल 10,000 रुपयांचा दंड करण्याची तरतूद करण्यात आली आहे. -कलम 189 अंतर्गत स्पीडिंग/रेसिंगसाठी 5000 रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. हे वाचा-Explainer : सौम्य-लक्षणं नसणाऱ्या रुग्णांनी होम आयसोलेशनमध्ये कशी काळजी घ्याल? -कलम 1921A अंतर्गत विना परमिट वाहन (Without Permit Vehicle) चालवल्याबद्दल 10,000 रुपये दंड भरावा लागेल. -कलम 193 अंतर्गत लायसन्ससंबंधी नियम तोडले तर 25,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतुद केली आहे. -कलम 194 अंतर्गत ओवरलोडिंग (Over loading- मर्यादेपेक्षा अधिक सामान वाहनात लोड केल्यास) 2000 रुपये दंड आणि जादा मालाच्या प्रत्येक टनाला 1000 रुपये दंड निश्चित करण्यात आला आहे. वाहतुकीच्या वाहनाच्या प्रकारानुसार दुसऱ्या गटातील वाहनाला जादा माल भरल्याबद्दल 20,000 रुपये आणि जादाच्याप्रत्येक टनाला 2000 रुपयांचा दंड भरावा लागेल. -कलम 194A अंतर्गत ओवरलोडिंग (क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेणाऱ्या वाहनांना) प्रत्येक जादाच्या प्रवाशाचे 1000 रुपये दंड भरावा लागेल. -कलम 194B अंतर्गत गाडीमध्ये सीट बेल्ट लावला नाही तर 1000 रुपये दंड भरावा लागेल. -कलम 194C अंतर्गत स्कूटर आणि बाइकवर ओवरलोडिंग (Bike over loading) म्हणजे दोनहून अधिक प्रवासी बसून प्रवास केल्यास तर 2000 रुपयांपर्यंत दंड आणि 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द होऊ शकतं. -कलम 194D अंतर्गत विनाहेल्मेट वाहन चालवल्यास 1000 रुपयांपर्यंत दंड आणि 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द होऊ शकतं. -कलम 194E अंतर्गत अँब्युलन्ससारख्या इमर्जन्सी वाहनांना रस्ता मोकळा करून न दिल्याबद्दल 10,000 रुपयांपर्यंतचा दंड केला जाऊ शकतो. हे वाचा-'कोरोना संकटातील हे महत्त्वाचे पाऊल', पंतप्रधान मोदींनी केली केरळची प्रशंसा -कलम 196 अंतर्गत विमा न उतरवलेलं (इन्शुरन्स) वाहन चालवल्याबद्दल 2000 रुपयांचा दंड भरावा लागेल. -कलम 199 अंतर्गत अल्पवयीन व्यक्तीनी केलेल्या नियम उल्लंघनासाठी त्याच्या पालकांना (Parents)/ मालकाला (Owner) दोषी मानलं जाईल. यात 3 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतुद आहे. त्याचबरोबर अल्पवयीन व्यक्तीवर ज्युवेलाइन कायद्याअंतर्गत खटला चालवला जाईल आणि वाहनाचं रजिस्ट्रेशन रद्द होईल. -कलम 183, 184, 185, 189, 190, 194C, 194D, 194E अंतर्गत अधिकाऱ्यांना ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) निलंबित करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
    First published:

    Tags: Traffic, Traffic department, Traffic police, Traffic Rules

    पुढील बातम्या