Home /News /explainer /

Explainer: सौम्य आणि लक्षणं नसणाऱ्या रुग्णांनी होम आयसोलेशनमध्ये कशी काळजी घ्याल? नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर

Explainer: सौम्य आणि लक्षणं नसणाऱ्या रुग्णांनी होम आयसोलेशनमध्ये कशी काळजी घ्याल? नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर

Kolkata: A medic takes sample from a patient showing cough and fever symptoms for COVID-19 test, during ongoing lockdown, in Kolkata, Friday, May 8, 2020. (PTI Photo/Swapan Mahapatra) (PTI08-05-2020_000071B)

Kolkata: A medic takes sample from a patient showing cough and fever symptoms for COVID-19 test, during ongoing lockdown, in Kolkata, Friday, May 8, 2020. (PTI Photo/Swapan Mahapatra) (PTI08-05-2020_000071B)

सरकारने घरी असलेल्या रुग्णांकरिता नागरिकांना घरी रेमेडीसिव्हीर (Remdisivir) इंजेक्शन खरेदी करू नये किंवा ते देऊ नये असा कडक सल्ला दिला आहे.

    नवी दिल्ली, 2 मे: कोरोनाची (Corona) सौम्य लक्षणे (Mild Symptoms) असणाऱ्या किंवा असिम्प्टोमॅटिक (Asymptomatic) रुग्णांकरिता होम आयसोलेशन (Home Isolation) साठी गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Central Health Ministry) नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. सरकारने घरी असलेल्या रुग्णांकरिता नागरिकांना घरी रेमेडीसिव्हीर (Remdisivir) इंजेक्शन खरेदी करु नये किंवा ते देऊ नये असा कडक सल्ला दिला आहे. रेमडेसिव्हीर ही काही जादूची गोळी नाही, त्यामुळे ती फक्त दवाखान्यातच घ्यावी, असा सल्ला एम्सचे संचालक डॉ. रणदिप गुलेरिया यांनी वारंवार दिला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या गुरुवारी सकाळी 8 वाजताच्या अहवालानुसार, देशात एका दिवसात उच्चांकी 3,79,257 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1,83,76,524 झाली आहे. ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा 30 लाखांवर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत 2,04,832 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, दररोज 3645 दरम्यान कोरोनाबाधित मृत्यूमुखी पडत आहेत. या आहेत नव्या एसओपीज (SOP) आणि क्वारंटाईनबाबतचा तपशील वृध्द नागरिकांसाठी होम क्वारंटाईन आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार, ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, ह्दयरोग, जुने फुफ्फुस, किडनी किंवा लिव्हरचे आजार, सेरेब्रोव्हसक्युलर डिसिज यासारख्या कोमोर्बिड (Comorbid) असणाऱ्यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतरच त्यांना होम क्वारंटाईन साठी परवानगी दिली जाईल. जर रुग्णांची ऑक्सिजन पातळी (Oxygen level) खालावली आणि त्यास श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तर त्यास तातडीने रुग्णालयात भरती करावे किंवा उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांशी, पाहणी करणाऱ्या टीमशी संपर्क साधावा. हे ही वाचा-तुम्हीच ठरवा कोणती कोरोना लस योग्य? मोदी सरकारने सर्वसामान्यांवर सोपवला निर्णय रुग्णाला कधी आणि कोठे आयसोलेट करावे कोरोनाबाधित रुग्णाने स्वतःला कुटुंबातील व्यक्ती पासून दूर ठेवले पाहिजे. त्याने स्वतंत्र खोलीतच राहावे. विशेषतः कोमॉर्बिड स्थिती असलेल्या वयोवृद्ध सदस्यांपासून तर दूरच राहावे. कोरोना बाधित रुग्णाला क्रॉस व्हेंटिलेशन (Cross Ventilation) असलेल्या हवेशीर खोलीत ठेवावे. ताजी हवा आत येण्यासाठी खोलीच्या खिडक्या खुल्या ठेवाव्यात, त्याने सातत्याने तिहेरी स्तर असलेला वैद्यकीय मास्क (Mask) वापरावा, आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. रुग्णाने दर 8 तासांनी मास्क बदलावा. वापरलेल्या मास्कची योग्य ती विल्हेवाट लावावी. काळजीवाहू व्यक्ती रुग्णाच्या खोलीत आल्यास त्या व्यक्तीने आणि रुग्णाने त्यावेळी N 95 मास्क वापरावा. मास्क काढून टाकल्यानंतर तो 1 टक्का सोडीअम हायपोक्लाराईडने निर्जंतुक करावा आणि नंतरच टाकून द्यावा, असे मार्गदर्शक सूचना सांगतात. औषधोपचार आरोग्य मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक सुचनांनुसार, गोळीचा मॅक्सिमम डोस (Maximum Dose) घेऊनही रुग्णाचा ताप उतरत नसेल तर पॅरासिटामॉल 650 मिली (Paracetamol 650 mg) ही गोळी दिवसातून 4 वेळा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी. त्याचबरोबर डॉक्टर नॉन स्टेरॉईड, नॉन इन्फ्लेमेटरी ड्रग (NSAID) ( उदा. टॅब नेप्रोक्सेन 250 मिली. दिवसातून 2 वेळा) यांसारख्या औषधांचा विचार करु शकतात. तसेच Tab. Ivermectine 200 mcg/kg, दिवसातून एकदा उपाशी पोटी घेणे) ही गोळी ३ ते ५ दिवस देण्याचा विचार डॉक्टर करु शकतात. तसेच रुग्णाने दिवसातून २ वेळा गरम पाण्याची वाफ घेणे आणि गरम पाण्याने गुळण्या करणे अशा उपाययोजना कराव्यात. रुग्णाची लक्षणे पाच दिवसांपेक्षा अधिक काळ कायम राहिल्यास त्यास इनहेलेशन बु डेसोनाईड (Budesonide) (5 ते 7 दिवसांसाठी दररोज 2 वेळा 800 एम सी जी डोस स्पेसरव्दारे) द्यावा, असे सूचनांमध्ये म्हटले आहे. मंत्रालयाने सांगितले आहे की रेमेडिसिव्हीर किंवा अन्य कोणतीही थेरपी रुग्णाला देण्याचा निर्णय हा वैद्यकीय व्यावसायिकांनीच घ्यावा. आणि या थेरपीच फक्त रुग्णालयात भरती करुनच द्याव्यात. रेमेडेसिव्हीर घरी देण्याचा प्रयत्न कोणीही करु नये. सौम्य आजारात सिस्टीमिक ओरल स्टेरॉईडस (Oral Steroids') देऊ नयेत. 7 दिवसांनंतरही लक्षणे कायम राहिल्यास (उदा. सातत्याने ताप, कफ) तातडीने उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला घेऊनच स्टेरॉईडचे कमी डोसेज सुरु करावेत. सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार, ज्या रुग्णांची तपासणी केली असता ते कोरोनाबाधित आहेत परंतु त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे नाहीत, ऑक्सिजन पातळी 94 पेक्षा जास्त आहे. संसर्ग केवळ अप्पर श्वसनमार्गातच आहे, श्वसनास कोणाताही त्रास नाही अशा रुग्णांना एसिम्प्टोमॅटीक समजावे. होम आयसोलेशनमधील रुग्णांना काही त्रास किंवा तक्रारी जाणवू लागल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधे घ्यावीत. हे ही वाचा-'ऑक्सिजनचा वापर Cut-to-Cut; रुग्णसंख्या वाढली तर...' - मुख्यमंत्री रुग्णांच्या काळजीवाहकांसाठी मार्गदर्शक सूचना रुग्णाची काळजी वाहकांनी 24 तास आणि 7 दिवस काळजी घ्यावी. होम आयसोलेशनमधील रुग्ण आणि उपचार करणारे डॉक्टर्स यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून काळजीवाहकांनी कामकाज करावे. रुग्ण जर इम्युनो कॉम्प्रमाईज स्टेटसचा असेल (एचआयव्ही, ट्रान्सप्लान्ट, कॅन्सर थेरपी) तर त्यास होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यास परवानगी नाही. परंतु, त्यांची संपूर्ण तपासणी केल्यानंतरच त्यास होम आयसोलेशसाठी परवानगी दिली जाईल, असे मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे. काळजीवाहक आणि सौम्य किंवा एसिम्प्टोमॅटीक रुग्णांच्या संपर्कातील सर्वांनी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन प्रोफायलॅक्सिस घ्यावी. आहार कोणता आणि कसा घ्यावा, स्वच्छता कशी पाळावी मंत्रालयाने, रुग्णांना पुरेशी विश्रांती आणि पुरेसे हायड्रेशन (Hydration) राखण्यासाठी भरपूर प्रमाणात द्रव पदार्थ सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच श्वसन विषयक नियमांचे पालन करावे, रुग्णाने वापरलेल्या गोष्टी इतरांनी हाताळू किंवा वापरु नये, असा देखील सल्ला दिला आहे. रुग्णाच्या खोलीतील अनेकदा स्पर्श होणाऱ्या पृष्ठभागाची (टेबलटॉप्स, डोअरनॉब, हॅंडल्स) एक टक्का हायपोक्लोराईड सोल्युशन ने स्वच्छता करावी. तसेच आक्सिमीटरच्या सहाय्याने रुग्णाची आॅक्सिजन पातळी सातत्याने तपासावी, असे सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. होम आयसोलेशन कधी संपते होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना सातत्याने 3 दिवस ताप नसेल किंवा लक्षणे कमी झाली असतील तर किमान 10 दिवसांनंतर स्टॅण्डिंग डिस्चार्ज दिला जातो.
    First published:

    Tags: Corona patient, Coronavirus, Coronavirus symptoms, Covid-19 positive

    पुढील बातम्या