'कोरोना संकटातील हे महत्त्वाचे पाऊल', पंतप्रधान मोदींनी केली केरळची प्रशंसा

'कोरोना संकटातील हे महत्त्वाचे पाऊल', पंतप्रधान मोदींनी केली केरळची प्रशंसा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोना संकटाचा (Coronavirus) सामना करणाऱ्या केरळ (Kerala) राज्याची प्रशंसा केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या  केरळ (Kerala) राज्याची प्रशंसा केली आहे.  या महामारीचा सामना करण्यासाठी लसीची नासाडी रोखणे हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं मत मोदींनी व्यक्त केलं आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन (Pinarayi Vijayan) यांनी एक ट्विट करुन केरळमधील लसीकरणाची मागिती दिली होती. राज्याला केंद्र सरकारकडून 73,38,806 लसीचे डोस मिळाले होते. या तसंच अतिरिक्त डोसचा वापर करत  74,26,164  डोस आत्तापर्यंत देण्यात आले आहेत, असं विजयन यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी यावेळी राज्यातील आरोग्य कर्मचारी आणि विशेषत: नर्सचं कौतुक केलं.

मोदींनी केली प्रशंसा

पंतप्रधान मोदींनी विजयन यांच्या या ट्विटला उत्तर देत म्हंटले आहे की, "लसची नासाडी टाळून आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आणि नर्सनी एक उदाहारण आपल्यासमोर ठेवलं आहे. Covid-19 विरुद्धच्या या लढाईमध्ये लसीची नासाडी कमी करणे आवश्यक आहे."

( वाचा : 'ऑक्सिजनअभावी होणारे मृत्यू म्हणजे नरसंहारच', हायकोर्टाचे जिल्हाधिकाऱ्यांना 48 तासांत चौकशीचे आदेश )

केरळमध्ये मंगळवारी कोरोना व्हायरसचे नवे 37, 190 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 17,01,979 झाली आहे. कोरोना संक्रमणात सातत्यानं वाढ होत असल्यानं 4 मे ते 9 मे या कालावधीमध्ये राज्यात कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत.

Published by: News18 Desk
First published: May 5, 2021, 5:27 PM IST

ताज्या बातम्या