Home /News /lifestyle /

अरेच्या इतकच! तुमच्या मनातल्या प्रश्नाचं ‘हे’ सोपं उत्तर; या कारणामुळे फुगते चपाती

अरेच्या इतकच! तुमच्या मनातल्या प्रश्नाचं ‘हे’ सोपं उत्तर; या कारणामुळे फुगते चपाती

गव्हाच्या पिठामध्ये सगळ्यात जास्त ग्लुटन असतं.

गव्हाच्या पिठामध्ये सगळ्यात जास्त ग्लुटन असतं.

चपाती फुगण्यामागे फारच सोपं आणि इन्ट्रेस्टिंग (Easy & Interesting) कारण आहे.

    नवी दिल्ली,26 जुलै :  लहान मुलं पोळी, चपीती का फुगते? असा प्रश्न विचारतात. त्यावेळी त्यांचं कुतूहल शांत करण्यासाठी आपण एखादं उत्तर (Answer) देतो. पण, खरंतर हा प्रश्न आपल्यालाही पडतो. की, चपाती का फुगते त्यामागे कोणतं कारणं आहे. पोळी किंवा चपाती (Chapati) चांगली फुगली तर ती मऊ राहते असं आपल्याला घरातल्या मोठ्या बायका नेहमीच सांगतात आणि आपण तीच ट्रिक (Trick) वापरून आपली पोळी चांगली करण्याचा प्रयत्न करतो. काही महिला तव्यावर चपाती भाजल्यानंतर ती सरळ गॅसवर भाजतात आणि चपाती फुगते. मात्र, हा प्रश्न अनुत्तरीत राहतो की चपाती फुगण्याचं कारण (Reason Behind chapati to swell)काय आहे. पण, यामागे कोणतंही रॉकेट सायन्स (Rocket Science) नाहीये. (तुम्ही भेसळयुक्त चहा तर पित नाही ना? ‘या’ पद्धताने ओळखा चहाची शुद्धता) तर, कार्बन डायऑक्साईडमुळे (Carbon Dioxide) चपाती फुगटे जेव्हा, आपण चपातीसाठी पीठ मळतो त्यावेळेस त्यावर प्रोटीनचा थर (Protein Layer) तयार होतो. यालाच ग्लुटन (Gluten)म्हटलं जातं. (काय? आता Fart मुळेही कोविडचा धोका! ढुसकी सोडली तरी पसरू शकतो कोरोना?) ग्लुटन कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं. ग्लुटन असलेल्या पिठाची चपाती बनवली किती फुगते. चपाती भाजत असताना ग्लुटन कार्बन डायऑक्साइडला बाहेर पडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे चपातीमध्ये हवा भरते. जो भाग तव्यावरती चिटकलेला असतो. त्याच भागावर ग्लुटनचा स्तर तयार झालेला असतो. (चहाच्या कपातली साखरही नाही शाकाहारी; उपवासासाठी वापरण्याआधी हे वाचा) त्यामुळे चपाती उलटल्यानंतर तो भाग वरती येतो आणि फुटतो. गव्हाच्या पिठामध्ये सगळ्यात जास्त ग्लुटन असतं. त्यामुळेच चपाती सहजपणे फुगते. गव्हाच्या पिठाइतक बाजरी, मका, तांदूळ यांच्या पिठात ग्लुटन नसतं त्यामुळे त्यांची भाकरी चांगल्या प्रकारे फुगत नाहीत. त्यामुळेच भाकरी बनवताना त्यावर पाण्याचा हात फिरवला जातो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Easy hack, Lifestyle

    पुढील बातम्या